प्रादेशिक बातम्या

October 14, 2024 3:31 PM

views 33

पॅरिस ऑलिम्पिक, पॅरा ऑलिम्पिक आणि बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते खेळाडू आणि प्रशिक्षकांचा सन्मान

पॅरिस ऑलिम्पिक आणि पॅरा ऑलिम्पिक स्पर्धा तसंच बुडापेस्ट इथं झालेल्या बुद्धीबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत गौरवास्पद कामगिरी करणाऱ्या राज्यातील खेळाडूंचा आणि त्यांच्या प्रशिक्षकांचा आज सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्...

October 14, 2024 3:29 PM

views 32

राज्य शिक्षण मंडळाच्या कोकण विभागाच्या प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन

रत्नागिरी शहराजवळच्या कुवारबाव इथं महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोकण विभागीय मंडळाच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचं भूमिपूजन आज पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं.   कोकण रेल्वेचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संतोषकुमार झा यांनी आज रत्नागिरी रेल्वेस्थानकासम...

October 14, 2024 3:04 PM

views 17

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन

कोल्हापूरच्या संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणी कामाचं भूमीपूजन आज झालं. याकरता शासनाने २५ कोटी १० लाख रुपये निधी जाहीर केला असून येत्या दीड वर्षात हे काम पूर्ण होईल, असा अंदाज आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि खासदार छत्रपती शाहू महाराज यावेळी उपस्थित होते. ८ ऑगस्टला हे ना...

October 14, 2024 3:01 PM

views 19

विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी काँग्रेसची दिल्लीत बैठक

आगामी विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा करण्यासाठी आज काँग्रेसची दिल्लीत बैठक होणार आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी उपस्थित राहणार आहेत. तसंच महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेतेही उपस्थित राहतील, अशी माहिती काँग्रेस...

October 14, 2024 3:36 PM

views 26

माजी मंत्री बाबा सिद्दीकी हत्येप्रकरणी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करणार – मुख्यमंत्री

  राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा खटला जलदगती न्यायालयात चालवू. या प्रकरणातल्या सर्व आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करू असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत सांगितलं.   सिद्दीकी यांच्या हत्याप्रकरणातील तिसरा आरोपी प्रवीण लोणकर याला मुंबई पोलिसांनी पुण्यात...

October 14, 2024 3:37 PM

views 26

दिवाळीत होणारी भाडेवाढ मागे घेण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय

दिवाळीत गर्दीच्या हंगामामुळं होणारी भाडेवाढे मागे घेण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. २५ ऑक्टोबर ते २५ नोव्हेंबर दरम्यान ही भाडेवाढ होणार होती. यासंदर्भातलं पत्रक शुक्रवारी महामंडळानं प्रसिद्ध केलं होतं. हे पत्रक मागे घेत असल्याचं एसटी महामंडळानं आज जाहीर केलं.

October 14, 2024 3:17 PM

views 15

एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी

मुंबईहून न्यूयॉर्कला जाणाऱ्या एअर इंडियाचं विमान बॉम्बनं उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर आज सकाळी दिल्ली विमानतळावर ते तातडीनं उतरवण्यात आलं. विमानाची तपासणी केली असता कोणतीही आक्षेपार्ह वस्तू मिळाली नाही. विमानातील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. मुंबईहून मस्कतला जाणाऱ्या इंडिगो विमानही बॉम्बनं उडवण्याची धमक...

October 14, 2024 1:26 PM

views 10

तामिळ-मल्याळम चित्रपट अभिनेता बाला याला अटक

केरळमध्ये तामिळ-मल्याळम चित्रपट अभिनेता बाला याला आज सकाळी कोची पोलिसांनी अटक केली. बाला यांनी समाज माध्यमावर आपला अपमान केल्याचा आरोप करत त्याची पूर्वाश्रमीची पत्नी आणि गायिका अमृता सुरेश यांनी त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरुन त्याला अटक करण्यात आली आहे.  

October 13, 2024 8:19 PM

views 23

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा अग्निवीर योजनेवर पुन्हा प्रश्नचिन्ह

लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अग्निवीर योजनेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून ही योजना म्हणजे आपल्या वीर जवानांच्या बलिदानाचा अपमान असल्याचं म्हटलं आहे. नाशिक मध्ये प्रशिक्षणादरम्यान दोन अग्निवीरांचा मृत्यू झाल्याच्या घटनेच्या संदर्भात ते बोलत होते. लष्करी सेवेतल्या इतर जवान...

October 13, 2024 8:17 PM

views 7

केंद्र सरकारच्या योजना माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचवल्या जात आहेत – सचिव संजय जाजू

केंद्र सरकारच्या योजना माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील माध्यमांद्वारे नागरिकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवल्या जात आहेत, असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी आज सांगितलं.    नागपूर इथं माहिती आणि प्रसारण मंत्रालया अंतर्गत विविध प्रसार माध्यमांच्या अधिका-यांच्या आढाव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.