प्रादेशिक बातम्या

November 6, 2024 9:08 AM

views 37

श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत

धाराशिव तालुक्यातील तेर इथल्या श्री संत गोरोबा काका कुंभार यांच्या पालखीचं काल धाराशिवमध्ये मोठ्या भक्तीभावानं स्वागत करण्यात आलं. ही पालखी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. भाऊबीजेच्या दुसऱ्या दिवशी ही पालखी तेरहून निघून कार्तिकी एकादशीला पंढरपुरात पोहोचते.  

November 6, 2024 8:44 AM

views 85

वंचित बहुजन आघाडीचा ‘जोशाबा समतापत्र’ जाहीरनामा प्रकाशित

महात्मा जोतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित असलेला वंचित बहुजन आघाडीचा 'जोशाबा समतापत्र' या नावाचा निवडणूक जाहीरनामा काल पुण्यात, पक्षाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आला. महिलांना मासिक 3500 रुपये वेतन, शेतमालाला...

November 6, 2024 8:36 AM

views 40

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीच्या दिग्गज नेत्यांनी काल प्रचाराचा नारळ फोडला. तर वंचित बहुजन आघाडीनं काल जाहीरनामा प्रसिद्ध केला. महायुतीतर्फे शिवसेनेचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, भाजपा नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्याच...

November 5, 2024 8:12 PM

views 23

उद्धव ठाकरे यांची पक्षातल्या ५ नेत्यांवर निलंबनाची कारवाई

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या पक्षातील ५ नेत्यांवर पक्षविरोधी कारवाया केल्यानं निलंबनाची कारवाई केली. यात माजी आमदार रुपेश म्हात्रे, विश्वास नांदेकर, चंद्रकांत घुगूल, संजय आवारी आणि प्रसाद ठाकरे यांचा समावेश आहे. काल पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानुसार उमेदवा...

November 5, 2024 8:32 PM

views 72

महाविकास आघाडीला निवडून देण्याचं उद्धव ठाकरे यांचं आवाहन

विधानसभेच्या निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांनी कोल्हापूरमध्ये आज घेतलेल्या प्रचार सभेत पाच आश्वासन मतदारांना देत महाविकास आघाडीला निवडून देण्याचं आवाहन केलं.    महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शेतीमालाला हमीभाव देण्याचं आश्वासन ठाकरे यांनी दिलं. विद्यार्थींनीबरोबरच विद्यार्थ्यांनाही मोफत शिक्षण दिलं...

November 5, 2024 8:05 PM

views 23

अपक्ष उमेदवारांबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू – सुनील तटकरे

महायुतीच्या जागावाटपानंतरही अपक्ष म्हणून काही उमेदवार उभे राहिले असून त्याबाबत परस्पर सामंजस्याने तोडगा काढू असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.   भाजपच्या माजी खासदार हिना गावित यांनी पक्षसदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. गावित यांनी अक्कलकुवा मतदारसंघा...

November 5, 2024 7:35 PM

views 24

राष्ट्रपती भवनात आयोजित ‘सृजन २०२४’ निवासी कला शिबिरात अमरावतीतल्या सुमित्रा आहके सहभागी

राष्ट्रपती भवनात आयोजित केलेल्या सृजन २०२४ या दहा दिवसांच्या निवासी कला शिबिरात अमरावती जिल्ह्यातल्या मेळघाटातल्या सुमित्रा आहके सहभागी झाल्या होत्या. या शिबिरात सुमित्रा यांनी काढलेली वारली चित्रं, गाव आणि शहरातील फरक दर्शविणारं चित्र, देवस्वरुप मानला जाणारा वाघ आणि लुप्त होत चाललेले आदिवासी कलाप्र...

November 5, 2024 7:26 PM

views 133

भारतीय लष्कराकडून येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत भरती रॅलीचं आयोजन

अग्नीवीर योजने अंतर्गत, एप्रिल २०२४ मध्ये झालेल्या ऑनलाइन CEE चाचणीत निवड झालेल्या, महाराष्ट्रातल्या मुंबई शहर, मुंबई उपनगर, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, धुळे, आणि नंदुरबार या आठ जिल्ह्यांमधल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भारतीय लष्कराने येत्या २८ नोव्हेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत विरारमधल्या जीवदान...

November 5, 2024 7:05 PM

views 33

दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती

पुणे जिल्ह्यातल्या दौंड विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारीपदावर प्रांताधिकारी मिनाज मुल्ला यांच्याऐवजी उपजिल्हाधिकारी गणेश मरकड यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीतील अपक्ष उमेदवारांचे अर्ज स्वीकारण्यापूर्वी त्यांच्याशी पक्षपातीपणाने वागणे, निवडणूक लढविण्यापासून वंचित ठेवून शासनाचा महस...

November 5, 2024 7:01 PM

views 29

आचारसंहिता लागल्यापासून ४६ हजारांहून अधिक नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत एकंदर ४६ हजार ६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या कालावधीत राज्यात २५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.