प्रादेशिक बातम्या

September 7, 2024 3:51 PM

views 23

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील ९ जणांना भिवंडी पोलिसांनी केली अटक

अंमली पदार्थांची तस्करी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील नऊजणांना भिवंडी पोलिसांनी अटक  आहे. त्यांच्याकडून साडे ५००किलोग्रॅमपेक्षा अधिक वजनाचा गांजा, रोख रक्कम, मोबाईल फोन, टेम्पो असा ऐवज जप्त केला आहे. त्याची एकूण किंमत पावणे ३ कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. या सर्वांवर भिवंडीतल्या कोनगाव पोलीस ठाण्यात गुन्...

September 7, 2024 3:17 PM

views 16

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून भाविकांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

१४ विद्या आणि ६४ कलांचा अधिपती असणाऱ्या विघ्नहर्त्या गणपती बाप्पाचं आगमन भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या आजच्या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक मंडपांमध्ये मोठ्या उत्साहात झालं. महाराष्ट्राचं वैशिष्ट्य असलेला हा अनोखा उत्सव अनुभवण्यासाठी अनेक परदेशी पर्यटकांचं आगमनही मुंबई - पुण्यात झालं आहे. दहा दिवस चालणाऱ्य...

September 7, 2024 1:22 PM

views 15

कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी दोन आठवड्यात तब्बल  ८० लाखांचे दागिने अर्पण

कोल्हापूर इथल्या श्री अंबाबाई देवीच्या चरणी भाविकांनी गेल्या दोन आठवड्यात तब्बल  ८० लाखांचे दागिने अर्पण केले आहेत. एका भाविकाने ५० लाख रुपयांचा सोन्याचा सिंह अर्पण केला आहे तर गोव्याच्या प्रतापसिंह राणे यांच्या कुटुंबियांनी तीस लाख रुपयांचे सोन्याचे तोडे आणि कोल्हापुरी साज अर्पण केला.

September 7, 2024 11:58 AM

views 28

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्याचा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुनरुच्चार

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महायुती सरकारचे प्रमुख असून त्यांच्या नेतृत्वाखाली विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ”, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा स्पष्ट केलं आहे. ते काल नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. “मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरवण्याचा अधिकार आपल्याला नसून हा निर्णय भाजपाचं संसदीय मंडळ,...

September 6, 2024 7:06 PM

views 193

अभिषेक घोसाळकर हत्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय !

मुंबईतले माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर हत्येचा तपास मुंबई उच्च न्यायालयानं सीबीआयकडे सोपवला आहे. फेब्रुवारी महिन्यात फेसबुक लाइव्हमध्ये बोलत असताना गोळी झाडून त्यांची हत्या झाली होती. मुंबई पोलिसांची गुन्हे शाखा या प्रकरणाचा तपास करत होती. पण त्यातल्या त्रुटींमुळं हा तपास सीबीआयकडे सोपवण्याचे आदेश उच्...

September 6, 2024 7:04 PM

views 35

महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल – खासदार सुप्रिया सुळे

राज्यात सध्या अस्तित्वात असलेलं महायुतीचं सरकार अडचणींच्या भोवऱ्यात सापडलेलं असून ते लवकरच पडेल, असं मत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज मुंबईत वार्ताहरांशी बोलताना मांडलं. राज्यात सर्वाधिक गुंतवणूक आल्याचं सांगितलं जात आहे, मग नोकऱ्या का उपलब्ध होत नाहीत, अ...

September 6, 2024 6:50 PM

views 40

चंद्रपुरातलं सागवान प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवणार

चंद्रपूर जिल्ह्यातलं सागवान आता प्रधानमंत्री कार्यालयासाठी पाठवलं जाणार आहे.या लाकडापासून  प्रधानमंत्र्यांची खुर्ची आणि टेबल तयार केलं जाणार असल्याची माहिती राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. बल्लारपूर डेपोमधून सुमारे ३ हजार घनफूट सागवान यासाठी पाठवलं जाणार आहे. यापूर्वीही संसद भवन, भारत...

September 6, 2024 7:20 PM

views 21

राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट – भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे

आगामी विधानसभा निवडणुकीत कोणी किती जागा लढवाव्यात याबद्दल महायुतीच्या घटक पक्षांमध्ये मतभेद नसून राज्यात महायुतीचं सरकार आणणं हेच सामायिक उद्दिष्ट असल्याचं भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज सांगितलं. ते मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. उद्धव ठाकरे यांचं सरकार आल्यानंतर त्याआधीच्या सरका...

September 6, 2024 6:42 PM

views 23

आदिवासी समाजावर अन्याय होऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

आदिवासी समाजाच्या उन्नतीसाठी राज्य सरकारने १५ हजार ३६० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. या समाजावर कधीही अन्याय होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्लीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसन्मान यात्रेत ते बोलत होते. या कार्यक्रमापूर्वी त्यांनी न...

September 6, 2024 6:40 PM

views 36

परदेशी गुंतवणूकीत चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत महाराष्ट्र देशात अव्वल

परकीय गुंतवणूक आकर्षित करण्यात गेली दोन वर्ष सातत्यानं देशात अव्वल स्थानी  असलेल्या महाराष्ट्रानं  चालू  आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीतही हे स्थान टिकवून ठेवलं आहे.  एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत देशातल्या  एकूण गुंतवणुकीच्या 52 पूर्णांक 46 शतांश टक्के म्हणजेच सुमारे 70 हजार 795 कोटी रुपयांची प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.