प्रादेशिक बातम्या

July 25, 2024 7:48 PM July 25, 2024 7:48 PM

views 15

‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’ योजनेला चांगला प्रतिसाद

‘‘एसटी पास थेट तुमच्या शाळेत’’ योजनेला चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या महिन्यात ४ लाखापेक्षा जास्त विद्यार्थ्यांना पास मिळाले आहेत. १८ जूनला ही योजना सुरु झाली. त्यानंतर केवळ १२ दिवसात ४ लाख ३ हजार २९४ विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळेत जाऊन एसटी कर्मचाऱ्यांनी प्रवास पास वितरित केले. ही संख्या गेल्या ...

July 25, 2024 7:43 PM July 25, 2024 7:43 PM

views 21

‘रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी’

रत्नागिरी शिक्षण विभागाला जेईई आणि नीट प्रवेश परीक्षांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमाकरिता १ कोटी रुपयांचा निधी दिला जाईल, अशी घोषणा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरी इथं केली. रत्नागिरी नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण सप्ताह सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद...

July 25, 2024 7:36 PM July 25, 2024 7:36 PM

views 11

‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार’

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे दरवर्षी १० लाख कार्य प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध होणार असून कुशल आणि रोजगारक्षम महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी या योजनेची मदत होईल, असं कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी म्हटलं आहे. सह्याद्री अतिथीगृहात 'मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योज...

July 25, 2024 7:30 PM July 25, 2024 7:30 PM

views 8

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि सोलापूर इथं कांदा महाबँक सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. सह्याद्री अतिथीगृहात कांदा महाबँक प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यावेळी त्यांनी हे निर्देश दिले. कांद्यावर अणुऊर्जेद्वारे विकिरण ...

July 25, 2024 7:22 PM July 25, 2024 7:22 PM

views 10

मुंबईतील १० टक्के पाणी कपात मागे, प्रशासनाचा निर्णय

जुलै महिन्यात पडलेल्या दमदार पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही तलावांच्या पाणीसाठ्यामध्ये ६६ टक्क्यापेक्षा जास्त भर पडली आहे. तुळशी, तानसा, विहार आणि मोडकसागर हे जलाशय पूर्ण क्षमतेनं भरले आहेत. या पार्श्वभूमीवर, मुंबईत सध्या लागू असलेली १० टक्के पाणी कपात येत्या २९ जुलै पासून मागे घेण्याचा...

July 25, 2024 7:27 PM July 25, 2024 7:27 PM

views 18

राज्यात बचावकार्य वेगानं सुरू – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

राज्यात ज्या-ज्या ठिकाणी पूरसदृश् परिस्थिती आहे, तिथं बचाव कार्य वेगानं सुरु आहे, मात्र नागरिकांनी देखील आवश्यकता असेल तरच, घराच्या बाहेर पडावं असं आवाहन, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या तुकड्या, लष्कर, नौदल, पोलीस, अग्निशमन दल, आरोग्य यंत्रणा या स...

July 25, 2024 7:14 PM July 25, 2024 7:14 PM

views 13

पावसामुळे राज्यात जनजीवन विस्कळीत

राज्याच्या विविध भागांमध्ये आज पावसामुळं जनजीवन विस्कळीत झालं. पुण्याला या पावसाचा सर्वाधिक फटका बसला. खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात विसर्ग केल्यामुळे पुणे शहराच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरलं. सिंहगड रस्त्यावर एकता नगरमध्ये NDRF आणि लष्कराच्या जवानांनी नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवलं. उपमुख्यमं...

July 25, 2024 7:19 PM July 25, 2024 7:19 PM

views 8

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी – विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार

राज्यात अतिवृष्टीमुळं हजारो हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान झालं असून अतिवृष्टीमुळं संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना सरकारनं भरीव मदत करावी, अशी मागणी विधानसभेतला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आज केली. हवामान खात्यानं दिलेल्या अतिवृष्टीच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत हो...

July 25, 2024 7:26 PM July 25, 2024 7:26 PM

views 15

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी देण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

राज्यातल्या प्रत्येक शासकीय कार्यालयात पात्र उमेदवारांना इंटर्नशीपची संधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यांनी आज दूरदृष्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचा आढावा घेतला. त्यावेळी ते बालत होते. मंजूर पदाच्या कमीत कमी पाच टक्के, किंवा किमान ...

July 25, 2024 3:24 PM July 25, 2024 3:24 PM

views 9

विधानसभा निवडणुकीत मनसे २२५ ते २५० जागा लढवणार – राज ठाकरे

आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना २२५ ते २५० जागा लढवणार असून त्यादृष्टीनं येत्या १ ऑगस्ट पासून राज्याचा दौरा करणार असल्याची माहिती, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्ता मेळाव्यात दिली. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या लाडकी बहीण योजनेवर टीका केली.