खेळ

March 2, 2025 8:11 PM March 2, 2025 8:11 PM

views 12

विदर्भाची तिसऱ्यांदा रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या जेतेपदाला गवसणी

विदर्भ क्रिकेट संघानं आज रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेचं जेतेपद तिसऱ्यांदा आपल्या नावे केलं. नागपूर इथं विदर्भ आणि केरळ यांच्यात झालेला अंतिम सामना आज अनिर्णित राहिला. मात्र विदर्भानं पहिल्या डावात केरळवर मिळवलेल्या ३७ धावांच्या आघाडीच्या जोरावर जेतेपदाला गवसणी घातली.  आज सामन्याच्या अखेरच्या दिवशी विद...

March 2, 2025 5:14 PM March 2, 2025 5:14 PM

views 12

ISL Football: ईस्ट बेंगॉल आणि बंगळुरू यांच्यात सामना रंगणार

फुटबॉल इंडियन सुपर लीग स्पर्धेतला आजचा सामना, संध्याकाळी साडे सात वाजता, ईस्ट बेंगॉल आणि बंगळुरू यांच्यात कोलकात्यातल्या सॉल्ट लेक स्टेडियमवर रंगणार आहे. 

March 2, 2025 5:06 PM March 2, 2025 5:06 PM

views 5

Bengaluru Open 2025: अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी विजेतेपद पटकावलं

बेंगळुरू खुल्या टेनिस स्पर्धेत अनिरुद्ध चंद्रशेखर आणि रे हो यांनी पुरुष दुहेरी प्रकाराचं विजेतेपद पटकावलं. या विजयासह त्यांनी सहावं एटीपी चॅलेंजर विजेतेपद पटकावलं.

March 2, 2025 8:36 PM March 2, 2025 8:36 PM

views 7

Chile Open 2025: भारतीय टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्लीला विजेतेपद

भारतीय टेनिसपटू ऋत्विक चौधरी बोलिपल्ली यानं आपला कोलंबियन साथीदार निकोलस बॅरिएंटोस याच्या सोबतीनं चिली खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष दुहेरीत विजेतेपद पटकावलं आहे. या जोडीनं प्रतिस्पर्धी अर्जेंटिनाच्या जोडीचा ६-३, ६-२ असा पराभव केला. ऋत्विक चौधरी आणि निकोलस यांचं दुहेरीतलं पहिलंच विजेतेपद आहे.

March 2, 2025 1:52 PM March 2, 2025 1:52 PM

views 6

ICC Champions Trophy: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आज शेवटचा साखळी सामना

आयसीसी चॅम्पियन्स चषक स्पर्धेत आज दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारताचा सामना न्यूझीलंडशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार अडीच वाजता सुरू होईल. अ गटातून भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीतलं स्थान निश्चित केलं आहे, मात्र या गटात सर्वोच्च स्थानी कोण राहणार, हे या साम...

March 1, 2025 8:27 PM March 1, 2025 8:27 PM

views 6

रणजी करंडक : अंतिम सामन्यात चौथ्या दिवसअखेर विदर्भाच्या दुसऱ्या डावात २४९ धावा

नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आजच्या  चौथ्या दिवसअखेर विदर्भ संघाच्या दुसऱ्या डावात ४ बाद २४९ धावा झाल्या. विदर्भानं २८६ धावांची आघाडी घेतली आहे. खेळ थांबला तेव्हा करुण नायर नाबाद १३२ धावांवर खेळत होता. 

March 1, 2025 9:11 PM March 1, 2025 9:11 PM

views 10

ICC Champions : इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका विजयी

आय सी सी चॅम्पियन्स चषक क्रिकेट स्पर्धेत आज ‘ब’ गटातल्या शेवटच्या साखळी सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं इंग्लंडविरुद्ध ७ गडी राखून विजय मिळवला.    दरम्यान, ‘अ’ गटातला शेवटचा साखळी सामना उद्या भारत आणि न्यूझीलंड संघांमध्ये खेळला जाणार असून या दोन्ही संघांनी आधीच उपांत्य फेरी गाठली असल्यानं हे दोन्ही स...

March 1, 2025 7:19 PM March 1, 2025 7:19 PM

views 20

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप

३५व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचा समारोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ठाण्यात झाला. विविध क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या खेळाडूंचं फडणवीस यांनी अभिनंदन केलं. संघभावना जोपासण्यासाठी खेळ खेळणं आवश्यक आहे, त्यामुळे क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त जणांनी सहभाग घ्यावा असं ...

March 1, 2025 3:37 PM March 1, 2025 3:37 PM

views 17

ICC Champions Trophy : शेवटच्या सामन्यात दक्षिण आफ्रिका-इंग्लंड आमनेसामने

आयसीसी  करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत आज ब गटातला शेवटचा सामना दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंडदरम्यान कराचीमधे होत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी  करण्याचा निर्णय घेतला आहे.  इंग्लंडचा संघ आधीच स्पर्धेतून बाहेर पडला असला तरी आजच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा २०७ पेक्षा जास्त धावांनी पराभव ...

March 1, 2025 10:34 AM March 1, 2025 10:34 AM

views 35

आयसीसी करंडक स्पर्धेत ऑस्ट्रेलिया, भारत आणि न्यूझीलंड संघ उपांत्य फेरीत

आयसीसी करंडक अजिंक्यपद क्रिकेट स्पर्धेत काल लाहोर इथं झालेल्या ब गटाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि अफगाणिस्तान काल सामना झाला. पावसाच्या व्यत्ययामुळं दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण मिळाला.   अफगाणिस्तान संघानं दिलेलं 274 धावांचं आव्हान दिलं होतं परंतु पावसाच्या व्यत्ययामुळं ऑस्ट्रेलिया संघानं 1...