प्रादेशिक बातम्या

July 6, 2024 7:23 PM July 6, 2024 7:23 PM

views 9

जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा आर्थिक गुन्हे शाखेचा अहवाल

मुंबईत जोगेश्वरी इथल्या कथित भूखंड घोटाळ्याप्रकरणी शिवसेना खासदार रविंद्र वायकर यांच्याविरोधातला तपास बंद करण्याचा अहवाल मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेनं दिला आहे. मुंबई पोलिसांकडून या प्रकरणी वायकर यांच्यासह त्यांची पत्नी आणि त्यांच्या चार भागिदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र,...

July 6, 2024 7:09 PM July 6, 2024 7:09 PM

views 22

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण दिलं नाही तर राजकीय भूमिका घेण्याचा मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा

मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊन शासनानं या समाजाबद्दलची आस्था दाखवून द्यावी अन्यथा आगामी काळात राजकीय भूमिका घेऊ, असा इशारा आज आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी दिला. हिंगोली शहरात मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीच्या वेळी ते बोलत होते. यावेळी मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली होती. छत्रपती शिवाजी ...

July 6, 2024 7:03 PM July 6, 2024 7:03 PM

views 14

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात

नीती आयोगाच्या संपूर्णता अभियानाला आज अमरावती जिल्ह्यातल्या धऱणी तालुक्यात सुरुवात झाली. या अभियानात ज्या निकषांची पूर्तता करायची आहे त्यांची माहिती स्थानिक नागरिकांना या कार्यक्रमात देण्यात आली. शिक्षण, आरोग्य, कृषी, पोषण आहार या क्षेत्रांमध्ये शंभर टक्के परीपूर्णता साधण्याचं आवाहन उपस्थित अधिकाऱ्य...

July 6, 2024 6:51 PM July 6, 2024 6:51 PM

views 9

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी पुणे जिल्ह्यातून मार्गस्थ होत आहे. या संपूर्ण पालखी मार्गावर जिल्हा परिषदेच्या आरोग्याची वारी- पंढरीच्या वारी या माध्यमातून आतापर्यंत १ लाख ४६ हजार ८१३ वारकऱ्यांना मोफत आरोग्य सेवा दिली आहे.पालखी मार्गावर वारकऱ्यांना जिल्हा परिषदेकडून सर्व ...

July 6, 2024 4:27 PM July 6, 2024 4:27 PM

views 10

राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध – मंत्री चंद्रकांत पाटील

राज्यातल्या महिलांना मुख्य प्रवाहात आणून त्यांना सक्षम करण्यासाठी शासन वचनबद्ध असल्याचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं. सोलापुरातल्या अनुसयाबाई रामचंद्र बुर्ला महिला महाविद्यालयात विद्यार्थिनींच्या कृतज्ञता मेळाव्यात ते आज बोलत होते. महिलांनी स्वावलंबी व्हावं यासाठी शासन...

July 6, 2024 9:13 AM July 6, 2024 9:13 AM

views 7

स्पर्धा परीक्षेतला गैरव्यवहार रोखण्यासाठी महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक सादर

स्पर्धा परीक्षेत गैरव्यवहार रोखण्यासाठीचं महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा अनुचित मार्ग प्रतिबंध विधेयक महाराष्ट्र विधानसभेत काल मांडण्यात आलं. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा, शिक्षक अभियोग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी आणि शिक्षक पात्रता चाचणी यासह शासनाच्या विविध विभाग आणि प्राधिकरणाकडून घेतल्या जाणाऱ...

July 5, 2024 8:24 PM July 5, 2024 8:24 PM

views 14

सिंधुदुर्गमधील कुडाळ तालु्क्यात पारंपरिक बियाणांची बँक

सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुडाळ तालुक्यातल्या नेरूर गावातील  शेतकरी सूर्यकांत कुंभार यांनी पारंपरिक बियाणांची बँक तयार केली आहे.  गेल्यावर्षी पासून सुरू झालेल्या या बँकेत भाताची ३० प्रकारची विविध वाणं, भाजीपाला,फळभाज्या,कडधान्य अशी बियाणे आहेत. या बँकेतून शेतकऱ्यांना सेंद्रिय पद्धतीची एक किलो पारंपरि...

July 5, 2024 8:03 PM July 5, 2024 8:03 PM

views 13

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिलिटर ३० रुपये आणि पाच रुपयांचं अनुदान देण्याच्या निर्णयाला मंत्रीमंडळाच्या बैठकीत मान्यता मिळाल्याची माहिती पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. हे दर येत्या १ जुलै पासून लागू आहेत. याच बैठकीत दूध पावडरसाठी प्रतिकिलो ३० रुप...

July 5, 2024 7:46 PM July 5, 2024 7:46 PM

views 12

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं – काँग्रेस नेते नाना पटोले

सरकारने फेरीवाल्यांबद्दल ठोस धोरण आखावं तोवर सध्या ऐन पावसाळ्यात फेरिवाल्यांवर होत असलेली कारवाई तात्काळ थांबवावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मुंबईसह राज्यातल्या इतर शहरात अंदाजे ३० लाख फेरीवाले आहेत. २०१४ साली लोकसभेने फेरीवाल्यांसदर्भात कायदा के...

July 5, 2024 7:38 PM July 5, 2024 7:38 PM

views 10

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

नवी मुंबईत फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाल्याबद्दल उच्चस्तरीय समिती नियुक्त करण्यात आली असून दोन महिन्यात समितीचा अहवाल प्राप्त होईल आणि तो विधानसभेच्या पटलावर ठेवण्यात येईल, असं वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत सांगितलं. चार फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाल्याचं त्यांनी सांगि...