October 14, 2025 3:35 PM October 14, 2025 3:35 PM
22
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातील आरोपींना जामीन मंजूर
कॉम्रेड गोविंद पानसरे हत्याप्रकरणातले मुख्य आरोपी, वीरेंद्र तावडे, शरद कळसकर आणि अमोल काळे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचनं आज जामीन मंजूर केला. न्यायमूर्ती शिवकुमार दिगे यांच्या एकल पीठानं ते तोंडी आदेश दिले. आदेशाची प्रत अद्याप उपलब्ध झालेली नाही.