प्रादेशिक बातम्या

September 2, 2024 10:24 AM September 2, 2024 10:24 AM

views 4

पारलिंगी समुदाय उपाय योजना संबंधी मंत्रालय सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

पारलिंगी समुदायासंबंधी असलेली धोरणं सर्वसमावेशक आणि प्रभावी असल्याची खात्री करण्यासाठी सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभागानं संबंधितांकडून तसंच सामान्य नागरिकांकडूनही मोठ्या प्रमाणावर सूचना मागवल्या आहेत.   पारलिंगी समाजासाठी सरकारनं अनेक उपाययोजना केल्या आहेत. पारलिंगी समुदायाच्या हितांच्या रक्...

September 1, 2024 7:39 PM September 1, 2024 7:39 PM

views 4

येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता

येत्या दोन दिवसात राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता असून तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार पऊस पडेल असा अंदाज आहे. यवतमाळ, वाशिम, अमरावती, नांदेड, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यांसाठी आज आणि उद्याकरता जोरदार पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. जळगाव, छत्रपती संभाजीनगर, जाला, बीड, लात...

September 1, 2024 7:34 PM September 1, 2024 7:34 PM

views 11

अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधल्या सहभागात वाढ – राज्यमंत्री रक्षा खडसे

केंद्र सरकारच्या अस्मिता खेलो इंडिया उपक्रमामुळे मुली आणि महिलांचा क्रीडा स्पर्धांमधला सहभाग लक्षणीयरीत्या वाढत आहे, असं केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी सांगितलं. भारतीय खेल प्राधिकरण, खेलो इंडिया तसंच ज्युदो असोसिएशनच्या वतीनं ‘अस्मिता खेलो इंडिया’ या उपक्रमाअंतर्गत पश्चिम विभागाच्या व...

September 1, 2024 7:30 PM September 1, 2024 7:30 PM

views 9

सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे ‘पोलीस काका आणि पोलीस दीदी’ उपक्रम

शालेय विद्यार्थ्यांमध्ये पोलिसांबाबत विश्वास निर्माण करण्याच्या हेतूनं सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातर्फे पोलीस काका आणि पोलीस दीदी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. काल यासंदर्भात पोलीस अधिकाऱ्यांची बैठक झाली. या उपक्रमाठी नियुक्त असलेले ८ पोलीस अधिकारी आणि २३ अंमलदार या बैठकीला उपस्थित होते. शिक्षक आण...

September 1, 2024 7:23 PM September 1, 2024 7:23 PM

views 16

शिवरायांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण करणं दुर्दैवी – मनोज जरांगे

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेचं राजकारण होत असून हा प्रकार महाराष्ट्रासाठी दुर्दैवी आहे. अशा घटनेचं राजकारण करणाऱ्यांना राज्याची जनता घरी बसवेल, असं मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील आज राजकोट इथे म्हणाले. जरांगे यांनी दुर्घटनाग्रस्त पुतळ्याची पाहणी केली, त्यावेळी ते बोल...

September 1, 2024 8:05 PM September 1, 2024 8:05 PM

views 4

लोकप्रतिनिधी गृहातल्या भाषणातला ‘उत्कृष्ट भाषण’ पुरस्कारासाठी सुजितसिंह ठाकूर यांची निवड

लोकप्रतिनिधी गृहातल्या भाषणांबद्दल राष्ट्रकुल संसदीय मंडळाच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या “उत्कृष्ट भाषण” पुरस्कारासाठी धाराशिव इथले भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची निवड झाली आहे.   सुजितसिंह ठाकूर यांना वर्ष २०१८-१९ करता महाराष्ट्र विधानपरिषद “उत्कृष्ट भाषण” पुरस्कार जाहीर झाला आहे. ठाकूर ...

September 1, 2024 8:18 PM September 1, 2024 8:18 PM

views 30

शिवरायांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी मविआचं आंदोलन

महाराष्ट्रात मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीनं आज मुंबईत आंदोलन केलं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, खासदार अरविंद सावंत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार, खासदा...

September 1, 2024 7:16 PM September 1, 2024 7:16 PM

views 9

राज्यात अनेक भागात पुन्हा पावसाचा जोर

राज्यात मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. आजही राज्यात अनेक भागात मुसळधार आणि अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाब्याच्या पट्ट्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे राज्यातल्या हवामानात मोठा बदल झाला असून पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आ...

September 1, 2024 3:29 PM September 1, 2024 3:29 PM

views 20

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या आजचा दर

व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीत ३९ रुपयांची वाढ झाली आहे. इंडियन ऑईलच्या संकेतस्थळावर ही माहिती देण्यात आली. याआधी गेल्या महिन्यात ८ रुपये ५० पैशांनी एलपीजी गॅसच्या किंमती वाढवण्यात आल्या होत्या, तर जुलैमध्ये गॅस सिलिंडरचे दर ३० रुपयांनी कमी झाले होते.

September 1, 2024 3:18 PM September 1, 2024 3:18 PM

views 12

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू

हिंगोली जिल्ह्यात आजपासून जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. राज्यात विविध मुद्यांवरून सुरू असलेली आंदोलनं, राजकीय सभा यांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं हिंगोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. जमावबंदीचे आदेश १२ सप्टेंबरपर्यंत लागू राहणार आहेत.