प्रादेशिक बातम्या

July 20, 2024 11:07 AM

views 26

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एका गर्भवतीसह 2 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या आता 27 झाली असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे. यामध्ये 11 गर्भवती आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरातल्या 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा...

July 20, 2024 11:17 AM

views 27

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी ६०० कोटी रुपयांचा निधी – पालकमंत्री उदय सामंत

राज्यातल्या १९३ एसटी बसस्थानकांसाठी महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून ६०० कोटी रुपयांचा निधी दिला आहे, अशी माहिती उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज दिली. रत्नागिरी जिल्ह्यात पाली इथं तीन कोटी ३४ लाख रुपये खर्च करून नव्यानं उभारलेल्या एसटी बसस्थानकाचं लो...

July 20, 2024 9:27 AM

views 29

शिवरायांच्या शौर्याचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्यामध्ये दाखल होणं महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद -मुख्यमंत्री

शिवकालीन महाराष्ट्र हे भारताच्या इतिहासातील सोन्याचं पान आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे खऱ्या अर्थानं रयतेचे राजे होते. त्यांच्या शूरतेचं, वीरतेचं प्रतीक असलेली वाघनखं साताऱ्याच्या पवित्र भूमीत दाखल झाली आहेत हा महाराष्ट्रासाठी भाग्याचा दिवस आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल केलं. ...

July 20, 2024 9:45 AM

views 20

वादग्रस्त प्रशिक्षणार्थी सनदी अधिकारी पूजा खेडकर विरोधात यूपीएससीकडून गुन्हा दाखल

 केंद्रीय लोकसेवा आयोग-यूपीएससीने नागरी सेवा परीक्षा २०२२ तुकडीच्या प्रशिक्षणार्थी अधिकारी पूजा मनोरमा दिलीप खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आयोगाने कलेल्या सखोल तपासणीत, पूजा खेडकर यांनी अनेकदा त्यांच्या नावात, स्वाक्षरी आणि ईमेल तसच मोबाईल क्रमांकात बदल करून आयोगाची फसवणूक केल्याचं निष्...

July 19, 2024 8:12 PM

views 16

विशाळगडाभोवती असलेलं कोणतंही बांधकाम पावसाळ्यात पाडलं जाणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

कोल्हापूरमधल्या विशाळगड किल्ल्याच्या भोवती असलेलं कोणतंही बांधकाम पावसाळ्यात पाडलं जाणार नाही याची काळजी घ्यावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने आज राज्य सरकारला दिले आहेत. विशाळगड परिसरात अतिक्रमणविरोधी मोहीम राबवल्यानंतर हिंसाचार उसळल्याच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने हे निर्देश दिले असून या हिं...

July 19, 2024 8:07 PM

views 26

कोकणात गणपतीक जाऊचा? रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय

गणेशोत्सवाच्या काळात होणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनानं १ ते १८ सप्टेंबर या काळात गणपती विशेष रेल्वे गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार, मुंबई सीएसएमटी स्थानक ते सावंतवाडी आणि रत्नागिरी, लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडी आणि कुडाळ, तसंच दिवा जंक्शन ते चिपळूण दरम्यान दोन...

July 19, 2024 7:48 PM

views 28

नागपूर जिल्हा परिषदेच्या १ आणि पंचायत समित्यांच्या ४ जागांसाठी ११ ऑगस्टला पोटनिवडणूक

नागपूर जिल्हा परिषदेच्या एका आणि विविध पंचायत समित्यांच्या चार जागांच्या पोटनिवडणुकांसाठी येत्या ११ ऑगस्ट रोजी मतदान होणार आहे, असं राज्य निवडणूक आयोगानं आज जाहीर केलं. २३ ते २९ जुलै या कालावधीत उमेदवारी अर्ज भरता येतील. ३० जुलै रोजी छाननी होईल. उमेदवारांची यादी आणि निवडणूक चिन्हाचं वाटप ५ ऑगस्टला ह...

July 19, 2024 7:38 PM

views 30

राज्यात विविध ठिकाणी पावसाची हजेरी

कोल्हापूर जिल्ह्यात आज दिवसभर जोरदार पाऊस सुरु आहे. गगनबावडा, भुदरगड, राधानगरी, आजरा, चंदगड आणि शाहूवाडी तालुक्यात धुवांधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातली चारही धरणं पूर्ण क्षमतेनं भरली असून, धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरु झाल्यामुळे नद्यांच्या पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्ह्यातल्या नद्यांवरचे ७४ ब...

July 19, 2024 7:25 PM

views 27

मुंबई उपनगरातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद – पालकमंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी एक हजार १२ कोटी जिल्हा वार्षिक योजनेसाठी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७१ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनेसाठी ५ क...

July 19, 2024 7:20 PM

views 12

मविआ विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार – काँग्रेस सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल

महाविकास आघाडी आगामी विधानसभा निवडणुकीला एकत्र सामोरी जाणार असून तिन्ही घटकपक्ष एकत्र बसून जागावाटपावर चर्चा करतील, अशी माहिती अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी दिली आहे. काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज मुंबईत बैठक झाल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या बैठकीत का...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.