प्रादेशिक बातम्या

September 25, 2024 3:42 PM

views 34

वाशीम जिल्ह्यात स्वछता अभियानांतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

स्वछता अभियान २०२४ अंतर्गत वाशीम जिल्ह्यात विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या मानोरा तालुक्यातल्या भुली इथल्या ग्रामस्वच्छता महिला मंडळाने अयोध्येत श्री रामजन्मभूमी इथे शरयू नदीच्या घाटावर स्वच्छता अभियान राबवलं. स्वच्छता ही सेवा पंधरवड्यानिमित्त आयोजित या उपक्रमात ५१ महिलांनी सहभाग...

September 25, 2024 3:17 PM

views 26

धुळ्यात मराठा आंदोलकांचं मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको

मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत मराठा आरक्षण आंदोलकांनी आज धुळे शहराजवळ मुंबई - आग्रा महामार्गावर रास्तारोको केलं. आंदोलकांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी केली. रास्तारोकोमुळे काही काळ महामार्गावरची वाहतूक ठप्प झाली होती. त्यानंतर पोलिसांनी...

September 25, 2024 2:54 PM

views 23

माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन

माथाडी कामगारांचा मोबदला स्वतःच्या खिशात टाकणाऱ्यांवर सरकारने कारवाई केली असून यापुढेही अशी कारवाई करण्यात येईल, माथाडींसाठीचा कायदा आणखी मजबूत करण्यात येईल, असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. माथाडी कामगारांचे नेते अण्णासाहेब पाटील यांची जयंती आणि गुणवंत कामगार पुरस्काराचा वि...

September 25, 2024 7:06 PM

views 12

ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जसराज यांचं वार्धक्यानं निधन

ज्येष्ठ चित्रपट निर्माती मधुरा जसराज यांचं आज मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. त्या ८६ वर्षांच्या होत्या. ओशिवरा स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार झाले.  प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडीत जसराज यांच्या मधुरा या पत्नी होत्या. चित्रपती व्ही शांताराम त्यांचे वडील होते.    पंडित जसराज यांच्या ...

September 25, 2024 9:20 AM

views 38

राज्याच्या विविध भागात उद्यापर्यंत अतिवृष्टिचा इशारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात उद्यापर्यंत जोराचे वारे आणि वीजांसह मुसळधार ते अतिवृष्टिचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या भुईबावडा घाटात दोन ठिकाणी दरड कोसळली. दरड हटवली असली तरी काही ठिकाणी रस्ता वाहून गेल्यानं अवजड वाहनांसाठी हा घाट बंद ठेवण्यात आला आहे. अहमद...

September 24, 2024 7:21 PM

views 29

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ५ ऑक्टोबरला चाचणीसाठी विमान उतरवण्याची सिडकोची तयारी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एका धावपट्टीवर येत्या ५ ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाचं विमान उतरवण्याचं सिडकोचं उद्दिष्ट आहे. सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांनी आज नवी मुंबईत या विमानतळाच्या प्रकल्पाची पाहणी केल्यानंतर झालेल्या वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.  विमानतळाच्या उभारणीचं काम अत्यंत समाध...

September 24, 2024 7:12 PM

views 22

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटींच्या अर्थसंकल्पाला मंजुरी

पुणे शहराची सांस्कृतिक शहर म्हणून ओळख कायम ठेऊन शहराचा विकास व्हावा, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे.  ते आज मुंबईत पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या बैठकीत बोलत होते. यावेळी प्राधिकरणाच्या ३ हजार ८३८ कोटी ६१ लाख रुपयांच्या अर्थसंकल्पाला मंजुरी देण्यात आली. ५ कोटी ७५ लाखांचा श...

September 24, 2024 7:05 PM

views 50

मुंबई महानगर क्षेत्रातल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई महानगर क्षेत्रातलं दळणवळण, पायाभूत सुविधा, आणि आर्थिक विकास वाढवण्याच्या प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले. एमएमआरडीएच्या माध्यमातून सुमारे अडीच लाख कोटींची विकास कामे सुरू असून ती कालमर्यादेत पूर्ण करावीत, असंही ते म्हणाले. बॅकबे रिक्लेमेशन प्रारूप विकास आ...

September 24, 2024 7:02 PM

views 34

गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेजवळ छत्तीसगड राज्यातल्या नारायणपूर जिल्ह्यात काल झालेल्या चकमकीत तीन नक्षलवादी ठार झाले. यात दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य रुपेश मडावी याचा समावेश आहे. तो मागच्या वीस वर्षांपासून गडचिरोली जिल्ह्यात सक्रिय होता. हत्या, जाळपोळ करणं असे ६६ गुन्हे त्याच्यावर दाखल होते. लोकसभा नि...

September 24, 2024 6:54 PM

views 29

एसटीचं उत्पन्न वाढवण्यासाठी चालक आणि वाहकांना रोख प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय

एसटी महामंडळाच्या उत्पन्न वाढीसाठी जास्त उत्पन्न आणणाऱ्या चालक आणि वाहकांना एसटीतर्फे प्रोत्साहन भत्ता मिळणार आहे. त्यासाठी प्रत्येक फेरीसाठी उत्पन्नाचं उद्दिष्ट पूर्ण करणाऱ्या चालक वाहकांना उद्दिष्टापेक्षा वाढीव उत्पन्नापैकी २० टक्के रक्कम प्रोत्साहन भत्ता म्हणून दोघांना सम प्रमाणात देण्यात येणार आ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.