प्रादेशिक बातम्या

November 13, 2024 10:43 AM

views 17

आचारसंहिता काळात आतापर्यंत ५०२ कोटी ६३ लाख रुपयांची मालमत्ता जप्त

विधानसभा निवडणूक आचारसंहिता काळात राज्यभरात सी-व्हिजिल ॲपवर एकूण पाच हजार २८६ तक्रारी प्राप्त झाल्या, त्यापैकी पाच हजार २३० तक्रारी निवडणूक आयोगाकडून निकाली काढण्यात आल्या आहेत. याच काळात विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा रोकड, मद्यासह इतर अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू असा सुमारे...

November 13, 2024 10:30 AM

views 26

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या सर्व पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा, प्रशासनाकडून चोख बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात उद्या गुरुवारी जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या सभा होणार आहेत. या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणेसह सर्वच व्यवस्थेवर प्रशासनाची करडी नजर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची चिकलठाणा परिसरासह जालना इथंही सभा होणार आहे.   शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्...

November 13, 2024 1:51 PM

views 32

राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारामुळे ऐन थंडीच्या दिवसांत राज्यातलं राजकीय वातावरण तापलं आहे. विविध राजकीय पक्षांच्या केंद्रिय नेत्यांच्या प्रचारसभा राज्यात होत आहेत. एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांचा मारा सुरू आहे. अन्य काही राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्रीदेखील आपापल्या पक्षाच्या उमेदवारांचा प्रचार करण्यासाठ...

November 12, 2024 8:26 PM

views 18

निष्पक्षपणे काम करण्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांचे केंद्रीय निरीक्षकांना निर्देश

कोणत्याही पक्षाला प्राधान्य न देता निष्पक्षपणे काम करण्याचे निर्देश मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केंद्रीय निरीक्षकांना दिले. राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी तैनात निरीक्षकांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व उमेदवारांशी संपर्क ठेवा आणि त्यांच्या तक्रारी गांभीर्यानं घेण्याचे आदेश त्यांनी दि...

November 12, 2024 8:13 PM

views 20

मुस्लिमांना आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार ? – गृहमंत्री अमित शाह

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज मुंबईत घाटकोपरमधे प्रचारसभा घेतली. मुस्लिम धार्मिक नेत्यांनी १० टक्के आरक्षण मागितलं आहे. मात्र हे आरक्षण देण्यासाठी कुणाचं आरक्षण कमी करणार असा प्रश्न त्यांनी विरोधी पक्षांना केला.    राम मंदिर बांधण्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं, ते पूर...

November 12, 2024 8:07 PM

views 20

राज्यात परकीय गुंतवणुकीचा पुण्याला फायदा – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

गेल्या काही वर्षात राज्यात परकीय गुंतवणुकीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून याचा फायदा पुण्याला झाल्याचं प्रधानमंत्री पुण्यात झालेल्या प्रचारसभेत म्हणाले. परकीय कंपन्यांची पसंती महाराष्ट्राला सर्वाधिक आहे, आयटी आणि इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात गुंतवणूक वाढल्यावर पुण्यात कंपन्यांची संख्या वाढली. त्यामुळे त...

November 12, 2024 7:44 PM

views 27

एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांची रवी राणा यांना ताकीद

अमरावती जिल्ह्यातल्या बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा आणि माजी खासदार नवनीत राणा यांनी महायुतीची शिस्त पाळायला हवी, महायुतीविरुद्ध काम करणं चालणार नाही, अशी ताकीद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. अमरावतीत भाजपाचे उमेदवार जिंकायला हवेत, बाकीचे पराभूत झाले तरी चालतील, अशा आशयाचं विधान रवी राण...

November 12, 2024 7:30 PM

views 34

भाजपच्या नवनवीन योजनांमुळे देश प्रगतीपथावर – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

भारतीय जनता पक्षाने आपल्या सत्ताकाळात नवनवीन योजना अमलात आणल्यामुळे देश प्रगतीपथावर वाटचाल करत आहे. राज्य सरकारनेही लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून त्यात भर टाकली असल्याचं प्रतिपादन भाजपा नेते, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज अकोल्यात केलं.

November 12, 2024 7:25 PM

views 16

राज्यात विविध ठिकाणी मतदार जनजागृती उपक्रमांचं आयोजन

विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने विविध ठिकाणी मतदार जनजागृती सुरू आहे. सांगली जिल्हा प्रशासनाच्या वतीनं मतदानाची टक्केवारी वाढावी मतदान जनजागृती व्हावी यासाठी बाईक रॅली काढण्यात आली. धुळे जिल्ह्यात शिरपूर नगरपालिकेनं मानवी साखळी तसंच रांगोळी स्पर्धांचं आयोजन केलं. जळगाव शहर महानगरपालिकेतर्फे फलक लेख...

November 12, 2024 7:15 PM

views 32

कोकणात महायुतीला ६०हून अधिक जागा मिळतील – विनोद तावडे

लोकसभा निवडणुकीत मविआने फेक नॅरेटिव्ह तयार केला होता. पण विधानसभेवेळी मतदारांनी हा डाव ओळखला आहे. त्यामुळे मुंबई, ठाण्यासह संपूर्ण कोकणात महायुतीला साठहून अधिक जागा मिळतील, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी आज कणकवली इथे व्यक्त केला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.