खेळ

January 4, 2026 1:56 PM

views 33

राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते वाराणसीत उद्घाटन

सन २०३६ मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिकचं यजमानपद मिळवण्याकरता भारत जोरदार प्रयत्न करत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. उत्तर प्रदेशात वाराणसी इथं होत असलेल्या राष्ट्रीय व्हॉलीबॉल स्पर्धांचं उद्घाटन त्यांनी आज दूरस्थ पद्धतीनं केलं, त्यावेळी ते बोलत होते. विविध खेळांमध्ये २०१४ सालापासून द...

January 4, 2026 1:55 PM

views 46

तायक्वांदोपटू रूपा बायोर हिनं रचला इतिहास!

तायक्वांडो खेळाच्या क्रमवारीत भारताच्या रुपा बायोर हिनं आशियातलं अव्वल स्थान पटकावलं आहे. जागतिक क्रमवारीत ती सहाव्या स्थानावर पोहोचली असून ही कामगिरी करणारी ती पहिली भारतीय खेळाडू आहे.    अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री पेमा खांडू यांनी रुपा बायोरच्या या कामगिरीबद्दल अभिनंदन केलं आहे.

January 3, 2026 8:33 PM

views 34

ODI: न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा

न्यूझीलंडविरुद्धच्या ३ एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची आज घोषणा झाली. संघाचं नेतृत्व शुभमन गिल याच्याकडे आहे, तर उपकर्णधारपदाची जबाबदारी श्रेयस अय्यरला देण्यात आली आहे. गोलंदाज मोहम्मद सिराज याचंही संघात पुनरागमन झालं आहे. ११ ते १८ जानेवारी दरम्यान भारतात ही मालिका होणार आहे. रोहित शर्मा, विराट को...

January 3, 2026 2:03 PM

views 34

भारत आणि बांगलादेश यांच्यातली नियोजित क्रिकेट मालिका सप्टेंबरमध्ये रंगणार

भारत आणि बांगलादेश यांच्यात गेल्या वर्षी नियोजित असलेली मर्यादित षटकांच्या सामन्यांची क्रिकेट मालिका यावर्षी सप्टेंबर महिन्यात होईल, असं बांगलादेश क्रिकेट मंडळाने सांगितलं आहे. मात्र याचं वेळापत्रक निश्चित नाही. गेल्यावर्षी बांगलादेशात उफाळलेल्या हिंसाचारानंतर प्रधानमंत्री शेख हसिना भारतात आल्या, त्...

January 3, 2026 1:56 PM

views 50

KKR मधून बांगलादेशी खेळाडूला वगळावं – BCCI चे निर्देश

२०२६ च्या आयपीएल क्रिकेट स्पर्धेसाठी कोलकाता नाईट रायडर्स संघाने बांगलादेशी खेळाडू मुस्तफिजूर रहमान याला संघातून वगळावं असं बीसीसीआय अर्थात भारत क्रिकेट नियामक मंडळाने सांगितलं आहे.  केकेआरने रहमानला आयपीएलच्या लिलावात ९ कोटी वीस लाख रुपयांना खरेदी केलं आहे. बांगलादेशात एका हिंदू तरुणाची हत्या झाल्य...

January 1, 2026 1:32 PM

views 90

२०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष

सरलेलं २०२५ हे वर्षं भारतीय खेळांसाठी एक महत्त्वाचं वर्ष ठरलं. यावर्षी आंतरराष्ट्रीय स्तरावर पदकांची कमाई तर झालीच पण खेळांमध्ये विक्रमी सरकारी गुंतवणूक, महत्त्वपूर्ण धोरणात्मक सुधारणा आणि विस्तारित पायाभूत सुविधांनी भारतीय क्रीडा विश्वातल्या नवीन युगाचा पाया रचला. केंद्र सरकारने २०२५-२६ या आर्थिक व...

January 1, 2026 12:20 PM

views 45

बंगळुरूमध्ये 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात

बंगळुरूच्या अटलबिहारी वाजपेयी स्टेडियमध्ये कालपासून 44 व्या कनिष्ठ राष्ट्रीय खो खो अजिंक्यपद स्पर्धांना सुरुवात झाली. देशभरातून हजार खेळाडू यामध्ये सहभागी झाले आहे. उद्घाटनाच्या कालच्या दिवशी एकंदर चाळीस सामने खेळवले गेले. चार जानेवारीला अंतिम फेरीचे सामने होणार आहेत. दरम्यान 58व्या वरिष्ठ राष्ट्रीय...

December 29, 2025 2:33 PM

views 37

न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२...

December 28, 2025 7:52 PM

views 39

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत वैदेही चौधरीला एकेरी गटाचं विजेतेपद

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत आज वैदेही चौधरी हिनं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात वैदेहीनं जपानच्या मिचिका ओझेकी हिचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत वैदेहीनं वैष्णवी अडकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

December 26, 2025 3:26 PM

views 35

पी व्ही सिंधूची बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

दोन वेळा ऑलिंम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची २०२६ ते २९ या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या भूमिकेत, सिंधू जागतिक बॅडमिंटनच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा आवाज बळकट करण्यासाठी काम करेल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.