प्रादेशिक बातम्या

June 29, 2024 7:01 PM

views 43

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा विजय वडेट्टीवार यांचा दावा

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय हा विधीमंडळाचा हक्कभंग असल्याचा दावा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत केला. याप्रकरणी हक्कभंग दाखल करणार असल्याचं ते म्हणाले. माजी अर्थमंत्री जयंत पाटील यांनीही त्याला दुजोरा दिला.  अर्थसंकल्पाच्या मंजुरीची प्रक्रिया डावलून हा शासन निर्ण...

June 29, 2024 6:53 PM

views 19

हिवताप , डेंगी, आजारांच्या प्रतिबंधासाठी मुंबई महानगरपालिकेची जनजागृती मोहीम

मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीनं हिवताप, डेंगी आजारांच्या प्रतिबंधासाठी ‘ भाग मच्छर भाग’ ही विशेष जनजागृती मोहीम राबवत आहे. साचलेल्या पाण्यात डासांची उत्पत्ति होऊन डासांमार्फत हे आजार होतात. म्हणून नागरिकांनी घराच्या आसपास पाणी साचणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच ताप आल्यास त्वरित वैद्यकीय...

June 29, 2024 6:42 PM

views 17

शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवलं

शिवसेनेचे बीड जिल्हाप्रमुख कुंडलिक खांडे यांना पदावरून हटवण्यात आलं आहे. पक्षानं निवेदनाद्वारे या संदर्भात माहिती दिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत खांडे यांनी विरोधी पक्षाचे उमेदवार बजरंग सोनावणे यांना मदत केल्याची ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली होती. तसंच त्यांना एका मारहाण प्रकरणात अटक झाली आह...

June 29, 2024 6:35 PM

views 16

मुंबईत फौजदारी न्याय व्यवस्थेच्या प्रशासनात भारताचा प्रगतीशील मार्ग” विषयावर परिषद

“भारतीय न्याय संहिता 2023”, “भारतीय साक्ष अधिनियम, 2023”, आणि “भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023” हे तीन नवीन फौजदारी कायदे 1 जुलै 2024 पासून  देशभर लागू होणार आहेत. या कायद्यांची माहिती सर्वसामान्यांना व्हावी, यासाठी केंद्रीय विधी आणि  न्याय मंत्रालयानं उद्या मुंबईतल्या वरळी इथल्या एनएससीआय सभागृह ...

June 29, 2024 6:14 PM

views 22

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल- आशीष शेलार

आगामी विधानसभा निवडणुका महायुतीच जिंकेल असा विश्वास भाजपचे मुंबई अध्यक्ष आशीष शेलार यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या कोअर कमिटीची बैठक आज मुंबईत झाली. त्यानंतर शेलार बोलत होते. यात राज्य सरकारनं सादर केलेल्या अर्थसंकल्पावर अभिनंदन ठराव झाला. विध...

June 29, 2024 7:25 PM

views 21

जनतेला विश्वासात घेऊन राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल – मंत्री दादा भुसे

जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे ...

June 29, 2024 3:37 PM

views 31

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्य...

June 29, 2024 10:51 AM

views 25

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात...

June 29, 2024 10:24 AM

views 30

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.  

June 29, 2024 9:26 AM

views 32

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.