खेळ

September 15, 2024 1:39 PM

views 26

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत नीरज चौप्राला रौप्य पदक

बेल्जियमध्ये ब्रुसेल इथं झालेल्या डायमंड लीगचं सलग दुसऱ्यांदा रौप्य पदक नीरज चोप्रानं पटकावलं. नीरजनं ८७ पूर्णांक ८६ मीटर अंतरावर भाला फेकला, त्याचं सुवर्णपदक केवळ एका सेंटीमीटरनं हुकलं. या स्पर्धेत अँडरसन पीटर्स सुवर्ण तर जर्मनीच्या ज्युलियन वेबर यानं कांस्य पदक पटकावलं.

September 14, 2024 7:50 PM

views 22

आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताची पाकिस्तानवर २-१ अशी मात

चीनमध्ये हुलुनबुईर इथं सुरु असलेल्या पुरुषांच्या आशियाई हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतानं पाकिस्तानवर २-१ अशी मात केली. भारताचा कर्णधार हरमनप्रीत सिंह यानं भारताच्या बाजूनं दोन गोल केले. सहा संघांचा सहभाग असलेली ही स्पर्धा राऊंड-रॉबिन पद्धतीने खेळवली जात असून, १६ सप्टेंबर रोजी अव्वल चार संघ उपांत्य फे...

September 14, 2024 9:45 AM

views 24

आशियाई चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघ आमने-सामने

चीनमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत आज भारत आणि पाकिस्तान संघांत सामना होणार आहे. या स्पर्धेतील भारताचा हा पाचवा आणि अंतिम साखळी सामना आहे. यापूर्वी भारतीय संघाने चीन, जपान, मलेशिया आणि कोरिया संघांना नमवून गुणतालिकेत पहिलं स्थान मिळवत उपांत्य फेरीतील आपलं स्थान निश्चित केलं आहे. गुणतालिक...

September 13, 2024 8:38 PM

views 17

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना रंगणार

पुरुषांच्या आशियाई हॉकी चषक स्पर्धेत उद्या भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना होणार आहे. चीनमधल्या मोकी इथल्या मैदानावर होणारा हा सामना, या स्पर्धेतला भारताचा पाचवा सामना आहे. यापूर्वी भारतीय संघानं चीनला ३-०, जपानला ५-१, मलेशियाला ८-१ आणि कोरियाला ३-१ असं नमवलं आहे. गुणतालिकेत पहिलं स्थानी असलेल्या ...

September 13, 2024 1:30 PM

views 27

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेत भारताला ९ सुवर्णपदकं

दक्षिण आशियाई ज्युनियर ॲथलेटिक्स स्पर्धेच्या कालच्या दुसऱ्या दिवशी भारताने नऊ सुवर्णपदकांची कमाई केली. महिलांच्या थाळीफेक प्रकारात अनिशा हिने ४९ मीटर ९१ सेंटीमीटरचं विक्रमी अंतर गाठत भारताला पहिलं सुवर्णपदक मिळवून दिलं. याच स्पर्धेत अमानत कंबोज हिने ४८ मीटर ३८ सेंटीमीटर थाळीफेक करत रौप्यपदक जिंकलं. ...

September 13, 2024 10:18 AM

views 28

नीरज चोप्रा आणि अविनाश साबळे डायमंड लीग फायनलमध्ये करणार भारताचे प्रतिनिधित्व

ब्रुसेल्स इथं आजपासून सुरू होणाऱ्या डायमंड लीगच्या अंतिम फेरीत भारताचं प्रतिनिधित्व पॅरिस ऑलिम्पिकमधील रौप्यपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा आणि स्टीपलचेस धावपटू अविनाश साबळे करणार आहेत. यंदा डायमंड लीगमधील अलियान्झ मेमोरियल व्हॅन डॅमे स्पर्धेत हे क्रिडापटू विजयासाठी लढत देतील. सध्या 14व्या क्रमांक...

September 12, 2024 7:08 PM

views 26

आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत भारताचा कोरियाला पराभव करत सलग चौथा विजय

चीनच्या हुलनबुइर इथं सुरू असलेल्या आशियाई पुरूष हॉकी स्पर्धेत आज भारतानं दक्षिण कोरियाला नमवत सलग चौथा विजय नोंदवला जिंकले. भारतानं दक्षिण कोरियाचा ३-१ अशा गोलफरकानं पराभव केला. अराईजीत सिंग हुंदाल आणि कर्णधार  हरमनप्रीत सिंगच्या यांनी भारतासाठी गोल केले.  काल मलेशियाचा ८-१ असा दणदणीत पराभव करत, याआ...

September 12, 2024 1:04 PM

views 23

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड कसोटी सामन्याचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द

अफगाणिस्तान आणि न्यूझीलंड दरम्यानच्या एकमेव क्रिकेट कसोटी सामन्याचा आजचा सलग चौथ्या दिवसाचा खेळही पावसामुळे रद्द करावा  लागला. उत्तर प्रदेशात ग्रेटर नोएडा इथल्या शहीद विजय सिंह पथिक स्टेडियममध्ये आयोजित हा सामना एकही चेंडू टाकल्याविनाच रद्द होण्याची शक्यता असून उद्या सकाळी याबाबतचा निर्णय घेतला जाईल...

September 12, 2024 1:51 PM

views 24

FIDE बुद्धीबळ स्पर्धेत मोरोक्को आणि जमैकावर मात करत भारताची दमदार सुुरुवात

४५ व्या FIDE बुद्धीबळ स्पर्धेच्या कालच्या पहिल्याच दिवशी भारताने खुल्या गटात मोरोक्कोवर आणि महिलांच्या गटात जमैकावर मात करत दमदार सुुरुवात केली. सुरुवातीच्या सामन्यात डी गुकेश हा पहिल्या फेरीतून बाहेर पडल्यानंतर आर प्रज्ञनंद यानं सर्वोत्तम खेळ करत मोरोक्कोच्या तिसीर मोहम्मद याला पराभूत केलं. त्यानंत...

September 11, 2024 8:32 PM

views 35

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल

भारतीय संघ आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत दाखल झाला आहे. चीनमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत आज उपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत भारताने गतविजेत्या मलेशियावर आठ विरूद्ध एक असा दणदणीत विजय मिळवला. राजकुमार पालने तीन, अराईजीतसिंह हुंडल ने दोन, तर जुगराजसिंह, हरमनप्रीत सिंह आणि उत्तमसिंह यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.