प्रादेशिक बातम्या

June 14, 2024 7:50 PM

views 32

आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना सर्व आवश्यक सोयी सुविधा देण्याचे राज्य सरकारचे प्रशासनाला आदेश

    आषाढी वारीच्या पालखी सोहळ्याकरता पंढरपूर पालखी मार्ग, पालखी तळ आदी ठिकाणी पाणी, वीज, आरोग्य आणि स्वच्छतेच्या पुरेशा सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज संबंधित विभागांना दिले. ते पुणे इथल्या विधान भवनात झालेल्या श्री क्षेत्र देहू आणि श्री क्षेत्र ...

June 14, 2024 3:23 PM

views 26

राजापूरमधील अणुस्कुरा घाटात कोसळलेली दरड हटवण्याचं काम अद्याप सुरू

राजापूरला कोल्हापूरशी जोडणाऱ्या अणुस्कुरा घाटात काल रात्री दरड कोसळल्यामुळे हा मार्ग बंद झाला होता. दरड हटवण्यासाठी राजापूर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. जेसीबीच्या साह्याने ही दरड बाजूला हटवण्याचं काम सुरू आहे. मोठे खडक फोडण्यासाठी ब्लास्टिंग मशीन...

June 14, 2024 11:44 AM

views 30

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेकडून शिवाजी शेंडगेंना उमेदवारी जाहीर

विधानपरिषदेच्या मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी शिवसेनेनं शिवाजी शेंडगे यांना पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाचे काल यासंदर्भातलं पत्रक जारी केलं. विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ तारखेला निवडणूक होणार आहे.

June 14, 2024 8:56 AM

views 28

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या तीन हजारावर विद्यार्थ्यांना समारंभपूर्वक पदवी प्रदान

मराठवाड्याच्या अत्यंत वैभवशाली आणि प्राचीन परंपरांचा वारसा पुढे नेण्याचं काम डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या माध्यमातून होत असल्याचे गौरवोद्गार, राज्यपाल रमेश बैस यांनी काढले. विद्यापीठाच्या ६४व्या दीक्षांत समारंभात काल राज्यपाल दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून बोलत होते. कुलगुरु ...

June 14, 2024 8:45 AM

views 30

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी गेल्या सहा दिवसांपासून सुरु असलेलं उपोषण काल मागे घेतलं. सरकारी शिष्टमंडळानं काल आंतरवाली सराटी इथं जाऊन जरांगे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला. या शिष्टमंडळात छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदिपान भुमरे, मंत्री शंभुराज देसाई, आमदार राणा जगजितसिं...

June 13, 2024 7:52 PM

views 49

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस पुढच्या तीन चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.    येत्या दोन दिवसात कोकण आणि विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.   गेल्या चोवीस तासात कोकणात बऱ्याच...

June 13, 2024 7:45 PM

views 46

‘घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळण्यासाठी शासन प्रयत्नशील’

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतल्या मृतांच्या नातेवाईकांना अधिकची मदत मिळवून देण्यासाठी शासन प्रयत्न करणार असल्याचं  मदत आणि  पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी मंत्रालयात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत आज सांगितलं. या दुर्घटनेतील १७ मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ५ लाख रुपये आणि राज्य ...

June 13, 2024 7:32 PM

views 23

आवक घटल्याने कांद्याच्या दरात वाढ

आवक घटल्याने कांद्याच्या दरात पाच ते दहा रुपयांची वाढ झाली आहे.  नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची २५ ते ३० रुपये किलो दराने विक्री होत आहे. कांद्याचा साठा कमी झाल्यामुळे आवक घटली असून त्याचा परिणाम किमतीवर झाल्याचं कांदा व्यापाऱ्यांनी सांगितलं. 

June 13, 2024 7:27 PM

views 27

नागपुरात स्फोटक कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू, ३ जखमी

नागपुरात धामणी परिसरात स्फोटकांच्या कंपनीत झालेल्या स्फोटात ६ जणांचा मृत्यू झाला असून ३ जण जखमी झाले आहेत. चामुंडा एक्स्प्लोझिव्ह कंपनीत दुपारी ही दुर्घटना घडली. पोलीस आणि स्थानिक बचाव पथक याठिकाणी मदत कार्य करत आहे. मृतांच्या कुटुंबीयांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आर्थिक मदत देण्याचं आश्वासन उपम...

June 13, 2024 7:28 PM

views 51

मनोज जरांगेंच उपोषण स्थगित

मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी आंतरवली सराटी इथं सुरू असलेलं आपलं उपोषण स्थगित केलं आहे. मंत्री शंभुराज देसाई, संदिपान भुमरे यांनी मनोज जरांगे यांची भेट घेऊन त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्याचं आश्वासन दिलं आहे.   सरकार सग्या सोयऱ्यांच्या कायद्याबद्दल सकारात्मक असून यावर एका महिन्यात नि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.