खेळ

December 12, 2025 10:46 AM

views 27

वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा भारतावर विजय

चंदीगड इथं काल झालेल्या वीस षटकांच्या दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं भारतावर 51 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना पाहुण्यांच्या 4 बाद 213 धावा झाल्या. उत्तरादाखल भारतीय संघ सर्वबाद 162 धावाच करु शकला. पाच सामन्यांच्या या मालिकेत आता दोन्ही संघांची 1-1 अशी बरोबरी झाली आहे. तिसरा सामना येत्...

December 11, 2025 3:08 PM

views 18

FIH: हॉकी पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत भारताला कांस्यपदक

एफआयएच (F.I.H) हॉकी पुरुषांच्या कनिष्ठ विश्वचषक स्पर्धेत काल भारतानं अर्जेंटिनावर ४-२ अशी मात करून कांस्यपदक पटकावलं.   सुरवातीला अर्जेंटिनानं दोन गोल करून आघाडी मिळवली मात्र नंतर भारताच्या अंकित पाल, मनमीत सिंह, शारदानंद तिवारी आणि अनमोल एक्का यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि कांस्यपदकावर नाव क...

December 11, 2025 3:04 PM

views 73

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिक टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार

क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका दुसरा टी-२० सामना आज चंडीगड इथं होणार आहे.   संध्याकाळी ७ वाजता सामन्याला सुरुवात होईल. पाच सामन्यांच्या या मालिकेत भारत सध्या १-०नं आघाडीवर आहे.

December 11, 2025 3:02 PM

views 17

छत्तीसगडमधे बस्तर ऑलिम्पिक स्पर्धेचं आयोजन

छत्तीसगडच्या बस्तर इथं आजपासून तीन दिवस बस्तर ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेचं उद्घाटन मुख्यमंत्री विष्णुदेव साय करतील.   ऑलिम्पिक पदकविजेती मुष्टियोद्धा मेरी कोम आज या कार्यक्रमात सहभागी होईल. स्पर्धेचा समारोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते १३ डिसेंबरला होणार आहे. प्रसिद्ध फ...

December 11, 2025 12:11 PM

views 21

एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेत जर्मनी विजयी

चेन्नई इथं काल रात्री झालेल्या एफआयएच पुरुष कनिष्ठ हॉकी विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, गतविजेत्या जर्मनीनं निर्धारित वेळेत सामना 1-1 असा बरोबरीत सुटल्यानंतर शूट-आऊटमध्ये स्पेनचा 3-2 असा पराभव करून आपलं आठवं विजेतेपद पटकावलं. त्यापूर्वी काल, यजमान भारतानं अर्जेंटिनावर 4-2 असा विजय मिळवून कास्यप...

December 10, 2025 9:57 AM

views 44

भारताचा दक्षिण आफ्रिकेवर 101 धावांनी विजय

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेतील कटक मध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात, भारतानं काल दक्षिण आफ्रिकेला 101 धावांनी पराभूत केलं.   भारतानं दिलेल्या 176 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेचा संघ केवळ 74 धावांमध्ये गारद झाला. हार्दिक पांड्या 28 चेंडूत 59 धावा करून सामनाव...

December 9, 2025 8:33 PM

views 84

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात भारताची खराब सुरुवात

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज ओदिशात कटक इथल्या बाराबती मैदानावर सुरु आहे.  दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. भारताची सुरुवात खराब झाली. सामन्यातल्या तिसऱ्याच चेंडूवर शुभमन गिल ४ धावा काढून बाद झाला. शेवटची ...

December 9, 2025 3:51 PM

views 19

भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी राउंड-रॉबिनच्या पाचव्या फेरीत विजयी

भारताचा ग्रँडमास्टर अर्जुन एरिगैसी यानं दक्षिण आफ्रिकेत सुरू असलेल्या फ्रीस्टाईल बुद्धिबळ ग्रँडस्लॅम अंतिम फेरीच्या राउंड-रॉबिनच्या पाचव्या फेरीत अग्रमानांकित मॅग्नस कार्लसन याचा पराभव केला.   सात फेऱ्यांच्या अखेरील अर्जुन यानं साडेचार गुणांसह तिसऱ्या स्थान पटकावलं. आता नॉकआउट फेरीत त्याचा सामन...

December 9, 2025 3:09 PM

views 20

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी होणार

आयपीएलच्या २०२६च्या हंगामासाठीचा लिलाव १६ डिसेंबर रोजी अबुधाबीत होणार असून यात भाग घेणाऱ्या खेळाडूंची अंतिम यादी बीसीसीआयनं प्रसिद्ध केली आहे. एकंदर २४० भारतीय आणि ११० परदेशी खेळाडू यात सहभागी होतील. २०२६च्या आयपीएलमध्ये ७७ खेळाडूंसाठी जागा उपलब्ध असून त्यातल्या ३१ परदेशी खेळाडूंसाठी आहेत. आत्तापर्य...

December 9, 2025 9:25 AM

views 35

भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील 20 षटकांच्या क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि दक्षिणआफ्रिका यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.सलामीचा सामना आज संध्याकाळी सात वाजता ओडिशातल्या कटक इथल्या बाराबती मैदानावर खेळण्यात येणार आहे.   यामालिकेतील दुसरा सामना गुरुवारी चंदीगडमधील मुल्लानपूर इथं तर तिसरा सामना धर्मशाळा इथं, चौथा ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.