प्रादेशिक बातम्या

November 3, 2025 7:13 PM

views 107

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेत्री दया डोंगरे यांचं आज वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ८५ वर्षांच्या होत्या. अनेक मराठी चित्रपट आणि नाटकांमधून त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. मंतरलेली चैत्रवेल, लेकुरे उदंड जाहली, संकेत मीलनाचा ही त्यांची काही गाजलेली नाटकं तर नवरी मिळे नवऱ्याला, मायबाप, आत्मविश्वास, उंबरठा हे...

November 3, 2025 4:00 PM

views 43

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा

सप्टेंबर महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात आल्याची माहिती राज्याचे जलसंपदा आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.  दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसरातल्या भात पिकांच्या नुकसानीची त्यांनी आज पाहणी केली.  मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांना नुकसानीबाबत...

November 3, 2025 3:37 PM

views 85

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना काल पंजाबमधल्या घुमान इथं संत नामदेव महाराज सन्मान पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर शिंदे यांनी महाराष्ट्र सदनाचं भूमिपूजन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्राच्या आणि गुरु गोविंदसिंहांचा पंजाब संतांचा आणि शूरांचा आहे. राजगुरू आणि भगतसिंहांचा क्रा...

November 3, 2025 3:31 PM

views 44

वैद्यकीय महाविद्यालय आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकारचं प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार

प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. औंंध इथं बहुउद्देशीय दंंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि औंधचं जिल्हा शासकीय रुग्...

November 2, 2025 8:30 PM

views 71

कार्तिकी एकादशीनिमित्त पंढरपूरमधे शासकीय महापूजा संपन्न

कार्तिकी एकादशीनिमित्त आज विठ्ठल मंदिरांमधे गर्दी झाली आहे.  कार्तिक शुद्ध एकादशी हा चातुर्मासाचा समारोप मानला जातो. आषाढी एकादशीपासून सुरु केलेली अनेक व्रत वैकल्यं आणि उपक्रमांचं उद्यापन केलं जातं. आषाढ शुद्ध एकादशीला निद्रधीन झालेले देव आज कार्तिक एकादशीला जागे होतात अशी लोकधारणा आहे. आषाढीप्रमाणे...

November 2, 2025 7:22 PM

views 26

६७व्या आकाशवाणी संगीत संमेलनाचं मुंबईत उद्घाटन

६७व्या  आकाशवाणी संगीत संमेलनाचं आज मुंबईत  उद्घाटन झालं. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार, आणि ज्येष्ठ गायक अरुण कशाळकर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आकाशवाणी मुंबईच्या सभागृहात झालेल्या  या कार्यक्रमात  हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत गायक पद्मश्री पंडित वेंकटेश कुमार तसंच...

November 2, 2025 6:50 PM

views 29

महाराष्ट्रात ऊस गाळप हंगामाला सुरुवात

राज्यात साखर गाळप हंगामाला कालपासून सुरुवात झाली. पहिल्याच दिवशी २८ साखर कारखान्यांना गाळप परवाने देण्यात आले आहेत. आणखी ३३ कारखान्यांच्या परवान्यांची तपासणी साखर आयुक्तालयाकडून सुरू असून, दोन दिवसांत त्यावर निर्णय होणार आहे.   राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते यांनी सांगितलं की, उर्वरित कारख...

November 2, 2025 4:21 PM

views 99

नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांना प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र मिळणार

उद्योग आणि कौशल्य विकास क्षेत्रात महाराष्ट्राला आघाडीवर न्यायच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून नाशिक आणि अमरावती या दोन जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक ‘सी-ट्रिपल आयटी’ केंद्र शासनानं मंजूर केलं आहे. या अंतर्गत, ‘सेंटर फॉर इन्व्हेन्शन, इनोव्हेशन, इन्क्युबेशन अँड ट्रेनिंग अर्थात, संशोधन, नवसंकल्पना आणि उद्यो...

November 1, 2025 7:33 PM

views 42

पालघरमध्ये पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉनचं आयोजन

नागरिकांमध्ये राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ करण्यासाठी पालघर जिल्ह्यातल्या सर्व पोलिस ठाण्यांच्या हद्दीत ‘रन फॉर युनिटी’ मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आयोजित या उपक्रमात पोलीस दलातले अधिकारी,  अंमलदार तसंच सुमारे ८,००० नागरिकांनी सहभाग घेतला. याव...

November 1, 2025 7:25 PM

views 29

नागपूर स्कील सेंटरमुळे युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल – मंत्री नितीन गडकरी

नागपूर स्कील सेंटरमुळे विदर्भातल्या लाखो युवकांच्या रोजगाराचं स्वप्न साकार होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला आहे.  नागपूर स्कील सेंटर  या कौशल्य विकास उपक्रमाचं  लोकार्पण आज गडकरी यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. स्‍मार्ट शहरांसोबत स्‍मार्ट गावं देखील निर्माण ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.