प्रादेशिक बातम्या

June 29, 2024 7:25 PM June 29, 2024 7:25 PM

views 5

जनतेला विश्वासात घेऊन राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल – मंत्री दादा भुसे

जनतेला विश्वासात घेऊन आणि स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधूनच राज्यातील प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाची पुढची प्रक्रिया केली जाईल,अशी ग्वाही सार्वजनिक बांधकाम उपक्रम मंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली. या महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध असल्याचं सांगत हा महामार्ग रद्द करावा अशी मागणी काँग्रेसचे ...

June 29, 2024 3:37 PM June 29, 2024 3:37 PM

views 15

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे – उपमुख्यमंत्री अजित पवार

पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, यासाठी सरकार बांधिल आहे. यासंदर्भात विरोधी पक्षानं दिलेल्या सूचनांचा सकारात्मक विचार करेल , असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिलं. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवर, माजी अध्यक्ष नाना पटोले आदी सदस्यांनी विधानसभेत ‘नीट’ परीक्षेत झालेल्य...

June 29, 2024 10:51 AM June 29, 2024 10:51 AM

views 9

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात ७ जणांचा जागीच मृत्यू

समृद्धी महामार्गावर जालना हद्दीत झालेल्या अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला. कडवंची गावाजवळ दोन मोटारींची समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. जखमींवर जालना जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. अपघातातील गंभीर जखमींना पुढील उपचारसाठी जालना जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात...

June 29, 2024 10:24 AM June 29, 2024 10:24 AM

views 10

पुण्यातील अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक

पुण्यातील अमली पदार्थ सेवन प्रकरणी पोलिसांनी तीन अमली पदार्थ विक्रेत्यांना अटक केली आहे. त्यातील एकजण नायजेरियन तर दोन पुण्यातील आहेत. यातल्या एका आरोपीने L3 हॉटेलच्या पार्टीमध्ये ड्रग्स पुरवले होते. L3 बारवर झालेल्या कारवाईमध्ये आतापर्यंत १३ जणांना अटक केली आहे.  

June 29, 2024 9:26 AM June 29, 2024 9:26 AM

views 15

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ साठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्र राज्याचा २०२४-२५ या आर्थिक वर्षासाठीचा अतिरिक्त अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. महिला, शेतकरी, दुर्बल घटक आणि युवकांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या या अर्थसंकल्पात एकूण खर्चासाठी 6 लाख १२ हजार २९३ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यात महस...

June 28, 2024 7:42 PM June 28, 2024 7:42 PM

views 12

ठाण्यात दुसऱ्या दिवशीही महापालिकेची धडक कारवाई

ठाणे शहरात आज सलग दुसऱ्या दिवशीही पब्ज, बार आणि अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या अवैध बांधकामाविरोधातली महापालिकेची धडक कारवाई सुरू राहिली.  महापालिका कार्यक्षेत्रातल्या शाळा, महाविद्यालयापासून १०० मीटरच्या आत असलेल्या एकूण ४० पानटपऱ्या आणि हॉटेल, पब्ज, बार अशा ९ ठिकाणी  ही कारवाई झाली.

June 28, 2024 7:32 PM June 28, 2024 7:32 PM

views 13

राज्याच्या सादर झालेल्या अतिरीक्त अर्थसंकल्पावर विरोधकांची टीका

फसव्या योजनांची ठिगळं लावलेला खोकेसंकल्प अशी टीका विधानसभेतले विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली. सरकारनं निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अर्थसंकल्पाच्या नावाखाली महायुतीचा निवडणूक जाहीरनामाच सादर केला आहे, असा आरोप त्यांनी केला.     हा अर्थसंकल्प आश्वासनांची अतिवृष्टी आणि थापांचा महापूर असून...

June 28, 2024 7:25 PM June 28, 2024 7:25 PM

views 11

‘सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय’ असा अर्थसंकल्प – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अतिशय प्रगतिशील, सर्वजन हिताय, सर्वजन सुखाय असा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी व्यक्त केली.    शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचा क्रांतीकारक निर्णय घेत बळीराजाच्या कष्टाचा आदर आणि सन्मान या अर्थसंकल्पात केल्याचं मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुन...

June 28, 2024 6:33 PM June 28, 2024 6:33 PM

views 6

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्याचा अतिरिक्त अर्थसंकल्प हा सर्वसामान्यांचा अर्थसंकल्प असून महिला आणि बेरोजगारांना आर्थिक ताकद देण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केली. केंद्राकडून राज्यांना मिळणाऱ्या कर हिश्श्यात वाढ होण्याची अपेक्षा असून अर्थसंकल्पात पर्यायांचा विचार केल्याचं अ...

June 28, 2024 5:53 PM June 28, 2024 5:53 PM

views 11

महिलांसाठी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा

बहुचर्चित मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा आजच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्र्यांनी केली. या अंतर्गत २१ ते ६० वर्ष वयोगटातल्या पात्र महिलांना दरमहा दीड हजार रुपये आर्थिक मदत दिली जाणार आहे. यासाठी एकूण ४६ हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. राज्यातल्या अडीच कोटींहून अधिक महिलांना याचा ला...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.