प्रादेशिक बातम्या

August 4, 2024 3:07 PM

views 27

पालकमंत्री अजित पवार यांचेकडून पुणे जिल्ह्यातल्या पूर परिस्थितीचा आढावा

पुणे जिल्ह्यातल्या अनेक नद्यांच्या पाणी पातळीत झालेली वाढ आणि त्यामुळे या नद्यांवरच्या धरणांमधून वाढवलेल्या पाण्याच्या विसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांमझल्या पूरपरिस्थितीचा आ...

August 4, 2024 7:05 PM

views 22

राज्याच्या अनेक ठिकाणी धरणातल्या पाण्याचा विसर्ग

मुंबईसह राज्यभरात आज पावसाचा जोर असून अनेक ठिकाणी धरणांमधला विसर्ग वाढवल्यामुळे नद्यांकाठच्या गावांमधल्या नागरिकांना प्रशासनानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पुणे जिल्ह्यात खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा विसर्ग वाढवून आजपासून ३५ हजार २ क्युसेक इतका केला आहे. पानशेत, वरस...

August 4, 2024 2:55 PM

views 30

राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार

महायुती सरकारच्या लोककल्याणकारी योजना आणि सरकारचं कार्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे राज्यात ‘जनसन्मान’ यात्रा काढण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार  या यात्रेच्या निमित्तानं सर्व जिल्ह्यांचा दौरा करणार आहेत.  यात्रेसाठी सात समन्वयकांची तर आठ सहसमन्वयकांची यादी प्रदेशा...

August 4, 2024 1:56 PM

views 35

अन्य राज्यातील विद्यार्थ्यांनाही आता आयुर्वेदाच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी राज्यात प्रवेश मिळणार

अन्य राज्यातून बी ए एम एस केलेल्या महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना पदव्युत्तर आयुर्वेदिक शिक्षणासाठी राज्याच्या कोट्यातून प्रवेश देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. मुंबईत काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी...

August 4, 2024 1:46 PM

views 35

मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता

भारतीय हवामान विभागानं आज मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोव्यातल्या घाट भागात अतिवृष्टीची शक्यता वर्तवली आहे. तसंच पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानमध्ये अत्यंत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. नैऋत्य राजस्थान आणि त्याच्या आजूबाजूच्या परिसरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे हा मुसळधार पाऊस...

August 4, 2024 9:56 AM

views 28

महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात संततधार पावसामुळं धरणं भरली, नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा

महाराष्ट्रात, पुणे जिल्ह्यातील खडकवासला, पवना, मुळशी, चासकमान धरणांच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून धरणं पूर्ण क्षमतेनं भरली आहेत. या धरणांमधून मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरु करण्यात येत आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहर आणि परिसरातील नद्यांच्या पूररेषेलगतच्या तसेच कोयना धरणातूनही ...

August 4, 2024 9:49 AM

views 33

पुण्यात निळ्या पूररेषेतील नागरिकांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी आराखडा तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

पुण्यात नुकत्याच आलेल्या पुरामुळे निर्माण झालेली परिस्थिती, वारंवार उद्भवू नये म्हणून, निळ्या पूररेषेतील नागरिकांचं,कायमस्वरूपी पुनर्वसन करण्यासाठी जिल्हाधिकारी, पुणे महानगरपालिका आणि जलसंपदा विभाग यांनी समन्वयानं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं आराखडा तयार करावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पु...

August 3, 2024 7:38 PM

views 38

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगरात पोलिसांना पुरेशा सदनिकांसाठी तातडीने प्रस्ताव तयार करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यासमवेत मुख्यमंत्र्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर उपाययोजना कर...

August 3, 2024 7:34 PM

views 35

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष – अतुल लोंढे

भाजपा हा संविधान आणि लोकशाही न मानणारा पक्ष असल्याची टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे केली आहे. ते आज नागपुरात बातमीदारांशी बोलत होते. नागपुरात म्हाळगीनगर आणि मानेवाडा वळण रस्त्याच्या उड्डाण पुलाचा भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला काँग्रेसच्या स्थानिक आमदारांना निमंत्रण दि...

August 3, 2024 7:31 PM

views 26

राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारण्यात येणार

विद्यार्थ्यांना राज्य घटनेचं महत्व पटवून देण्यासाठी राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि १६३ तांत्रिक महाविद्यालयांमध्ये संविधान मंदिर उभारलं जाणार आहे. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं येत्या १५ ऑगस्ट रोजी एकत्रितपणे या संविधान मंदिरांचं उद्घाटन ऑनलाइन होणार असल्याची माहिती मंत्री मं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.