खेळ

February 7, 2025 1:36 PM February 7, 2025 1:36 PM

views 19

चीनमध्ये आजपासून सुरू होणाऱ्या आशियाई हिवाळी क्रीडा स्पर्धांमध्ये भारताच्या ५९ खेळाडूंचा सहभाग

चीनमध्ये आजपासून येत्या १४ फेब्रुवारी पर्यंत नवव्या आशियाई हिवाळी क्रीडास्पर्धा होणार आहेत. या स्पर्धेतल्या भारतीय तुकडीत ८८ जणांचा समावेश आहे. यात ५९ खेळाडू आणि २९ संघ अधिकारी आहेत. यंदा प्रथमच, अल्पाइन स्कीइंग, क्रॉस-कंट्री स्कीइंग, फिगर स्केटिंग, शॉर्ट ट्रॅक स्पीड स्केटिंग आणि लाँग ट्रॅक स्पीड स्...

February 7, 2025 9:54 AM February 7, 2025 9:54 AM

views 13

सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट

दिग्गज क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनं त्यांच्या कुटुंबीयांसह काल राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी अमृत उद्यानात फेरीही मारली. यानंतर झालेल्या एका संवादात्मक सत्रात, सचिन तेंडुलकरनं त्याच्या क्रिकेटपटू होण्याच्या प्रवासातील अनेक किस्से सांगितले. यावेळी विविध ...

February 7, 2025 8:55 AM February 7, 2025 8:55 AM

views 13

पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताचा इंग्लंडवर चार गडी राखून विजय

नागपूर इथं काल झालेल्या पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारताने इंग्लंडवर चार गडी राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करत इंग्लंडच्या संघाने दिलेलं २४९ धावांचं लक्ष्य, भारताने ३९ व्या षटकात सहा गडी गमावत पूर्ण केलं. शुभमन गील ने ८७, श्रेयस अय्यरने ५९ धावा केल्या. मालिकेतला दुसरा सामना परवा नऊ तारखेला...

February 6, 2025 7:27 PM February 6, 2025 7:27 PM

views 9

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र पदकतालिकेत पुन्हा तिसऱ्या स्थानावर आला असून महाराष्ट्राकडे सर्वाधिक ८८ पदकं आहेत. त्यात १९ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. तीरंदाजीच्या रिकर्व्ह प्रकारात आज महाराष्ट्राच्या शुकमणी बाबरेकर आणि गाथा खडके यां...

February 6, 2025 1:53 PM February 6, 2025 1:53 PM

views 9

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राची सर्वाधिक ८५ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८५ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३६ रौप्य आणि ३३ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत मात्र महाराष्ट्र चौथ्या स्थानावर गेला आहे. पहिल्या स्थानावर कर्नाटक, त्यानंतर दुसऱ्या स्थानावर सेना दलांचा आणि तिसऱ...

February 6, 2025 11:43 AM February 6, 2025 11:43 AM

views 3

भारत आणि इंग्लंड यांच्यात आज खेळला जाणार तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना

भारत आणि इंग्लंड यांच्यातला तीन 50 षटकांच्या सामन्यांच्या मालिकेतला पहिला क्रिकेट सामना आज नागपूरमधल्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानावर खेळवला जाईल. हा सामना दुपारी दीड वाजता सुरू होईल.या मालिकेतला दुसरा सामना येत्या रविवारी ओडिशामधल्या कटकमध्ये तर तिसरा आणि शेवटचा 50 षटकांचा सामना 12 फेब्रुवारील...

February 6, 2025 10:41 AM February 6, 2025 10:41 AM

views 12

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगाने होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे राज्य क्रीडामंत्र्यांचे निर्देश

क्रीडा विभागाचं कामकाज अधिक वेगानं होण्यासाठी एकात्मिक संगणक प्रणाली विकसित करण्याचे निर्देश राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांनी काल दिले. यासंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीत ते बोलत होते. अशी प्रणाली विकसित झाल्यावर खेळाडूंना योजनांचा लाभ वेळेत मिळेल. स्पर्धा आणि खेळाडूंच्या कामगिरीचा तपशी...

February 5, 2025 8:10 PM February 5, 2025 8:10 PM

views 2

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने सर्वाधिक ८२ पदकांची कमाई केली आहे. त्यात १६ सुवर्ण, ३५ रौप्य आणि ३१ कास्यपदकांचा समावेश आहे. पदकतालिकेत महाराष्ट्र चौथ्या स्थानी घसरला असून मध्य प्रदेशनं १७ सुवर्णपदकांसह तिसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. कर्नाटक २८ सुवर्णप...

February 5, 2025 2:35 PM February 5, 2025 2:35 PM

views 12

टेनिस: सुमित नागलचा रोझारियो चॅलेंजरच्या उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

अर्जेंटिना इथं सुरू असलेल्या रोझारियो चॅलेंजर टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत भारताच्या सुमित नागल याचा सामना आज बोलिव्हियाच्या ह्यूगो डेलिएन याच्याशी होणार आहे. सुमितनं याआधीच्या सामन्यात रेंझो ऑलिव्हो याच्याविरुद्ध झालेल्या सामन्यात ५-७, ६-१, ६-० असा विजय मिळवला होता.  

February 5, 2025 2:08 PM February 5, 2025 2:08 PM

views 1

टेनिसपटू सिमोना हॅलेपची व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा

दोन ग्रँडस्लॅम विजेती आणि महिला क्रमवारीत अग्रमानांकित राहिलेली टेनिसपटू सिमोना हॅलेप हिनं व्यावसायिक टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. तिचा मायदेश रोमेनियातल्या स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत पराभव झाल्यानंतर तिनं हा निर्णय जाहीर केला. सिमोनानं २०१८मध्ये स्लोन स्टीफन्स हिला हरवून फ्रेंच ओपनचं, तर २०...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.