प्रादेशिक बातम्या

October 18, 2024 7:18 PM

views 31

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या धाराशिव शाखेची अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तसच विक्री विरुद्ध कारवाई

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या  धाराशिव शाखेनं अवैध मद्य निर्मिती, वाहतूक तसंच  विक्री विरुद्ध कारवाई करून  जिल्ह्यातल्या  विविध ठिकाणांवरून   15 लाख रुपये किमतीचा  मुद्देमाल केला आहे. १ ऑक्टोबरपासून जिल्ह्यात विविध ठिकाणी 88 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  क...

October 18, 2024 6:54 PM

views 8

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार

सोलापूर शहर आणि जिल्ह्यातल्या चार विधानसभा मतदारसंघात MIM उमेदवार उभे करणार आहे. शहराध्यक्ष फारुक शाब्दी यांनी आज ही घोषणा केली. सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून फारुक शाब्दी हेच उमेदवार असतील, अशी घोषणा पक्षाचे अध्यक्ष खासदार असदउद्दीन ओवेसी यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये केली. पक्षानं गेल्या द...

October 18, 2024 6:48 PM

views 18

नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज – भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा

राष्ट्रसेवा करण्यासाठी संतांचा आशीर्वाद हवा. नकारात्मक शक्तींपासून राष्ट्राची सुरक्षा होण्याची गरज असल्याचं प्रतिपादन भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज केलं. मुंबईत आज त्यांनी विविध धार्मिक संस्थांच्या विश्वस्तांशी संवाद साधला. विविध मान्यवर यावेळी उपस्थित होते.

October 18, 2024 6:34 PM

views 18

पुणे शहरात अवजड वाहनांवर घातलेल्या बंदीची कठोर अंमलबजावणी सुरू

पुणे शहरात वर्दळीच्या कालावधीत अवजड वाहनांवर घातलेल्या बंदीची वाहतूक पोलिसांनी कठोर अंमलबजावणी सुरू केली आहे. तसंच बेशिस्त वाहनचालकांवर वचक ठेवण्यासाठी वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे.  ट्रिपल सीट, ड्रंक ॲण्ड ड्राईव्ह आणि विरुद्ध दिशेनं येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध ही कारवाई केली जात आहे.  गेल्...

October 18, 2024 6:28 PM

views 17

अमरावतीत साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा जप्त

दिवाळीच्या तोंडावर कर्नाटकातून अमरावतीत आलेला साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा अन्न आणि औषधी प्रशासनानं आज जप्त केला. जप्त केलेल्या खव्याची किंमत अंदाजे दहा लाख रुपये आहे. शहरातील जुना बायपास मार्गावर एका गोदामात भेसळयुक्त खवा आल्याची माहिती मिळाली. दरम्यान, कर्नाटक, गुजरात राज्यांतून मोठ्या प्रमाणाव...

October 18, 2024 3:21 PM

views 56

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाली आहे.या काळात कुठंही गैरप्रकार घडू नयेत यासाठी प्रशासन सज्ज आहे. रायगडमध्ये राज्य उत्पादन शुल्क विभागानं कारवाई केली.या कारवाईत एकूण २ लाख ७१ हजार ४२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

October 18, 2024 3:04 PM

views 36

बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात लुक आऊट नोटीस

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी प्रमुख आरोपी शिवकुमार गौतम याच्यासह तिघांविरोधात मुंबई पोलिसांनी लुक आऊट नोटीस जारी केली आहे. यात शुभम लोणकर आणि मोहम्मद जिशान अख्तर यांचा समावेश आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांच्या गुन्हे विभागाची पथकं देशाच्या विविध भा...

October 18, 2024 12:39 PM

views 21

तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदारांवर प्रशासनाची कारवाई

धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर विधानसभा मतदारसंघात ४० बोगस मतदार आढळले असून,त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.निवडणूक आयोगाच्या मतदार नोंदणी कार्यक्रमाअंतर्गत नोंदणी करतांना, हे बोगस मतदार निदर्शनास आले.दरम्यान,या मतदारसंघातल्या प्रत्येक गावात परवा २० ऑक्टोबर रोजी मतदार यादी चावडी वाचन हो...

October 18, 2024 10:56 AM

views 26

विधानसभा निवडणूक : काळ्या पैशाच्या वापराची नागरिक करणार तक्रार

राज्यात होणाऱ्या  विधानसभा निवडणूक प्रचारात काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं नागरिकांच्या  निदर्शनास आल्यास त्यांनी आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन आयकर अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेची वाहतूक किंवा वाटप, अशा  संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी ...

October 18, 2024 10:52 AM

views 35

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत १५० जागांवर एकमत

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीच्या बैठकीत सुमारे दीडशे मतदार संघांवर एकमत झालं आहे. अर्ज भरायला सुरुवात केल्यावर याची विस्तृत माहिती दिली जाईल, अशी माहिती स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी काल दिली.   या बैठकीसाठी महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे छत्रपती संभाजीराजे, प्रहार जन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.