प्रादेशिक बातम्या

October 9, 2024 10:12 AM

views 28

मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय

मराठवाड्यातल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी मराठवाड्यात क्रांतीसूर्य अण्णासाहेब जावळे पाटील यांच्या नावाने एक नवीन महामंडळ स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली काल झालेल्या मराठा आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत हा नि...

October 9, 2024 10:06 AM

views 24

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन

भीमा उजनी प्रकल्पा अंतर्गत देगाव शाखा कालव्याच्या कामांचं भूमिपूजन काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालं. या कामासाठी 352 कोटी रुपये खर्च येणार असून याचा लाभ दक्षिण सोलापूर तालुक्यातल्या दहा गावे आणि अक्कलकोट तालुक्यातल्या 25 गावांना होणार आहे. या प्रकल्पामुळे 16 हजार 129 हेक्टर क्षेत...

October 9, 2024 9:58 AM

views 13

अल्पसंख्याक समाजातल्या विद्यार्थ्यांसाठीच्या राज्यातल्या पहिल्या वसतिगृहाचं सिल्लोड इथं भूमीपूजन

केंद्र सरकारच्या विविध योजना आणि अभियानांच्या माध्यमातून अल्पसंख्याक, दुर्बल आणि गरजू घटकांची प्रतिष्ठा जपत, त्यांचा विकास केला जाईल, असं प्रतिपादन, केंद्रीय अल्पसंख्याक विकास मंत्री किरेन रिजीजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सिल्लोड इथं प्रधानमंत्री जनविकास कार्यक्रमांतर्गत उभारण्यात ...

October 9, 2024 9:02 AM

views 14

राज्यातील सर्व उपसा सिंचन योजना सौर ऊर्जेवर चालवणार-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

राज्यातील सर्वच उपसा सिंचन योजना आता सौर ऊर्जेवर चालवण्यात येणार असल्यामुळे या सिंचन योजनांचा संपूर्ण फायदा मिळू शकेल असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल सोलपुरात एका कार्यक्रमात व्यक्त केला. राज्यातल्या कृषी क्षेत्राला चालना देण्यासाठी अनेक जिल्ह्यात उपसा सिंचन योजना राबविण्यात आल्य...

October 8, 2024 8:41 PM

views 23

अयोध्येत महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन

अयोध्येत राम जन्मभूमी मंदिर परिसरात महाराष्ट्र भक्त सदन इमारत बांधणीचं भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण व उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या प्रमुख उपस्थितीत झालं. महाराष्ट्रातील जनतेसाठी हा आनंदाचा क्षण असल्याचं रविंद्र चव्हाण यावेळी म्हणाले. ही इमारत पर...

October 8, 2024 8:31 PM

views 17

राज्यात शिक्षक भरतीचा मार्ग मोकळा

राज्यातल्या शाळांमध्ये ४ हजार ८६० विशेष शिक्षकांची पदं निर्माण करायला राज्य सरकारनं आज मंजुरी दिली. त्यातल्या २ हजार ९८४ पदांवर सध्या कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या शिक्षकांचं समयोजन केलं जाणार आहे. त्यांना शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रतेनुसार समकक्ष वेतनश्रेणी लागू असेल.

October 8, 2024 8:51 PM

views 30

राज्यातल्या १० शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचं उद्या प्रधानमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन

राज्यातल्या १० नव्या शासकीय महाविद्यालयांचं उद्घाटन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलडाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोलीमध्ये ही महाविद्यालयं आहेत. राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीसह केंद्...

October 8, 2024 7:40 PM

views 33

नाशिक आणि अमरावती इथं झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू, दोन जखमी

नाशिक आणि अमरावती इथं आज झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातांमध्ये चार जणांचा मृत्यू झाला तर दोन जण जखमी झाले.  नाशिक इथं कारचं टायर फुटून झालेल्या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. तर अमरावती इथं ट्रकने दुचाकीला धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभ...

October 8, 2024 7:38 PM

views 20

रत्नागिरीतल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते भूमिपूजन

रत्नागिरी जिल्ह्याच्या राजापूर तालुक्यातल्या साखरीनाटे मत्स्य बंदराच्या कामाचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं. या बंदरासाठी १५३ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. साखरीनाटे, रत्नागिरी तालुक्यातलं मिरकरवाडा आणि दापोली तालुक्यातलं हर्णै ही जिल्ह्यातल्या मच्छिमारांना ताकद देणारी बं...

October 8, 2024 7:15 PM

views 12

मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांचं सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन

भारताच्या दौऱ्यावर असलेले मालदीवचे राष्ट्रपती महम्मद मुईज्जू यांनी आज सपत्नीक मुंबई विमानतळावर आगमन झालं. मुंबई उपनगरचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.