खेळ

December 29, 2025 2:33 PM December 29, 2025 2:33 PM

views 3

न्यूझीलंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलची क्रिकेटमधून निवृत्ती

न्यूझीलंडचा अनुभवी अष्टपैलू क्रिकेटपटू डग ब्रेसवेलने आंतरराष्ट्रीय आणि स्थानिक क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. ३५ वर्षीय ब्रेसवेल गेल्या काही काळापासून दुखापतींशी झुंजत होता. आणि त्यामुळेच त्याने हा निर्णय घेतला. ब्रेसवेलने न्यूझीलंडसाठी अनेक ऐतिहासिक विजयांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. २०२...

December 28, 2025 7:52 PM December 28, 2025 7:52 PM

views 7

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत वैदेही चौधरीला एकेरी गटाचं विजेतेपद

डब्ल्यु ३५ सोलापूर टेनिस स्पर्धेत आज वैदेही चौधरी हिनं महिला एकेरी गटाचं विजेतेपद पटकावलं. अंतिम सामन्यात वैदेहीनं जपानच्या मिचिका ओझेकी हिचा ३-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. तत्पूर्वी उपांत्य फेरीत वैदेहीनं वैष्णवी अडकरचा पराभव करून अंतिम फेरी गाठली होती.

December 26, 2025 3:26 PM December 26, 2025 3:26 PM

views 10

पी व्ही सिंधूची बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड

दोन वेळा ऑलिंम्पिक पदक विजेती भारतीय बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूची २०२६ ते २९ या कालावधीसाठी बॅडमिंटन जागतिक महासंघ अॅथलीट्स आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. या भूमिकेत, सिंधू जागतिक बॅडमिंटनच्या धोरणांमध्ये आणि प्रशासनात बॅडमिंटनपटूंचा आवाज बळकट करण्यासाठी काम करेल.

December 26, 2025 1:37 PM December 26, 2025 1:37 PM

views 8

भारत आणि श्रीलंका यांच्यातील तिसरा टी-20 सामना आज तिरूवनंतपुरममध्ये

महिला क्रिकेटमध्ये भारत विरुद्ध श्रीलंका तिसरा टी-ट्वेंटी सामना आज तिरूवनंतपुरम इथं होणार आहे. संध्याकाळी सात वाजता सामन्याला सुरूवात होईल. पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय महिला संघ दोन – शून्यने आघाडीवर आहे.

December 25, 2025 7:29 PM December 25, 2025 7:29 PM

views 13

संसद क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप

देशभरात आयोजित केलेल्या संसद क्रीडा महोत्सव २०२५ चा समारोप आज झाला. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना दूरस्थ पद्धतीने संबोधित केलं. उत्तर मुंबईत कांदिवली इथल्या मैदानावरही क्रीडा महोत्सवाच्या समारोपाचा कार्यक्रम झाला. यावेळी वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल उपस्थित होते. 

December 25, 2025 11:29 AM December 25, 2025 11:29 AM

views 14

भारतीय पुरुष हॉकी संघाचा उपकर्णधार हार्दिक सिंहला मेजर ध्यान चंद खेल रत्नसाठी नामांकन

हार्दिकनं, 2020 मध्ये टोक्यो आणि 2024 मध्ये पॅरिस ऑलिंपिकमध्ये कांस्यपदक जिंकण्यात महत्वाचं योगदान दिलं आहे. दरम्यान, 24 क्रीडापटूंना अर्जुन पुरस्कारासाठी नामांकन मिळाले आहे. यामध्ये प्रथमच योगासनासाठी आरती पाल, रायफल साठी मेहुली घोष, महिला बॅडमिंटन जोड़ी ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांचाही समाव...

December 21, 2025 1:30 PM December 21, 2025 1:30 PM

views 211

१९ वर्षांखालील क्रिकेट आशिया चषक अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून  प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा भारताचा निर्णय

भारत आणि पाकिस्तानच्या १९ वर्षांखालच्या मुलांच्या संघांमध्ये आज दुबई इथं आशिया चषक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना सुरु आहे. या सामन्यात भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. त्यानंतर पाकिस्ताननं आपल्या डावाला वेगानं सुरुवात केली. भारतानंही चौथ्याच षटकात सलामीवीर हमझा याला बाद करत...

December 21, 2025 9:16 AM December 21, 2025 9:16 AM

views 29

BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीला कांस्यपदक

बॅडमिंटनमध्ये, काल चीनमधील हांगझोऊ इथं झालेल्या BWF वर्ल्ड टूर फायनल्स 2025 या स्पर्धेत सात्विक साईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या भारतीय जोडीनं कास्यपदक मिळवलं. उपांत्य फेरीत त्यांना चीनच्या जोडीकडून पराभव पत्करावा लागला होता. या स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दुसऱ्यांदा पदकाची कामगिरी केली आहे. याप...

December 20, 2025 7:17 PM December 20, 2025 7:17 PM

views 1.1K

आयसीसी पुरुष टी-२० विश्वचषक २०२६ साठी भारताचा संघ जाहीर

आगामी आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव याच्याकडे देण्यात आलं असून उपकर्णधारपद अक्षर पटेलकडे असेल. या संघाची घोषणा आज बीसीसीआयनं केली. इशान किशन आणि रिंकू सिंह यांनी संघात पुनरागमन केलं आहे. सलामीचे फलंदाज संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा यांची नावं नक्की झालं आहे. य...

December 20, 2025 2:56 PM December 20, 2025 2:56 PM

views 41

दक्षिण अफ्रिकेविरुद्ध T20 क्रिकेट मालिकेत भारत विजयी

दक्षिण अफ्रिकेविरुद्धची टी-ट्वेंटी क्रिकेट मालिका भारतानं ३-१ अशी जिंकली. अहमदाबाद इथं काल झालेल्या पाचव्या सामन्यात भारतानं दक्षिण अफ्रिकेवर ३० धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारताच्या संघानं २० षटकांत २३१ धावा केल्या. तिलक वर्मानं ७३ तर हार्दिक पांड्यानं ६३ धावा केल्या. हार्दिक पांड्यान...