प्रादेशिक बातम्या

July 11, 2024 7:33 PM

views 23

समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

भ्रष्टाचारामुळे पंचावन्न हजार कोटी रुपये खर्च करुन बांधलेल्या मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला वर्षभरात भेगा पडल्या आहेत,  असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला. ते विधीमंडळ परिसरात आज  प्रसारमाध्यमांशी बोलत होते. केंद्रात आणि राज्यात भाजपा सरकार असून सुद्धा  मराठा आणि धनगर आरक्षणा...

July 11, 2024 7:20 PM

views 32

अंगणवाडी उभारणी, दुरुस्तीसाठी अर्थसंकल्पात प्रस्ताव – मंत्री आदिती तटकरे

राज्यात अंगणवाडी उभारणी, दुरुस्ती यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यासाठी आवश्यक प्रस्ताव करण्यात येईल, अशी माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. याबाबतचा प्रश्न मोनिका राजळे यांनी उपस्थित केला होता. राज्यातील सर्व अंगणवाड्या स्मार्ट करण्यासाठी प्रयत्न सुरू असून वित्त आयोग, जि...

July 11, 2024 7:03 PM

views 27

संसदेत आणि विधिमंडळात सर्वपक्षियांनी मैत्रीपूर्ण संवाद ठेवण्याचं उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं आवाहन

संसदेत आणि विधीमंडळात सर्व पक्षीयांमध्ये संवादाची गरज आहे. सर्वांनी परस्परांमध्ये मैत्रीपूर्ण आणि सहकार्यात्मक संवाद ठेवावा असं आवाहन उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी आज केलं. ते आज मुंबईत विधानभवनात राज्य विधीमंडळाच्या सदस्यांना संबोधित करत होते. सर्वांनी आत्मपरीक्षण करावं, सत्ताधारी आणि विरोधक एकत्र ...

July 11, 2024 7:07 PM

views 31

सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्यावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती  देऊन  त्यांचं  थकित वीजबिल माफ करावं, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज विधानसभेत केली. निसर्गाची अवकृपा आणि सरकारकडून होणारी फसवणूक यामुळे शेतकरी पिळवटून निघाला आहे. त्यामुळे शेतकरी आत्...

July 11, 2024 4:27 PM

views 23

क्रीडा पत्रकारितेसाठी जीवन गौरव पुरस्कार प्रदान

ज्येष्ठ क्रीडापत्रकार सुहास जोशी, खेळाडू विजया नर आणि विलास दळवी यांना पॉवरलिफ्टिंग असोसिएशननं नुकतंच जीवन गौरव पुरस्कारानं सन्मानित केलं. विलास दळवी यांनी राष्ट्रीय स्पर्धेत अनेकदा पॉवरलिफ्टिंग खेळामध्ये पुरस्कार मिळवले आहेत. महाराष्ट्र शासनाच्या सेवानिवृत्त कक्ष अधिकारी आणि शिवछत्रपती पुरस्कार विज...

July 11, 2024 4:23 PM

views 27

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं – आमदार अबू आझमी

राज्य सरकारने मुस्लिमांना आरक्षण द्यावं, अशी मागणी आमदार अबू आझमी यांनी आज विधानसभेत केली. यावर संविधानात धर्मावर आधारित आरक्षणाची तरतूद नाही, त्यामुळं मुस्लिमांमधल्या मागास जातींना आरक्षण दिली असल्याची प्रतिक्रिया कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.   छत्रपती शिवाजी महाराजांनी वापरलेली...

July 11, 2024 4:20 PM

views 24

१८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवणार – तानाजी सावंत

देशाला २०२५ सालापर्यंत क्षयमुक्त करण्याच्या प्रयत्नात १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना क्षयरोगाची लस देण्याची मोहीम राज्यात राबवण्यात येईल, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी विधानसभेत दिली. याबाबतचा प्रश्न विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला होता. २०२२ साली राज्यात २ लाख ३३ हजार ८७२ ...

July 11, 2024 12:17 PM

views 21

नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्थेच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

निविदा आणि खरेदी प्रक्रियेतल्या कथित भ्रष्टाचार प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभाग म्हणजे सीबीआयनं नागपूरमधील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था म्हणजे निरीच्या माजी संचालकांसह दहा जणांविरुद्ध तीन वेगवेगळे गुन्हे दाखल केले आहेत. महाराष्ट्र, हरियाणा, बिहार आणि दिल्लीत 17 ठिकाणी काल छापेही घालण...

July 11, 2024 11:25 AM

views 19

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या बायोमायनिंग प्रकल्पासाठी महिनाभरात कार्यादेश-उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेमार्फत शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी बायोमायनिंग प्रकल्प सुरु करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची निविदा प्रक्रिया राबवण्यात आली असून त्याचे कार्यादेश येत्या महिन्याभरात देण्यात येतील, अशी माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली. यासंबंधी ...

July 11, 2024 2:53 PM

views 26

उपराष्‍ट्रपती जगदीप धनखड राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना संबोधित करणार

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आज दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. राज्य विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांना ते आज संबोधित करतील. आपल्या दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी उपराष्ट्रपती मुंबईतल्या नरसी मोनजी इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज या संस्थेच्या विद्यार्थ्यांना संबोधित करणार आहेत.    

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.