प्रादेशिक बातम्या

January 13, 2026 4:56 PM

views 109

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांची निवडणूक जाहीर होणार

राज्यातल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची घोषणा आज होणार आहे. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा न ओलांडलेल्या १२ जिल्हा परिषद आणि सव्वाशे पंचायत समित्यांमध्ये या निवडणुका होण्याची शक्यता आहे. मुंबईत संध्याकाळी ४ वाजता राज्य निवडणूक आयोग वार्ताहर परिषद घेऊन या निवडणुकांची घोषणा करणार ...

January 12, 2026 8:15 PM

views 53

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आगाऊ रक्कम द्यायला निवडणूक आयोगाची मनाई

महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू असताना ‘लाडकी बहीण’ योजनेचा नियमित किंवा प्रलंबित लाभ देता येईल; पण जानेवारी महिन्याचा लाभ अग्रिम स्वरुपात द्यायला राज्य निवडणूक आयोगानं मनाई केली आहे. १४ जानेवारीपूर्वी लाभार्थींच्या खात्यात डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे त...

January 12, 2026 2:51 PM

views 304

राज्यातल्या जिल्हा परिषद निवडणुका १५ फेब्रुवारीपर्यंत घेण्याची मुभा निवडणूक आयोगाला देण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदा आणि सव्वाशे पंचायत समित्यांची  निवडणूक प्रक्रिया १५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयानं आज दिली. मतदान यंत्रांची कमतरता, प्रशासकीय अडचणी यासारखी कारणं देत राज्य निवडणूक आयोगानं ३१ जानेवारीची मुदत १० फेब्रुवारीपर्यंत वाढवून द्यावी, अशी विनंती केली...

January 11, 2026 7:53 PM

views 57

मुंबई महानगरपालिकेसाठी महायुतीचा वचननामा तर नागपूरसाठी भाजपाचा जाहीरनामा प्रसिद्ध

मुंबई महापालिका निवडणूकीचा महायुतीचा वचननामा आज मुंबईत प्रकाशित करण्यात आला. यानिमित्त आयोजित वार्ताहर परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, तसंच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडीया आठवले गटाचे अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले उपस्थित होते. कचरामुक्त मुंबईसह मुंबईचा पाणी प्रश्न...

January 11, 2026 7:32 PM

views 47

महाराष्ट्रात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला

राज्यात २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला राज्यातल्या २९ महानगरपालिकांच्या निवडणुकांचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचार संपण्यासाठी केवळ तीनच दिवस राहिले असून विविध पक्षांनी प्रचारात जोर लावला आहे. जाहीर सभा, रोड शो, तसंच समाज माध्यमांवरदेखील प्रचाराला रंग चढला आहे. मतदानाच्या आधीचा रव...

January 11, 2026 7:09 PM

views 87

ज्येष्ठ समाजवादी नेते माजी आमदार गंगाधर पटणे यांचं निधन

जनता दलाचे माजी आमदार आणि ज्येष्ठ समाजवादी नेते गंगाधर पटणे यांचं आज नांदेड इथे वृद्धापकाळानं निधन झालं. ते ८५ वर्षांचे होते. पटणे १९९८ ते २००४ या कालावधीत विधानपरिषदेचे माजी सदस्य होते. १९७४ ते १९८१ या काळात ते बिलोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष होते.  साने गुरुजी आणि  महात्मा बसवेश्वर यांच्यावर निष्ठा ...

January 11, 2026 6:21 PM

views 18

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद

निवडणुकीसाठीच्या कर्तव्यावर नेमणूक झालेल्या कर्मचाऱ्यांकडून टपाली मतदानाच्या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळाला आहे. ठाणे महानगरपालिकेत आतापर्यंत १ हजार ९४५ मतपत्रिका प्राप्त झाल्या असल्याचं आयुक्त सौरव राव यांनी सांगितलं.टपाली मतदानासाठी उद्या शेवटचा दिवस आहे.

January 11, 2026 5:55 PM

views 10

अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठाचा तृतीय क्रमांक

बंगळुरू इथं झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगासन स्पर्धेत मुंबई विद्यापीठानं तृतीय क्रमांक पटकावला आहे.  मुंबई विद्यापीठाच्या महिला संघानं अखिल भारतीय स्तरावर प्रथमच पदक पटकावलं. या कामगिरीच्या जोरावर संघाची खेळों इंडिया विद्यापीठ स्पर्धेसाठीही निवड झाली आहे.

January 11, 2026 5:46 PM

views 8

निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे- विजय वडेट्टीवर

लाडकी बहीण योजनेला काँग्रेसचा विरोध नाही, पण निवडणुका जिंकण्यासाठी भाजपा लाडक्या बहिणींचा वापर करून घेत आहे, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवर यांनी आज अकोल्यात केली. आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा ओलांडून निवडणुका घेण्यावरूनही त्यांनी राज्य सरकार आणि निवडणूक आयोगावर निशाणा साधला. एमआयएमचे नेते...

January 11, 2026 3:35 PM

views 7

तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं मरीन ड्राईव्ह इथं आयोजन

येत्या १४ जानेवारी रोजी साजऱ्या होणाऱ्या ट्राय सर्व्हिस व्हेटरन्स डे निमित्त तिन्ही सैन्यदलांच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या विशेष संचलनाचं आयोजन आज मुंबईत मरीन ड्राईव्ह इथे करण्यात आलं होतं. या संचलनात तिन्ही सैन्य दलांचे निवृत्त अधिकारी, नौदलाचे कॅडेट्स, एनसीसी कॅडेट्स यांनीही सहभाग घेतला होता. भारतीय...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.