खेळ

November 3, 2024 1:27 PM

views 16

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोडची हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक

भारताची बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिनं हायलो ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत तिनं डेन्मार्कच्या प्रतिस्पर्ध्याचा २३-२१, २१-१८ असा थेट गेम्समध्ये पराभव केला. तिचा अंतिम फेरीचा सामना आज रात्री डेन्मार्कच्याच, सातव्या मानांकित मिया ब्लिचफेल्ड हिच्याशी ह...

November 3, 2024 2:54 PM

views 39

एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय – फ्रेंच जोडीला दुहेरीचं विजेतेपद

काँगोमध्ये सुरु असलेल्या एटीपी चॅलेंजर टेनिस स्पर्धेत करण सिंग आणि फ्लोरेंट बॅक्स या भारतीय - फ्रेंच जोडीनं दुहेरीचं विजेतेपद पटकावलं. त्यांनी इटलीच्या सिमोन आणि दक्षिण आफ्रिकेच्या अॅलेक बेकली या जोडीला सरळ सेटमध्ये पराभूत केलं. हे या जोडीचं पहिलं व्यावसायिक विजेतेपद ठरलं आहे. या विजेतेपदासोबतच करण ...

November 2, 2024 7:02 PM

views 28

भारत-न्यूझीलंड कसोटी सामन्यात पहिल्या डावाअखेर मोठी आघाडी घेण्याची संधी भारतानं गमावली

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी क्रिकेट मालिकेतल्या मुंबईच्या वानखेडे मैदानावर सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशीही दोन्ही संघांचे मिळून १५ गडी बाद झाले. आजच्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा न्यूझीलंडनं आपल्या दुसऱ्या डावात ९ बाद १७१ धावा केल्या होत्या. भारताच्या वतीनं रविंद्...

November 2, 2024 2:26 PM

views 13

१९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताची एक सुवर्ण, तीन रौप्य पदकांची कमाई

अमेरिकेच्या कोलोराडो इथं सुरू असलेल्या १९ वर्षांखालच्या जागतिक मुष्टीयुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या कृषा वर्मानं सुवर्णपदक जिंकलं. तिनं जर्मनीच्या लेरिका हिचा ५-० असा पराभव केला. ४८ किलो वजनी गटात चंचल चौधरी, ५७ किलो वजनी गटात अंजली सिंग, तर पुरुषांच्या ७५ किलो वजनी गटात राहुल कुंडू यांना मात्र ...

November 2, 2024 9:49 AM

views 19

मुंबईत न्यूझीलंडविरूद्ध कसोटी सामन्यात भारत पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर

मुंबईत सुरू असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारत न्यूझीलंडविरुद्ध पहिल्या डावात 149 धावांनी पिछाडीवर आहे. काल दिवसअखेर भारताच्या 4 बाद 86 धावा झाल्या होत्या.   शुभमन गिल 31 आणि ऋषभ पंत 1 धावांवर खेळत आहेत. तत्पूर्वी न्यूझीलंडचा डाव 235 धावांवर संपुष्टात आला. भारताकडून रविंद...

November 1, 2024 2:05 PM

views 18

आय पी एल साठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती

आय पी एल अर्थात इंडियन प्रीमियर लीगच्या येत्या २०२५ हंगामासाठी पुन्हा एकदा हार्दिक पांड्याची मुंबई इंडियन्स संघाच्या कर्णधारपदी नियुक्ती झाली आहे. २०२४ च्या आय पी एल हंगामासाठी रोहित शर्माच्या जागी त्याला कर्णधारपद दिलं होतं.   याआधीही मुंबई इंडियन्सचं प्रतिनिधित्व केलेल्या हार्दिकनं मधल्या काळ...

November 1, 2024 10:03 AM

views 18

भारत – न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी क्रिकेट सामना आजपासून मुंबईत

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतला तिसरा आणि अंतिम सामना आजपासून मुंबईत वानखेडे स्टेडीयमवर खेळला जाणार आहे. न्यूझीलंडने या मालिकेतले दोन सामने जिंकून दोन-शून्य अशी विजयी आघाडी घेतली आहे.

November 1, 2024 10:00 AM

views 7

वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत भारताच्या मानसी अहलावतने पटकावलं कास्य पदक

  अल्बानीयातील तिराना इथे झालेल्या वरिष्ठ जागतिक कुस्ती स्पर्धेत, महिला गटात, भारताच्या मानसी अहलावत हिने 59 किलो वजनी गटात कास्य पदक पटकावलं. काल रात्री खेळल्या गेलेल्या या सामन्यात मानसीने कॅनडाच्या लॉरेन्स ब्यूरेगार्ड हिच्यावर 5-0 अशी मात केली.

October 29, 2024 8:08 PM

views 29

भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माची एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर झेप

आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं आज महिला क्रिकेटची ताजी क्रमवारी जाहीर केली. यात भारताची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्मा हीनं एकदिवसीय गोलंदाजांच्या क्रमवारीत, इंग्लंडच्या सोफी हीला मागे टाकत दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. दीप्तीची ही कारकिर्दीतली सर्वोत्तम क्रमवारी ठरली आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमव...

October 29, 2024 7:34 PM

views 17

महिला क्रिकेट सामन्यात भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान

महिला क्रिकेटमधे अहमदाबाद इथं झालेल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढे विजयासाठी २३३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडचा सामन्यातला एक चेंडू बाकी असताना २३२ धावांवर आटोपला. ब्रुक हॅलिडेच्या ८६ धावांमुळे त्यांच्या धावसंख्येला आकार मिळाला. भारतातर्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.