खेळ

June 19, 2025 9:17 AM June 19, 2025 9:17 AM

views 5

आशियाई स्क्वाश अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय वेलावन सेंथिलकुमार याचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

मलेशियात सुरू असलेल्या आशियाई स्क्वाश अजिंक्यपद स्पर्धेत भारताचा वेलावन सेंथिलकुमारनं जपानचा टोमोटाका एंडोचा तीन-शून्य असा पराभव करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. भारताचा हा एकमेव खेळाडू आहे. यापूर्वी सूरज चांद, आकांक्षा साळुंखे आणि शमीना रियाझ स्पर्धेतून बाहेर पडले आहेत.

June 18, 2025 2:20 PM June 18, 2025 2:20 PM

views 13

जर्मनी इथे होणाऱ्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना

जर्मनी इथे होणाऱ्या ४ राष्ट्रांच्या हॉकी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आज भारताचा कनिष्ठ पुरुष हॉकी संघ बेंगळुरूहून रवाना झाला. कर्णधार अराईजित सिंह हुंडल याच्या नेतृत्वाखाली हा संघ येत्या २१ जून रोजी यजमान जर्मनी संघाबरोबर लढत देईल. त्यानंतर २२ जून रोजी ऑस्ट्रेलिया आणि २४ जून रोजी स्पेनशी या संघाचा सा...

June 18, 2025 2:13 PM June 18, 2025 2:13 PM

views 18

क्रिकेट – हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश

इंग्लंडविरोधात होणाऱ्या कसोटी क्रिकेट मालिकेसाठी भारतीय संघात जलदगती गोलंदाज हर्षित राणा याचा राखीव खेळाडूंमधे समावेश झाला आहे. बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं काल रात्री ही घोषणा केली. हर्षित राणाने ऑस्ट्रेलियाच्या विरुद्ध कसोटी क्रिकेटमधे पदार्पण केलं होतं. त्याने आतापर्यंत दोन कसोटी...

June 18, 2025 9:51 AM June 18, 2025 9:51 AM

views 9

तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात वैयक्तिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंची अंतिम फेरीत धडक

तिरंदाजीच्या आशिया करंडक स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात, काल सिंगापूरमध्ये झालेल्या स्पर्धेत पुरूष आणि महिला वैयक्तिक स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडू अंतिम फेरीत पोचले. पुरूषांच्या वैयक्तिक स्पर्धे, कुशाल दलालने बांग्लादेशच्या हिमू बच्चरला मात दिली. तर महिलांच्या संयुक्त विभागात, भारताचे सुवर्ण आणि रौप्य ...

June 17, 2025 7:23 PM June 17, 2025 7:23 PM

views 8

आयसीसीच्या फलंदाजांच्या क्रमवारीत स्मृती मंधाना अव्वल

आयसीसीच्या महिला एकदिवसीय क्रिकेटमधे फलंदाजांच्या क्रमवारीत भारताच्या स्मृती मंधाना हिनं अव्वल स्थान पटकावलं आहे. तिच्याकडे ७२७ गुण आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या लॉरा वोल्वार्ड हिची दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली असून तिच्यासह इंग्लंडची सायव्हर ब्रंट ही संयुक्तरित्या दुसऱ्या स्थानावर आहे. स्मृतीनं जागतिक क...

June 16, 2025 2:24 PM June 16, 2025 2:24 PM

views 6

महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखा जाहीर

आयसीसी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या तारखांची घोषणा केली आहे. या स्पर्धेची सुरुवात येत्या ३० सप्टेंबर रोजी बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर होईल. स्पर्धेचा पहिला सामना भारत आणि श्रीलंका या दोन संघांमध्ये खेळवला जाईल. या स्पर्धेची उपांत्य फेरी २९ आणि ३० ऑक...

June 14, 2025 1:36 PM June 14, 2025 1:36 PM

views 3

दक्षिण आफ्रिका कसोटी क्रिकेट विश्वविजेतेपदाच्या उंबरठ्यावर

जागतिक क्रिकेट कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात  दक्षिण आफ्रिकेचा संघ विजयाकडे वाटचाल करत आहे. सामन्याचा दोन दिवसांचा खेळ अजून शिल्लक असून, दक्षिण आफ्रिका आपल्या दुसऱ्या डावात विजयापासून केवळ ६९ धावा दूर आहे. काल सामन्याच्या तिसऱ्या दिवशी दक्षिण आफ्रिकेनं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २०७ धावांव...

June 13, 2025 2:07 PM June 13, 2025 2:07 PM

views 10

FIH हॉकी प्रो लीगच्या सामन्यात अर्जेन्टिनाकडून भारताचा पराभव

नेदरलँडमध्ये FIH हॉकी प्रो लीगच्या काल झालेल्या सामन्यात अर्जेन्टिनानं भारताचा 1-2 अशा गुणांनी पराभव केला. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंग बोटाच्या जखमेच्या कारणास्तव सामन्यात सहभागी होऊ न शकल्यानं उपकर्णधार हार्दिक सिंगनं या सामन्याचं नेतृत्व केलं. या सामन्यात भारत आता 15 गुणांसह पाचव्या स्थानावर आह...

June 13, 2025 10:15 AM June 13, 2025 10:15 AM

views 11

आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने पटकावलं कास्य पदक

जर्मनीतील म्युनिक इथं झालेल्या आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत भारतीय नेमबाज सिफ्ट कौर समराने काल महिलांच्या 50 मीटर रायफल 3 पोझिशन स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. 23 वर्षीय सिफ्टने अंतिम फेरीत 453 पुर्णांक 1 गुण मिळवत तिसरे स्थान पटकावलं.  

June 13, 2025 10:11 AM June 13, 2025 10:11 AM

views 27

क्रिकेट – दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियाची 218 धावांची आघाडी

आयसीसी करंडक विश्वचषक कसोटी क्रिकेट स्पर्धेतील लंडनमध्ये सुरू असलेल्या अंतिम सामन्यात कालच्या दुसऱ्या दिवशी दक्षिण अफ्रिकेविरुध्द ऑस्ट्रेलियानं 218 धावांची आघाडी घेतली आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ऑस्ट्रेलियानं 8 गडी बाद 144 धावा केल्या होत्या. तत्पूर्वी, पहिल्या डावात, दक्षिण आफ्रिकेचा संघ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.