प्रादेशिक बातम्या

June 15, 2024 3:20 PM

views 56

वडाळ्यात इमारतीची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू

मुंबई उपनगरात वडाळा इथं काल एका तीन मजली इमारतीची भिंत कोसळून झालेल्या अपघातात दोन महिलांचा मृत्यू झाला. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीनं बचावकार्य सुरु केलं. या दुर्घटनेत जखमी झालेल्या या दोन महिलांना शीव इथल्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आलं. 

June 15, 2024 10:51 AM

views 35

साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करण्याची राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाची मागणी

साखर कारखान्यांकडून घेतल्या जाणाऱ्या घाऊक साखरेच्या, किमान विक्री दरात ३१ वरून ४१ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढ करण्याची मागणी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी काल पुण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. साखर उद्योगासंदर्भात महासं...

June 15, 2024 10:07 AM

views 38

उन्हाळी सुट्यानंतर शाळांच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ

उन्हाळी सुट्यानंतर राज्य शिक्षण मंडळाच्या नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून प्रारंभ होत आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अनेक शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव साजरा करण्यात येणार असून, त्यासाठी शालेय शिक्षण विभागाने तयारी केली आहे. जिल्ह्यातल्या महानगरपालिकेच्या सर्व शाळा, बालवाड्या, १६ जिल्हा परिषदेच्या शाळ...

June 15, 2024 9:13 AM

views 28

कृषी निविष्ठांच्या कृत्रिम टंचाई प्रकरणी धडक कारवाई

राज्यात कृषी निविष्ठांची कृत्रिम टंचाई भासवली जात असून, या प्रकरणी धडक कारवाई केली जात असल्याचं, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी सांगितलं आहे. ते काल बीड इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात बी-बियाणे, खते, कीटकनाशकांचा कुठेही तुटवडा भासू देणार नाही, याबाबत शासन स्तरावर कृती दल नेमून नियोजन करण्यात...

June 15, 2024 1:21 PM

views 55

आषाढी वारीत सहभागी दिंड्यांना २० हजार रुपये अनुदान

पंढरपूरच्या आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या दिंड्याना वीस हजार रुपयांचं अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  पालखी सोहळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल मुंबईत झालेल्या  बैठकीत ते बोलत होते.   वारकऱ्यांस...

June 14, 2024 7:53 PM

views 39

राज्य विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै दरम्यान

राज्य विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन २७ जून ते १२ जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. या अधिवेशनात २८ जून रोजी राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे. या अधिवेशनाचं कामकाज १३ दिवस चालणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आज हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीला विध...

June 14, 2024 7:23 PM

views 36

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थींच्या हिताला धक्का पोहोचणार नाही – धर्मेंद्र प्रधान

नीट ची परीक्षा देणाऱ्या परीक्षार्थीच्या हिताला धक्का पोहोचणार नाही याची काळजी केंद्र सरकार घेईल, असं आश्वासन आज केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी दिलं. विद्यार्थ्यांच्या समस्या समभावाने आणि सुयोग्य पद्धतीने सोडवू असं ते म्हणाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ठ असून सर्वोच्च न्यायालयाच्या न...

June 14, 2024 7:51 PM

views 22

राज्यातल्या सुमारे साडे बाराशे महसुली मंडळात चारा डेपो उभारायला राज्य सरकारची परवानगी

राज्यातल्या अनेक भागात पावसाचं आगमन झालं असलं तरी अनेक विभागात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही म्हणून १ हजार २४५ महसुली मंडळात चारा डेपो उभारायला शासनानं परवानगी दिली आहे. राज्याचे महसूल तथा पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास मंत्री, राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. शासनाच्या या निर्णयाम...

June 14, 2024 6:33 PM

views 59

धुळे शहरात माजी आमदार अनिल गोटे यांचं बेमुदत उपोषण आंदोलन

धुळे शहरात प्रस्तावित नविन रस्ता तयार करण्याच्या कामात अडथळा आणणार्‍या यंत्रणेविरोधात माजी आमदार अनिल गोटे यांनी आज बेमुदत उपोषण आंदोलन सुरु केलं. धुळे शहरातून जाणार्‍या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते कृषी महाविद्यालयपर्यंत रस्ता रुंदीकरण करण्याच्या आणि अधिकरणाच्या कामासाठी ४२ कोटींचा निधी देण्या...

June 14, 2024 6:10 PM

views 16

पंढरपूरची वारी करणाऱ्या मुस्लीम धर्मीय बनाभाई सय्यद यांचं निधन

अहमदनगर जिल्ह्यातलं आदर्श गाव म्हणून प्रख्यात असलेल्या हिवरे बाजार इथल्या बनाभाई चांदभाई सय्यद यांचं आज वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९२ वर्षांचे होते. मुस्लीम धर्मीय असूनही ते पंढरपूर,आळंदी,देहू इत्यादी तीर्थक्षेत्राची नियमित वारी करत असत. त्यामुळं त्यांना राष्ट्रीय एकात्मतेचं प्रतीक म्हणून संबोधलं ज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.