खेळ

September 4, 2024 7:09 PM

views 45

पॅरालिंपिक पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत सचिन खिलारीनं पटकावलं रौप्य पदक

पॅरिस पॅरालिंपिकमध्ये भारताच्या सचिन खिलारी याने पुरुषांच्या गोळाफेक स्पर्धेत एफ ४६ प्रकारात रौप्य पदक पटकावलं आहे. या कामगिरीबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्याचं अभिनंदन केलं आहे. या स्पर्धेत भारताने आतापर्यंत तीन सुवर्ण, नऊ रौप्य आणि नऊ कांस्य पदकं, अशी एकूण २१ प...

September 4, 2024 1:58 PM

views 23

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांचा पुरुष एकेरीच्या उपान्त्यपूर्व फेरीत प्रवेश

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचे सतीश कुमार करुणाकरन आणि शंकर सुब्रमणियन यांनी पुरुष एकेरी गटात उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे. करुणाकरन याने थायलंडच्या कान्तफोन वांगच्यारोएन याचा २४-२२,२३-२१ असा सरळ गेम मध्ये  पराभव करत ही फेरी गाठली तर दुसऱ्या एका सामन्यात सुब्रमणियन याने ज्योकिम ओल्डरफ याला २१...

September 4, 2024 9:26 AM

views 32

पॅरीस पॅरालिंपिक्स स्पर्धेत भारताला मिळाली ५ पदकं

पॅरिस इथे सुरू असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी काल पदकतालिकेत पाच पदकांची भर टाकली. महिलांच्या ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत दीप्ती जीवनजी हिने कास्य पदक पटकावलं तर पुरुषांच्या उंच उडी प्रकारात शरद कुमारने रौप्य आणि मरियप्पन थंगवेलू याने कास्य पदक पटकावलं. भालाफेकीत अजित सिंह आणि सुंद...

September 3, 2024 3:05 PM

views 22

अमेरीकन ओपन टेनिस स्पर्धा : रोहन बोपण्णा आणि अल्डिला सुतजियादी यांचा मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश

अमेरीकन खुल्या टेनिस स्पर्धेत रोहन बोपण्णा आणि त्याची इंडोनेशियन जोडीदार अल्डिला सुतजियादी यांनी मिश्र दुहेरीच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. त्यांनी उपांत्यपूर्व फेरीत मॅथ्यू एब्डेन आणि बार्बोरा क्रेजिकोव्हा या जोडीवर ७-६, २-६, १०-७ असा विजय मिळवला. उपांत्य फेरीत त्यांचा सामना डोनाल्ड यंग आणि टे...

September 2, 2024 12:40 PM

views 38

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात

अमेरिकन खुल्या टेनिस ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे. रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन जोडीदार मॅथ्यू एब्देन या जोडीला काल तिसऱ्या फेरीत मॅक्सिमो गोन्झालेस आणि आंद्रेस मोल्टेनी या अर्जेंटिनाच्या जोडीकडून १-६, ५-७ असा थेट सेट्समध्ये पराभव पत्करावा लागला.  ...

September 2, 2024 12:54 PM

views 32

पॅराऑलिम्पिंकमध्ये भारताला उंच उडीमध्ये रौप्य, तर धावण्यात कास्यपदक

  पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताची धावपटू प्रीती पाल हिनं महिलांच्या २०० मीटर स्पर्धेत कास्यपदकाला गवसणी घातली आहे. या स्पर्धेतलं तिचं हे दुसरं पदक आहे. पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्यपदकावर नाव कोरलं आहे. स्पर्धेच्या आजच्या पाचव्या दिवशी पदकतालिकेत आणखी भर पडण्याची आशा आहे. तिरंदाज श...

September 1, 2024 7:34 PM

views 23

अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधल्या सहभागात वाढ – राज्यमंत्री रक्षा खडसे

केंद्र सरकारच्या अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधला सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे, असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. भारतीय खेल प्राधिकरण, खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशनच्या वतीनं ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या व...

August 31, 2024 8:17 PM

views 25

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत 10 मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला आज आणखी एक पदक मिळालं. महिलांच्या १० मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रुबिना फ्रान्सिसला कांस्य पदक मिळालं. या स्पर्धेतलं भारताचं हे पाचवं आणि नेमबाजीतलं चौथं पदक आहे.  बॅडमिंटनमध्ये भारताच्या सुकांत कदम आणि सुहास यतिराज यांनी आपापल्या एकेरीच्या गटात विजय मिळवत उपांत्य फे...

August 31, 2024 1:37 PM

views 23

जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत आरतीची कास्यपदकाला गवसणी

पेरूमधील लिमा इथे सुरू असलेल्या जागतिक अंडर-२० ॲथलेटिक्स चॅम्पियनशीपमध्ये भारताच्या आरतीनं काल १० हजार मीटर चालण्याच्या स्पर्धेत कास्य पदक पटकावलं. चीनच्या झुओमा बैमा हिनं सुवर्ण तर चीनच्याच मेलिंग चेन हिनं रौप्य पदक पटकावलं. आरतीने ४४ मिनिट ३९ पूर्णांक ३९ शतांश सेकंदात ही स्पर्धा पूर्ण करत राष्ट्री...

August 31, 2024 1:22 PM

views 21

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत ॲलेक्सेई पॉपिरिन कडून नोव्हाक जोकोविचचा पराभव

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत गतविजेता नोव्हाक जोकोविचला ऑस्ट्रेलियाच्या ॲलेक्सेई पॉपिरिन यानं पराभवाचा धक्का दिला. पॉपिरिननं जोकोविचवर ६-४, ६-४, २-६, ६-४ अशी मात केली. एका वर्षात एकही ग्रँडस्लॅम जिंकण्यात अपयशी ठरण्याची जोकोविचची २०१७नंतरची ही पहिलीच वेळ आहे.  दरम्यान, भारताचा युकी भांब्री आणि त्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.