प्रादेशिक बातम्या

September 19, 2024 4:47 PM

views 46

बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण

बुलडाणा इथं आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत झालं. त्यानंतर मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण ...

September 19, 2024 1:57 PM

views 11

मुंबईमध्ये प्रदुषण कमी झाल्ल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुंबईमध्ये डीप क्लिन ड्राईव्हच्या माध्यमातून रस्ते साफ करणं, रस्ते झाडणे, पाण्याने रस्ते धुणं हे काम सुरू असून यामुळे मुंबईचं प्रदुषण कमी झालं असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ‍ शिंदे यांनी म्हटलं आहे. ‘स्वच्छता ही सेवा’ या  राज्यस्तरीय अभियानाची सुरुवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईत गिरगाव ...

September 19, 2024 11:40 AM

views 27

युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला भेट देणार

  छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश करण्याच्या अनुषंगानं युनेस्कोचं पथक विजयदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ल्याला येत्या ६ आणि ७ ऑक्टोबरला भेट देणार आहे. त्या अनुषंगानं या दोन्ही किल्ल्यांच्या परिसरात स्वच्छता मोहिम राबविण्याचं आवाहन जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी क...

September 19, 2024 10:23 AM

views 29

सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं मुख्यमंत्र्यां प्रतिपादन

विकसित भारतात महाराष्ट्र उद्योगमित्र राज्य असून, सेमी कंडक्टर प्रकल्पासाठी राज्य सरकार मदत करत असल्याचं प्रतिपादन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल नवी मुंबईत केलं. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल झालं त्यावेळी ते बोल...

September 18, 2024 7:20 PM

views 11

‘पोलाद क्षेत्रात हरितक्रांती- शाश्वत नवोन्मेष’ या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन

‘पोलाद क्षेत्रात हरितक्रांती- शाश्वत नवोन्मेष’ या दोन दिवसीय परिषदेचं उद्घाटन केंद्रीय पोलाद राज्यमंत्री भूपती राजू श्रीनिवास वर्मा यांच्या हस्ते आज मुंबईत झालं. या कार्यक्रमाला संबोधित करताना वर्मा यांनी स्टील क्षेत्रात शाश्वत कार्यपद्धती आणि नवनिर्मितीवर भर देण्याचं महत्त्व अधोरेखित केलं.  ही परिष...

September 18, 2024 7:12 PM

views 25

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित

पुणे शहरात एकंदर तीन लाख ७४ हजार १४८ गणेश मूर्ती विसर्जित करण्यात आल्या. पुणे महापालिकेतर्फे गणेश विसर्जनासाठी बांधण्यात आलेल्या ४५  हौदांमध्ये एक लाख १ हजार २८१ मूर्तींचं तर ५१६ लोखंडी टाक्यात एकंदर दोन लाख ८२ हजार ६०४ मूर्तींचं विसर्जन करण्यात आलं. महापालिकेनं मूर्ती दान करण्यासाठी केलेल्या आवाहना...

September 18, 2024 7:10 PM

views 24

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून विशेष स्वच्छता मोहीम

गणेशविसर्जनानंतर विविध चौपाट्या, समुद्रकिनाऱ्यांवर बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली होती. या मोहिमेद्वारे दोन दिवसांत ३६३ मेट्रिक टन घन कचरा संकलित करण्यात आला. तसंच, सार्वजनिक आणि कृत्रिम विसर्जनस्थळांवरचं निर्माल्य गोळा करण्यासाठी यंदा महानगरपालिकेनं ५०० निर्माल...

September 18, 2024 6:59 PM

views 19

राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन

उद्योजकांना सर्व सुविधा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला असून हे राज्य आता उद्योगस्नेही झालं आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या पहिल्या सेमी कंडक्टर प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज नवी मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या...

September 18, 2024 6:53 PM

views 16

यंदाच्या खरीप हंगामात राज्यात कृषी उत्पन्न ३१ लाख मेट्रीक टनांनी वाढण्याची आशा

राज्यात यंदाच्या खरीप हंगामातलं धान्य उत्पादन सरासरीच्या तुलनेत सुमारे ३१ लाख मेट्रीक टनानं वाढण्याची अपेक्षा कृषी विभागाचे मुख्य सांख्यिक वैभव तांबे यांनी व्यक्त केली. राज्यातल्या खरीप हंगामातल्या पिकांना पावसानं दिलेली योग्य साथ आणि अनुकूल हवामानामुळं यंदाचं खरिपातील धान्योत्पादन चांगलं येण्याची आ...

September 18, 2024 7:14 PM

views 22

राहुल गांधींची हत्या करण्याच्या, त्यांना इजा पोहेचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – नाना पटोले

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना इजा पोहचवण्याच्या धमक्या देणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसनं केली आहे. या मागणीसाठी काँग्रेस उद्या राज्यभर रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे, अशी माहिती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज मुंबईत दिली.  गेल्या काही दिवसांपासून भाजपा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.