प्रादेशिक बातम्या

July 15, 2024 7:44 PM July 15, 2024 7:44 PM

views 1

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा

मध्य महाराष्ट्रात उद्यापर्यंत अतिजोरदार पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे या जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. कालपासून सुरु असलेल्या पावसामुळे मुंबईत सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम झाला. कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी ते विन्हेरे स्...

July 15, 2024 4:00 PM July 15, 2024 4:00 PM

views 12

महाराष्ट्रात वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र शासनाने वारकऱ्यांसाठी स्वतंत्र वारकरी महामंडळाची स्थापना केली असून याचं मुख्यालय पंढरपूर इथंच राहणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरात केली.ते काल पंढरपूरात आषाढी वारीच्या आढावा बैठकीत बोलत होते.यावेळी मंत्री मंडळातले इतर सहकारी आणि अधिकारी उपस्थित होते.   पंढरपू...

July 15, 2024 7:07 PM July 15, 2024 7:07 PM

views 10

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश – जयंत पाटील

प्रस्तावित महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याच्या आधारे शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला आहे. ब्रिटिश सरकारनं स्वातंत्र्यपूर्व काळात आणलेल्या रैालेट ॲक्टच्या धर्तीवर आधा...

July 15, 2024 12:38 PM July 15, 2024 12:38 PM

views 6

पुण्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण

राज्यात झिका या विषाणूजन्य आजाराचे सर्वाधिक रूग्ण पुण्यात आढळले आहेत.राज्यातील एकंदर २१ रूग्णांपैकी १९ रूग्ण पुण्यात, एक कोल्हापूरमध्ये तर एक संगमनेरमध्ये आढळून आला आहे.   राज्यभरात आतापर्यंत २११ गर्भवतींचे रक्तनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यातल्या १० महिलांना झिकाची लागण झाल्याचे आरोग...

July 15, 2024 11:42 AM July 15, 2024 11:42 AM

views 14

राज्याच्या बहुतांश भागात पावसाची संततधार, कोकणात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या बहुतांश भागात कालही पावसाची संततधार सुरू होती. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे.कोकण रेल्वेमार्गावर दिवाणखवटी आणि विन्हेरे या स्थानकांदरम्यान काल दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वेच्या अनेक गाड्यांच्या वेळा बदलण्यात आल्या असून, अनेक गाड्य...

July 15, 2024 11:43 AM July 15, 2024 11:43 AM

views 12

गेल्या १० वर्षांत देशातली हवाई वाहतूक सेवा जगात तिसऱ्या स्थानावर – मुरलीधर मोहोळ

  गेल्या १० वर्षांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात देशातल्या हवाई वाहतूक क्षेत्रानं मोठी प्रगती केली असून जागतिक पातळीवर हे क्षेत्र तिसऱ्या स्थानावर पोहोचल्याचे केंद्रीय नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी काल सांगितले.   पुण्याच्या लोहगाव विमानतळावर नव्याने उभारण्यात ...

July 14, 2024 8:14 PM July 14, 2024 8:14 PM

views 19

आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरातल्या नियोजनाची मुख्यमंत्र्यांकडून पाहणी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पंढरपुरात आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारीचा आढावा घेऊन सोई-सुविधांची पाहणी केली. वारीमध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता भासू दिली जाणार नाही, वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. या वर्षी पंढरपुरात स्वच्छता व्यवस्था ...

July 14, 2024 7:15 PM July 14, 2024 7:15 PM

views 11

मुंबईसह कोकणात पावसाची संततधार

राज्यात आजही अनेक भागात पावसाची संततधार सुरु आहे. मुंबई ठाण्यासह उपनगरात सकाळपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळल्या.  मुंबईत दादर आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकांदरम्यान झाड पडल्यामुळं पश्चिम रेल्वेची सेवा काही काळ विस्कळीत झाली, मात्र ती लगेचच पूर्ववत झाली. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे अनेक नद्यां...

July 14, 2024 7:05 PM July 14, 2024 7:05 PM

views 13

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त

मुंबई सीमा शुल्क विभागाच्या पथकानं मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज ४ किलो २७ ग्रॅम पेक्षा अधिक वजनाचा आणि १ कोटी ९५ लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला. बँकॉकहून आलेल्या एका भारतीय नागरिकाकडे खाद्यपदार्थ आणि खेळण्यांच्या बॉक्समध्ये लपवून ठेवलेला गांजा आढळल्यानंतर त्याला अंमली पदार्थ आणि सायकोट्रॉपिक...

July 14, 2024 6:55 PM July 14, 2024 6:55 PM

views 4

आगामी विधानसभेत समाजवादी पार्टी महाराष्ट्रात ३० ते ३५ जागा लढवणार असल्याची पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांची माहिती

समाजवादी पार्टी महाराष्ट्रात इंडिया आघाडीसोबत विधानसभा निवडणूक लढवणार असून ३० ते ३५ जागा लढवण्याचा पक्षाचा विचार आहे, अशी माहिती पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष प्रतापराव होगाडे यांनी वार्ताहर परिषदेत दिली. तसंच, धाराशिव जिल्ह्यातल्या परंडा विधानसभा मतदार संघावर पार्टीचा दावा राहणार असल्याचंही ते यावेळी ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.