प्रादेशिक बातम्या

August 16, 2024 3:11 PM

views 54

भाजपचे माजी खासदार शिशुपाल पटले यांचा काँग्रेस पक्षात प्रवेश

भंडारा गोंदियाचे भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार शिशुपाल पटले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आज मुंबईत टिळक भवन इथं काँग्रेस पक्षात प्रवेश केला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे पूर्व विदर्भात काँग्रेस पक्ष संघटना अधिक ...

August 16, 2024 7:11 PM

views 21

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी मुंबईत मविआचा मेळावा

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शरद पवार आणि काँग्रेसच्या नेत्यांनी मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करावा, त्याला पाठिंबा देण्याची घोषणा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज मुंबईत महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात बोलत होते. निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी महाविकास आघाडी तयार असून ही मह...

September 25, 2024 6:03 PM

views 1.5K

विधानसभा निवडणुक : वंचित बहुजन आघाडीचं निवडणूक चिन्ह ‘गॅस सिलिंडर’

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगानं वंचित बहुजन आघाडी आणि प्रहार जनशक्ती पक्षाला निवडणूक चिन्ह दिलं आहे. वंचित चे सर्व उमेदवार गॅस सिलिंडर तर प्रहारचे उमेदवार बॅट या चिन्हावर निवडणूक लढवतील. जातीय सेना पक्षाला कोबी हे चिन्ह निवडणूक आयोगानं दिलंय.

August 16, 2024 1:32 PM

views 17

भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या सैनिकाच्या हातावर झळकणार पापर्यावरणपूरक राख्या

बहीण भावाच्या प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे राखीपौर्णिमा हा सण. या सणानिमित्त यंदा पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगडमधल्या टेटवाली, वाकी, जांभा, विळशेत, नडगेपाडा, वाणीपाडा आणि गरदवाडी या सात गावातल्या जवळपास दीडशे  महिला आणि पुरुषांनी मिळून 35 हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत.   या पर...

August 16, 2024 3:20 PM

views 16

‘देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार’ विजेत्यांची घोषणा

विश्व संवाद केंद्राचे देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार यंदा अजित गोगटे, धीरज वाटेकर, प्रज्ञा पोवळे, अक्षय मांडवकर, ओंकार दाभाडकर, सचिन गायकवाड, गौरव ठाकूर आणि वनश्री राड्ये यांना दिले जाणार आहेत. उद्या सकाळी ११ वाजता मुंबईत किर्ती महाविद्यालयात पुरस्कार वितरण होईल, असं विश्व संवाद केंद्राने कळवलं आह...

August 15, 2024 6:46 PM

views 24

वाशिम – समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू, तीन जखमी

वाशिम जिल्ह्यात समृद्धी महामार्गावर आज झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. मृतांमधे सात वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातग्रस्त गाडी नागपूरहून मुंबईला जात असताना वाशिम जिल्ह्यात हा अपघात झाला. जखमींना अमरावती इथं रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

August 15, 2024 6:43 PM

views 26

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कोराडी इथल्या क्रीडांगणातून राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू घडतील असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते आज नागपुरजवळच्या कोराडी तालुका क्रीडा संकुल सुविधांचं लोकार्पण आणि हर घर तिरंगा अंतर्गत आयोजित भव्य तिरंगा रॅलीच्या सोहळयात बोलत होते. कोराडीच्या या तालुका क्रीडा संकुलाचं वीर...

August 15, 2024 6:35 PM

views 23

येत्या दोन दिवसांत महाराष्ट्रातील काही भागात पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसांत कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. या कालावधीत मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल, असा अंदाज आहे.

August 15, 2024 6:30 PM

views 12

वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांचं निधन

महिलांच्या आरोग्य प्रश्नांवर आंतरराष्ट्रीय परिषदा गाजविणारे, संवेदनशील, विज्ञानवादी लेखक आणि वैद्यकीय तज्ज्ञ डॉ. शंतनू अभ्यंकर यांचं आज पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झाले. फुफ्फुसाच्या कर्करोगासाठी गेले काही महिने त्यांच्यावर उपचार सुरू होते. वाई इथं त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार क...

August 15, 2024 6:53 PM

views 19

बारामती विधानसभा मतदारसंघातून स्वतः निवडणूक न लढवण्याचे अजित पवार यांचे संकेत

बारामतीतून विधानसभा निवडणूक आपण सात-आठ वेळा लढली असून आता मला ती लढवण्यात स्वारस्य नाही, असं उपमुख्यमंत्री अजित पवार आज म्हणाले. आपला मुलगा जय पवार याला उमेदवारी द्यावी अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यामुळे जय याच्या उमेदवारीविषयी पक्षाचं संसदीय मंडळ निर्णय घेईल, असं पुण्यात वार्ताहरांशी बोलताना त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.