प्रादेशिक बातम्या

November 9, 2025 9:00 AM

views 43

गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल – मुख्यमंत्र्यांचा विश्वास

आरोग्य व्यवस्था भक्कम झाल्यामुळं गडचिरोली जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेत अमूलाग्र परिवर्तन घडून येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. अहेरी इथल्या महिला आणि बाल रुग्णालयाचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत आता २ ...

November 8, 2025 8:18 PM

views 111

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत प्रमुख प्रचारकांची संख्या दुप्पट

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या प्रचारासाठी राजकीय पक्षांच्या प्रमुख प्रचारकांची संख्या २० वरून वाढवून ४० करण्यात आली आहे. अनेक दिवसांपासून विविध पक्षांकडून ही मागणी होत होती. राजकीय पक्षांना प्रमुख प्रचारकांची यादी संबंधित जिल्हाधिकारी किंवा महानगरपालिका आयुक्त यांच्याकडे सादर करावी लागेल.

November 8, 2025 7:09 PM

views 54

नवी मुंबईत सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक

नवी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सायबर फसवणुक करणाऱ्या १२ जणांच्या टोळीला अटक केली आहे. ऑनलाईन गेमिंगद्वारे फसवणूक करणाऱ्या या टोळीनं  आतापर्यंत सुमारे ८४ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचं  उघड  झालं आहे. यासाठी या टोळीनं देशभरातल्या विविध बँकांची तब्बल ८८६ खाती वापरली होती. पोलिसांच्या कारवाईत ५२ मो...

November 8, 2025 7:07 PM

views 43

कुडाळ MIDCमध्ये पडीक भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ एमआयडीसीत वर्षानुवर्षे  भूखंड पडीक ठेवत त्यावर उद्योग न उभारलेल्या भूखंडधारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिलेत. कुडाळ एमआयडीसी इंडस्टीज असोसिएशनतर्फे बॅ नाथ पै शिक्षण संस्थेच्या सभागृहात उद्योगमंत्री उदय सामंत यांचा आज सत्कार करण्यात ...

November 9, 2025 8:42 AM

views 194

महिला आणि बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार जाहीर

महिला आणि बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांना महाराष्ट्र सरकारतर्फे दरवर्षी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर पुरस्कार दिला जातो.  अलिकडेच २०२०-२१, २०२१-२२ आणि २०२२-२३ या तीन वर्षांचे पुरस्कार जाहीर झाले. जाहीर झालेल्या पुरस्कारांत चंद्रपूर जिल्ह्यातल्या नीता पंत्त, जागृती फाटक आणि अॅडव्होक...

November 8, 2025 7:03 PM

views 31

राज्यातल्या जमीन व्यवहारांची श्वेतपत्रिका काढून हिवाळी अधिवेशनात चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई, पुण्यासह संपूर्ण राज्यभरात कोट्यवधी रुपयांचे भूखंड कवडीमोल भावाने लाटले जात असून या सर्व जमीन व्यवहाराची श्वेतपत्रिका काढावी आणि हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा करावी अशी मागणी, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली. मुंबईत टिळक भवन इथं ते आज वार्ताहर परिषदेत बोलत होते. पुण्यात कोरे...

November 8, 2025 6:59 PM

views 38

गडचिरोलीत विविध विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

गडचिरोलीचा उल्लेख महाराष्ट्राचं प्रवेशद्वार म्हणून होण्यासाठी शेवटच्या गावापर्यंत विकास पोहोचवण्याकरता राज्यसरकार प्रयत्नशील आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा इथं रुबी हॉस्पीटल, वेलनेस रुग्णालय  आणि महाविद्यालय संकुलाचं उद्घ...

November 8, 2025 6:29 PM

views 35

मनोज जरांगे यांना पोलिसांचे समन्स

मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आणि इतर पाच जणांना यांना मुंबई पोलिसांनी येत्या सोमवारी तपास अधिकाऱ्यांसमोर हजर होण्याचं समन्स बजावलं आहे. सप्टेंबर महिन्यात मुंबईच्या आझाद मैदानावर जरांगे यांनी केलेल्या उपोषणादरम्यान मुंबई उच्च न्यायालयानं घालून दिलेल्या दिशानिर्देशांचं उल्लंघन झाल्याचा प...

November 8, 2025 6:25 PM

views 69

शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या तयार करायची प्रक्रिया सुरू

निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार पुणे, नागपूर आणि औरंगाबाद विभागातले पदवीधर मतदारसंघ, तसंच पुणे आणि अमरावती विभागातल्या शिक्षक मतदारसंघांच्या द्विवार्षिक निवडणुकांसाठीच्या मतदार याद्या नव्यानं तयार करायची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी नागरिकांना mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस...

November 8, 2025 5:57 PM

views 37

‘सिंधुदुर्गात निवडणूक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक’

सिंधुदुर्ग जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक महायुती म्हणून लढण्यासाठी शिवसेना सकारात्मक आहे, मात्र युती झाली नाही तर शिवसेना स्वबळावर लढण्यासाठी तयार असल्याचं मंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. ते आज सिंधुर्ग इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंधुदुर्गात नारायण राणे हे महायुतीचे नेते आहेत, त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.