प्रादेशिक बातम्या

August 1, 2024 3:40 PM August 1, 2024 3:40 PM

views 13

कोल्हापूरमध्ये धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी

कोल्हापूर जिल्ह्यात धरण क्षेत्रात अद्यापही अतिवृष्टी होत असून राधानगरी आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. जिल्ह्यातले ७५ बंधारे पाण्याखाली असून, २३ मार्ग बंद आहेत. सांगली जिल्ह्याच्या धरणक्षेत्रातही पाऊस सुरू आहे. कोयना धरणातील विसर्ग वाढल्यामुळे आयर्विन पुलाजवळ नदीनं धोक्याची पातळ...

August 1, 2024 2:38 PM August 1, 2024 2:38 PM

views 9

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त आणि अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वत्र अभिवादन

थोर स्वातंत्र्यसेनानी, भारताच्या स्वातंत्र्य प्रेरणेचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या शतकोत्तर चौथ्या पुण्यतिथी निमित्त आणि समाजसुधारक, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या शतकोत्तर चौथ्या जयंतीनिमित्त आज त्यांना सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. महाराष्ट्रात राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी आज  राज...

August 1, 2024 9:30 AM August 1, 2024 9:30 AM

views 11

रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र कार्यशाळेचं आयोजन

रत्नागिरी जिल्हा उद्योग केंद्रातर्फे काल रत्नागिरीत इग्नाइट महाराष्ट्र या कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं. सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग क्षेत्रासाठीची राज्य आणि केंद्र सरकारची धोरणं आणि उपक्रम याबाबत उद्योजकांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी ही कार्यशाळा घेण्यात आली. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध ...

August 1, 2024 9:14 AM August 1, 2024 9:14 AM

views 6

छत्रपती संभाजीनगर इथं आजपासून “एक तास शहरासाठी” महास्वच्छता अभियान

  छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका आणि स्मार्ट सिटीकडून “एक तास शहरासाठी” हे शहरव्यापी महास्वच्छता अभियान आजपासून येत्या पंधरा तारखेपर्यंत राबवण्यात येणार आहे. आज सकाळी आठ वाजता क्रांती चौकापासून या अभियानाची सुरुवात होईल. आयुक्त तथा प्रशासक जी. श्रीकांत यांच्या संकल्पनेतून हे अनोखं अभियान राबवण्...

August 1, 2024 9:10 AM August 1, 2024 9:10 AM

views 14

राज्य सरकारला राष्ट्रीय सहकार विकास महामंडळाकडून सुमारे सोळाशे कोटी रुपयांची आर्थिक मदत

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहेत. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याचं लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं काल राज्य सरकारला हस्तांतरित केले.

August 1, 2024 8:49 AM August 1, 2024 8:49 AM

views 10

मराठवाड्यातल्या सिंचन योजनांसाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नसल्याची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही

मराठवाड्यातल्या सिंचनाच्या योजनांसाठी निधीची कमतरता पडू देणार दिली जाणार नसून, जे प्रकल्प हाती घेतले आहेत त्यासाठी मान्यता आणि प्रशासकीय बाबी तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. काल मुंबईत मराठवाड्यातल्या सिंचन प्रकल्पाबाबत आढावा बैठकीत ते बोलत होते. इतर माग...

August 1, 2024 8:42 AM August 1, 2024 8:42 AM

views 2

डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा सरकारचा निर्णय

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीनं उभारल्या जाणाऱ्या डिफेन्स क्लस्टर उद्योग समूहात, शिर्डी औद्यगिक वसाहतीची निवड झाली असून, त्यासाठी सवलतीच्या दरात जागा देण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांनी काल ही माहिती दिली. या औद्योगिक नगरीच्या रस्ते आणि वीज विकासासाठी १०० कोट...

July 31, 2024 8:19 PM July 31, 2024 8:19 PM

views 10

राज्यातल्या साखर कारखान्यांसाठी केंद्र सरकारकडून १,९०० कोटी रुपये मंजूर

राज्यातल्या साखर कारखान्यांना आर्थिक मदत देण्यासाठी केंद्र सरकारच्या राष्ट्रीय सहकार विकास महामंडळानं १ हजार ९०० कोटी रुपये मंजूर केले आहे. राज्यातल्या १३ सहकारी साखर कारखान्यांना त्याला लाभ होणार आहे. त्यातले सुमारे सोळाशे कोटी महामंडळानं आज राज्य सरकारला हस्तांतरित केले.

July 31, 2024 7:25 PM July 31, 2024 7:25 PM

views 14

राज्यातील धरणांमध्ये पाणीसाठ्यात वाढ

राज्यात विविध ठिकाणी नद्यांच्या धरण क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांमधे पाणीसाठा वाढला आहे. अहमदनगर जिल्ह्यात भंडारदरा धरणाच्या पाणलोट परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस होत असून धरण ९० टक्के भरलं आहे. धरणाच्या सांडव्यातून ६०९ क्युसेक विसर्ग प्रवरा नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे भंडारदरा धर...

July 31, 2024 7:08 PM July 31, 2024 7:08 PM

views 13

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी !

गणपती उत्सवासाठी मुंबईतून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांकरता एसटी महामंडळानं यंदा २ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४ हजार ३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई, ठाणे, पालघर, या विभागांमधल्या प्रमुख बसस्थानकांमधून या जादा गाड्या सोडल्या जाणार आहेत. या गाड्या आरक्षणासाठी npublic.msrtcors.com...