खेळ

July 19, 2025 7:13 PM

views 15

आंतरराष्ट्रीय गणित ऑलिंपियाडमध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक

ऑस्ट्रेलियात सनशाइन कोस्ट इथं झालेल्या ६६ व्या आंतरराष्ट्रीय गणितऑलिंपियाड मध्ये महाराष्ट्राच्या आदित्य मांगुडीला सुवर्णपदक मिळालं आहे. तसंच  दिल्लीचे कणव तलवार आणि आरव गुप्ता यांनाही सुवर्णपदक मिळालं आहे. सहा स्पर्धकांच्या भारतीय संघाने ३ सुवर्ण , २ रौप्य आणि १ कांस्य पदकं मिळवली आहेत. कर्नाटकचा अब...

July 19, 2025 4:00 PM

views 28

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत यांच्यात सामना रंगणार

महिला क्रिकेटमधे इंग्लंड विरुद्ध भारत तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतला दुसरा सामना आज लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळला जाणार आहे.   खेळ साडेतीन वाजता सुरु होईल. पहिला सामना जिंकून भारतानं या मालिकेत आघाडी घेतली आहे.  तिसरा आणि शेवटचा सामना २२ जुलै रोजी होणार आहे.

July 19, 2025 1:32 PM

views 22

फिडे जागतिक महिला करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत चार भारतीय खेळाडूंचा प्रवेश

भारतीय महिला बुद्धिबळपटू कोनेरू हम्पी, हरिका द्रोणवल्ली, आर. वैशाली आणि दिव्या देशमुख यांनी FIDE जागतिक करंडकाच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.   त्यामुळं भारत या स्पर्धेच्या अंतिम आठ टप्प्यात चार खेळाडू असलेला पहिला देश बनला आहे. पहिल्या आठमध्ये चार भारतीय खेळाडू असल्यानं, आता भारत आणि चीन यांच्...

July 16, 2025 2:48 PM

views 35

एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार

इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय क्रिकेट मालिकेच्या पहिल्या सामन्यासाठी भारतीय महिला संघ आज मैदानात उतरणार आहे. कर्णधार हरमनप्रीत कौर हिच्यावर या संघाच्या कर्णधार पदाची धुरा असेल.   तिच्यासह स्मृती मानधना, रिचा घोष, जेमिमा रॉड्रिग्ज, हरलीन देओल, अरुंधती रेड्डी, क्रांची गौड, अमनज्योत कौर, सायली गणेश,...

July 16, 2025 2:38 PM

views 23

हॉकीपटू दीपिकाला पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला 

भारतीय महिला हॉकीपटू दीपिकाला  आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या प्रो लीग स्पर्धेमध्ये वर्ष २०२४-२५ चा पॉलिग्रास मॅजिक स्किल पुरस्कार मिळाला  आहे. जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या  नेदरलँड्सविरुद्ध शानदार गोल करून तिने हा पुरस्कार मिळवला.   पुरुषांच्या गटात, बेल्जियमच्या व्हिक्टर वेग्न...

July 16, 2025 2:34 PM

views 25

जपान खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही सिंधू वगळता भारतीय खेळाडूंची आगेकूच

जपानच्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज भारताने चांगली सुरुवात केली. टोकियो इथे सुरु असलेल्या या स्पर्धेत पुरुष दुहेरी गटात भारताच्या सात्विकसाईराज रांकिरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी तर एकेरी गटात लक्ष्य सेन यांनी दमदार कामगिरी करत दुसऱ्या फेरीत प्रवेश मिळवला.   सात्विक साईराज आणि चिराग या जोडीनं ...

July 14, 2025 8:20 PM

views 19

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारत पराभवाच्या छायेत आहे. लॉर्ड्स मैदानावर सुरु असलेल्या या सामन्याच्या पहिल्या डावात दोन्ही संघांनी प्रत्येकी ३८७ धावा केल्या होत्या. इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर गुंडाळण्यात आज भारताला यश आलं. मात्र या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना भारता...

July 14, 2025 8:06 PM

views 19

५७व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधे ४ भारतीय विद्यार्थ्यांना पदक

५७व्या आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिम्पियाडमधे सहभागी झालेल्या सर्व ४ भारतीय विद्यार्थ्यांनी पदक मिळवलं असून पदक तालिकेत भारताला सहावं स्थान मिळालं आहे. जळगावचा देवेश पंकज भैया आणि हैद्राबादचा संदीप कुची यांना सुवर्णपदक मिळालं असून भुवनेश्वरचा देबदत्त प्रियदर्शी आणि नवी दिल्लीचा उज्ज्वल केसरी या वि...

July 14, 2025 1:39 PM

views 24

जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताला उपविजेतेपद

बिश्केक इथं झालेल्या जागतिक कनिष्ठ गट कुस्ती स्पर्धेत भारताच्या फ्रीस्टाईल संघाने उपविजेतेपद मिळवलं. भारतीय कुस्तीगीरांनी २ सुवर्ण, एक रौप्य आणि ५ कांस्यपदकं मिळवत १५७ गुणांची कमाई केली. सर्व प्रकारांमधे मिळून भारताला १० सुवर्ण, ३ रौप्य आणि ८ कांस्यपदकं मिळाली.

July 14, 2025 1:06 PM

views 12

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज

अँडरसन-तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या तिसऱ्या सामन्यात भारताला विजयासाठी १३५ धावांची गरज आहे.  लॉर्ड्स मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात इंग्लडचा दुसरा डाव १९२ धावांवर संपला. दिवस अखेर भारताच्या दुसऱ्या डावात ४ बाद ५८ धावा झाल्या होत्या.    रात्रीचा रखवालदार म्हणून आलेल्या आकाशदीपला इंग्लं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.