खेळ

November 12, 2024 8:40 PM

views 9

महिलांच्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत दक्षिण कोरियावर भारताचा विजय

महिलांच्या आशियाई करंडक हॉकी स्पर्धेत भारतानं तीन वेळच्या विजेत्या दक्षिण कोरियाचा ३-२ असा पराभव केला. बिहारमधे राजगीर इथं हा सामना झाला. भारतातर्फे संगीता कुमारीनं तिसऱ्याच मिनिटाला पहिला गोल केला. दिपीका सेहरावतनं दोन गोल केले.  भारतानं काल मलेशियावर ४-० नं मात करत विजयी सलामी दिली. सलग दोन विजयां...

November 12, 2024 8:28 AM

views 10

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं बिहारमध्ये उद्घाटन, भारताची विजयी सलामी

महिलांच्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेचं उद्घाटन काल बिहारमध्ये राजगीर इथं मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या हस्ते झालं. कालच्या आपल्या पहिल्या सामन्यात भारतीय महिला संघानं मलेशियावर 4-0 असा विजय मिळवला. दरम्यान, जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यात झालेल्या उद्घाटनाच्या सामन्यात 2-2 अशी बरोबरी झाली. अन्य...

November 11, 2024 8:34 PM

views 14

महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारताकडून मलेशियाचा ४-० असा पराभव

बिहार इथं सुरू असलेल्या महिला हॉकी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने मलेशियाचा ४-० असा पराभव केला. भारताच्या संगीता कुमारीच्या शेवटच्या गोलने भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं. त्याआधी जपान आणि दक्षिण कोरिया यांच्यातला उद्घाटनपर सामना २-२ असा अनिर्णित राहिला.  या स्पर्धेत भारतासह जपान दक्षिण कोरिया...

November 11, 2024 2:08 PM

views 28

रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार मॅथ्यू एब्डेन आज रात्री इटलीत तुरिन येथे टेनिस एटीपी स्पर्धेत खेळणार

भारताचा आघाडीचा खेळाडू रोहन बोपण्णा आणि त्याचा ऑस्ट्रेलियन साथीदार मॅथ्यू एब्डेन आज रात्री इटलीत तुरिन इथं टेनिस एटीपी स्पर्धेत खेळणार आहेत. साखळी फेरीत पहिल्या लढतीत भारत-ऑस्ट्रेलियन जोडीचा सामना इटलीच्या अँड्रिया वावासोरी आणि सिमोन बोलेली या जोडीशी आज रात्री १० वाजून २० मिनिटांनी सुरू होणार आहे. स...

November 11, 2024 1:32 PM

views 16

भारताच्या अनाहत सिंगनं पटकावलं स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेचं विजेतेपद

भारताच्या अनाहत सिंगनं सिडनी इथं सुरू असलेल्या स्क्वॉश एनएसडब्ल्यू ओपन २०२४ स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद पटकावलं आहे. तीचं हे वर्षातील सातवं पीएसए चॅलेंजर विजेतेपद आहे. अंतिम फेरीत सिंगनं हाँगकाँगच्या १५ वर्षीय हेलन तांगचा ३-१ असा पराभव केला.

November 11, 2024 10:48 AM

views 37

दुसऱ्या टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेकडून भारताचा पराभव

दक्षिण आफ्रिकेनं काल गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क मैदानावर झालेल्या क्रिकेट सामन्यात भारताचा तीन गडी राखून पराभव केला. भारतानं केलेल्या 125 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेनं 19 षटकांतच 7 गडी गमावून 128 धावा पूर्ण केल्या. ट्रिस्टन स्टब्सनं 47 धावांवर नाबाद राहत लक्षणीय खेळी खेळली....

November 11, 2024 10:33 AM

views 13

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक स्पर्धेला आजपासून बिहारमधील राजगीर इथं सुरुवात

महिला आशियाई हॉकी अजिंक्यपद चषक 2024 स्पर्धेला आजपासून बिहारमधील नालंदा इथल्या राजगीर इथं सुरुवात होत आहे. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या हस्ते या क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन होईल. या स्पर्धा दहा दिवस चालणार आहेत, असं बिहार क्रीडा प्राधिकरणाचे महासंचालक रवींद्रन शंकरन यांनी आकाशवाणी बोलताना सा...

November 10, 2024 8:09 PM

views 40

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातला दुसरा टी-ट्वेंटी क्रिकेट सामना गकेबेरा इथं सुरू आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला.  भारताच्या फलंदाजीची सुरुवात मात्र खराब झाली. संघाच्या केवळ ५ धावाच झाल्या असताना भारताचे दोन्ही सलामीवर तंबूत परतले. त्यानंतर क...

November 10, 2024 5:00 PM

views 15

भारताच्या सिंद्रेला दासने इटलीतील WTT यूथ कंटेंडर स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत विजेतेपद पटकावलं

क्रीडा जगतात, सध्या भारतीय खेळाडू आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध खेळप्रकारांत घवघवीत यश मिळवत आहेत. इटलीत आयोजित टेबल टेनिसच्या डब्ल्यू.टी.टी. यूथ कंटेंडर या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सिंड्रेला दास हिनं पंधरा वर्षांखालील मुलींच्या एकेरी गटात किताब पटकावला आहे. विशेष म्हणजे अंतिम फेरीत सिंड्रेलानं प्रस्तिस...

November 10, 2024 2:27 PM

views 5

भारत – दक्षिण आफ्रिका यांच्यात आज रंगणार क्रिकेट टी-20 मालिकेतला दुसरा सामना

भारत - दक्षिण आफ्रिका क्रिकेट टी-20 मालिकेतला दुसरा सामना आज संध्याकाळी गकेबरहा इथल्या सेंट जॉर्ज पार्क क्रिकेट मैदानावर होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार सामना रात्री साडेआठ वाजता सुरू होईल. मालिकेतील तिसरा सामना बुधवारी सेंच्युरियनमध्ये तर चौथा सामना शुक्रवारी जोहान्सबर्ग इथं होणार आहे. मालिकेतला ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.