खेळ

February 2, 2025 8:09 PM February 2, 2025 8:09 PM

views 19

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा सामना मुंबईत सुरु / अभिषेक शर्मानं झळकावलं ३७ चेंडूत शतक

भारत आणि इंग्लंड यांच्यातल्या टी-२० क्रिकेट मालिकेतला पाचवा आणि शेवटचा सामना आज मुंबईत वानखेडे सेटेडिअमवर होत आहे. इंगलंडनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताचा सलामीचा फलंदाज संजू सॅम्सन फटकेबाजी करताना १६ धावांवर बाद झाला. मात्र अभिषेक शर्मानं ३७ चेंडूत शतक ठोकलं. शेव...

February 2, 2025 7:48 PM February 2, 2025 7:48 PM

views 1

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित

देहरादून इथं सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत मध्य प्रदेशाच्या आशी चौकसे हिनं महिलांच्या ५० मीटर रायफल थ्री पोझिशन नेमबाजी प्रकारात सुवर्ण पदक जिंकून राष्ट्रीय विक्रम मोडित काढला. आशीने २०२३च्या हांगझोऊ आशियाई क्रीडा स्पर्धेत ५० मीटर रायफल थ्री पोझिशन्स प्रकारात रौप्य पदक पटकावलं होतं. दरम्या...

February 2, 2025 3:22 PM February 2, 2025 3:22 PM

views 6

38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राला सर्वाधिक ४१ पदकं प्राप्त

उत्तराखंडमधे सुरु असलेल्या 38व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे आतापर्यंत महाराष्ट्राने सर्वाधिक  ४१ पदकं मिळवली असून त्यात  ११ सुवर्णपदकं आहेत.   सेनादलांचा संघ सर्वाधिक १४ सुवर्णपदकं मिळवून अव्व्ल स्थानी आहे.  कर्नाटक १३ सुवर्णपदकांसह २३ पदकं मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. स्क्वॅशचा अंतिम सामना महाराष...

February 2, 2025 1:47 PM February 2, 2025 1:47 PM

views 5

बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत डी गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद आमने सामने

नेदरलँड्स इथे सुरु असलेल्या टाटा मास्टर्स बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत आता विश्वविजेता डोम्मराजू गुकेश आणि ग्रँडमास्टर प्रज्ञानंद हे दोघे आमने सामने आले असून अंतिम  सामना त्या दोघांमध्ये होईल.    उपांत्य फेरीत काल प्रज्ञानंद ने सर्बियाच्या अलेक्सी सरेना याचा पराभव केला , तर नेदरलँड्स च्या ज...

February 2, 2025 1:15 PM February 2, 2025 1:15 PM

views 28

ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना जीवन गौरव पुरस्कार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळातर्फे दिल्या जाणाऱ्या कर्नल सी के नायडू जीवन गौरव पुरस्कारानं ज्येष्ठ क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांना काल गौरवण्यात आलं. मुंबईत झालेल्या नमन पुरस्कार समारंभात आय सी सी चे अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला . यावेळी गोलंदाज जसप्रीत बुमराह याला पॉली उ...

February 2, 2025 3:49 PM February 2, 2025 3:49 PM

views 15

U19 World Cup : महिला क्रिकेट स्पर्धेत भारताचा दणदणीत विजय

महिला क्रिकेटमध्ये 19 वर्षांखालील टी ट्वेंटी  विश्वचषक स्पर्धेतल्या अंतिम सामन्यात, भारतानं दक्षिण आफ्रिकेवर ९ खेळाडू राखून दणदणीत विजय  मिळवून विश्वचषकावर आपलं नाव कोरलं. दक्षिण आफ्रिकेचं ८३ धावांचं आव्हान भारातनं एका बळीच्या बदल्यात बाराव्या षटकात पूर्ण केलं. भारताची फलंदाज गोंगदी त्रिशा हिने नाबा...

February 2, 2025 2:13 PM February 2, 2025 2:13 PM

views 9

T-20 क्रिकेटमध्ये भारत आणि इंग्लंड यांच्यातील अंतिम सामना आज मुंबईत

भारत आणि इंग्लंड यांच्यातील मर्यादित वीस षटकांच्या मालिकेतील पाचवा आणि अंतिम सामना आज मुंबईत वानखेडे मैदानावर होणार आहे. आज संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे. भारताने या मालिकेत 3-1 अशी विजयी आघाडी घेतली आहे. या मालिकेनंतर सहा फेब्रुवारीपासून पन्नास षटकांच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात...

February 1, 2025 7:55 PM February 1, 2025 7:55 PM

views 13

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईचा मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेत मुंबईत झालेल्या सामान्यात मुंबईनं मेघालयावर एक डाव आणि ४५६ धावांनी विजय मिळवला. मुंबईनं पहिल्या डावात मेघालयाचा संपूर्ण संघ ८६ धावात गारद केल्यानंतर ७ बाद ६७१ धावांवर काल आपला पहिला डाव घोषित केला होता. मेघालयाचा दुसरा डाव आज १२९ धावांवर आटोपला. मुंबईकडून शार्दुल ठाकुरनं ...

January 31, 2025 8:21 PM January 31, 2025 8:21 PM

views 19

रणजी करंडक : मेघालयविरुद्धच्या सामन्यात मुंबईच्या ७ बाद ६७१ धावा

मुंबईत सुरु असलेल्या सामन्यात मुंबईनं पहिल्या डावात मोठी धावसंख्या उभारत मेघालयाची दाणादाण उडवली. मेघालयाचा पहिला डाव काल पहिल्या दिवशी ८६ धावांवर संपल्यानंतर मुंबईनं आज ७ बाद ६७१ धावसंख्येवर पहिला डाव घोषित केला. सिद्धेश लाडनं १४५, आकाश आनंदनं १०३, शम्स मुलानीनं नाबाद १०० धावा केल्या. मेघालयानं आज ...

January 31, 2025 8:01 PM January 31, 2025 8:01 PM

views 15

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची ३२ पदकांची कमाई

उत्तराखंड इथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने आतापर्यंत ३२ पदकांची कमाई केली आहे. यात ७ सुवर्ण, १६ रौप्य आणि ९ कास्य पदकांचा समावेश आहे. सध्या महाराष्ट्र पदक तालिकेत मणिपूर, संरक्षण दल आणि कर्नाटकनंतर चौथ्या स्थानावर आहे. १० मीटर एअर पिस्तुल स्पर्धेत पार्थ माने याने सुवर...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.