खेळ

December 5, 2024 1:35 PM

views 14

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतला पहिला सामना ब्रिस्बेन इथं सुरु आहे. भारतीय संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मात्र, भारतीय फलंदाज फारशी चमक दाखवू शकले नाहीत. भारताच्या हरमनप्रीत कौर, जेमिमा रॉड्रिग्ज, स्मृती मंधाना फारशी चमक न दाखवता माघारी परतल्या....

December 4, 2024 8:17 PM

views 51

क्रिकेट : १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारताचा विजय

क्रिकेटमध्ये १९ वर्षांखालील आशिया कप स्पर्धेत भारतानं संयुक्त अरब अमिरातीवर दहा गडी राखून विजय मिळवला. यूएईच्या  १३८ धावांचं आव्हान भारतानं सतराव्या षटकातच पूर्ण केलं. आयुष म्हात्रेनं ६७ तर वैभव सूर्यवंशीने ७६ धावा करत भारताच्या  विजयावर शिक्कामोर्तब केलं.  त्याआधी संयुक्त अरब अमिरातीनं  नाणेफेक जिं...

December 4, 2024 8:21 PM

views 32

पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या विजेतपदासाठी भारताची पाकिस्तानशी लढत

ओमान इथं सुरू असलेल्या पुरुषांच्या हॉकी ज्युनियर आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम फेरीत भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. हा सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री साडे आठ वाजता सुरू होईल. काल या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय संघानं मलेशियाला ३-१ ने नमवत अंतिम फेरी गाठली होती. तर पाकिस्तानी संघानं जप...

December 4, 2024 2:26 PM

views 12

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश चा सामना चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार

सिंगापूर इथे सुरू असलेल्या जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या डी. गुकेश याचा सामना आज दुपारी चीनच्या डिंग लायरेन याच्याशी होणार आहे. दुपारी २ वाजून २० मिनिटांनी हा सामना सुरू होईल. ही या स्पर्धेची आठवी फेरी आहे. काल गुकेश आणि डिंग यांच्यात झालेला सातव्या फेरीचा सामना बरोबरीत सुटला होता.  

December 4, 2024 10:18 AM

views 10

पुरुषांच्या हॉकी कनिष्ठ गट आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ अंतिम फेरीत दाखल

ओमान मधील मस्कत इथे सुरू असलेल्या पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतीय संघाने मलेशिया संघाचा 3-1 असा पराभव करत, स्पर्धेची अंतिम फेरी गाठली. भारतातर्फे दिलराज सिंह, रोहित आणि शारदानंद तिवारी यांनी गोल करत संघाला अंतिम फेरीत स्थान मिळवून दिलं. आज होणाऱ्या अंतिम सामन...

December 3, 2024 2:36 PM

views 8

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं जिंकलं सुवर्णपदक

43व्या कनिष्ठ गट राष्ट्रीय खो-खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या आणि मुलींच्याही संघानं सुवर्णपदक जिंकत आपलं वर्चस्व अबाधित राखलं आहे. मुलांच्या संघानं या स्पर्धेच्या इतिहासातला 35 वा विजय नोंदवत त्यांचा सलग 19 वा विजय साजरा केला, तर मुलींच्या संघानं सलग दहावं आणि एकूण 26 वं विजेतेपद पटकावलं. मुं...

December 3, 2024 2:31 PM

views 7

आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात भारताच्या पवन कामपेल्ली यानं पटकावलं कांस्य पदक

थायलंड मधल्या बँकॉक इथं सुरु असलेल्या आशियायी इ- क्रीडा स्पर्धांमधल्या इ- फुटबॉल क्रीडा प्रकारात काल भारताच्या पवन कामपेल्ली यानं कांस्य पदक पटकावलं. या क्रीडास्पर्धांमधलं भारताचं हे पहिलंच पदक आहे. पवन कामपेल्ली यानं इंडोनेशियाच्या असगर्द अझिझीवर २-१ अशी मात केली. पवननं गेल्या महिन्यात वेव्ज इ स्पो...

December 3, 2024 2:23 PM

views 17

गिनी देशात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू

गिनी देशात एनझेरेकोर शहरात फुटबॉल सामन्यादरम्यान झालेल्या हिंसाचार आणि चेंगराचेंगरीच्या घटनेत ५६ जणांचा मृत्यू झाला आहे. सरकार सर्वप्रकारची मदत करत असल्याचं सांगून गिनीचे राष्ट्राध्यक्ष मामाडी डौम्बोया यांनी मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन केलं आहे. दुर्घटनेची कारणं शोधण्यासाठी प्रधानमंत्री अमादोउ ओर...

December 3, 2024 10:20 AM

views 15

कनिष्ठ आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत उपांत्यफेरीत

पुरुषांच्या कनिष्ठ आशिया चषक स्पर्धेच्या उपान्त्य फेरीत आज भारतीय संघाची मलेशिया बरोबर लढत होणार आहे. ओमानमध्ये मस्कत इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार रात्री साडेआठ वाजता हा सामना सुरू होईल. या आधी रविवारी झालेल्या सामन्यानं भारतानं दक्षिण कोरियाचा 8 विरुद्ध 1 गोलाने पराभूत करून अ गटात अव्वल स्थान मिळवलं ...

December 2, 2024 7:43 PM

views 4

बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला सामना अनिर्णित

जागतिक बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय ग्रँडमास्टर डी. गुकेश आणि चीनचा डिंग लिरेन यांच्यातला आणखी एक सामना अनिर्णित राहिला. सलग तिसरा सामना बरोबरीत सुटल्यानं अंतिम फेरीत लिरेन आणि गुकेश यांचे प्रत्येकी ३ गुण झाले आहेत. दोन्ही खेळाडूंना अजूनही विजेतेपदासाठी प्रत्येकी साडेचार गुणांची आवश्यकता आहे. ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.