प्रादेशिक बातम्या

November 13, 2024 7:06 PM

views 26

प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वामुळे भारत लवकरच जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल – जे. पी. नड्डा

भाजपाच्या नेतृत्त्वाखालच्या केंद्र सरकारने केलेली विकासकामं आणि प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वामुळे लवकरच भारत जगातली तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनेल, असा विश्वास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज मुंबईत व्यक्त केला. विविध क्षेत्रातल्या व्यावसायिकांची त्यांनी आज भेट घेतली. त्यावेळी ते...

November 13, 2024 6:49 PM

views 28

बीडमध्ये पाणीप्रश्न तडीस नेऊ – उपमुख्यमंत्री अजित पवार

महायुतीची सत्ता आल्यावर बीड मध्ये एमआयडीसी उभा करू तसंच विमान सेवा सुरू करू असं आश्वासन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी दिलं. ते आज बीड इथं प्रचारसभेत बोलत होते. बीड मतदारसंघात पाण्याचा प्रश्न तडीस नेऊ, असं आश्वसन यावेळी पवार यांनी दिलं. 

November 13, 2024 6:44 PM

views 25

लाडकी बहिण योजना बंद पडू देणार नाही – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज पालघरमध्ये प्रचारसभा घेतली. लाडकी बहिण योजना बंद पडावी म्हणून सावत्र भावांनी खूप प्रयत्न केले. मात्र आम्ही ही योजना बंद पडू देणार नाही, असं ते म्हणाले. पालघरचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा यांना यावेळी उमेदवारी दिली नसली तरी त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, असं आश्वासन...

November 13, 2024 6:36 PM

views 25

मविआचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही यशस्वी होऊ देणार नाही – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आज वाशीम जिल्ह्यात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पोहरादेवी इथं सभा घेतली. महाविकास आघाडीचं अल्पसंख्यंकांचं तुष्टीकरणाचं धोरण आम्ही हे यशस्वी होऊ देणार नाही, असं ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेले महंत सुनील महाराज राठोड यांनी याव...

November 13, 2024 3:09 PM

views 23

भाजप खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातलं भाजपाचं सरकार खऱ्या अर्थानं संविधानाचं रक्षण करत आहे, असं प्रतिपादन भाजपाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. ते आज नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. महाविकास आघाडीनं भाजपामुळे आरक्षण जाणार, संविधान बदलणार अशी ...

November 13, 2024 3:39 PM

views 21

राज्यात महायुतीचं सरकार येईल – गृहमंत्री अमित शाह

राज्यातली जनता ही महायुतीच्या सोबत असून या निवडणुकीत महायुतीचं सरकार येईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शाह यांनी आज धुळे इथे व्यक्त केला. शिंदखेडा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार जयकुमार रावल यांच्या प्रचारार्थ झालेल्या सभेत ते बोलत होते. महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणीसु...

November 13, 2024 2:28 PM

views 28

अवैध फेरीवाले उभे राहणाऱ्या ठिकाणांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी निगराणी ठेवावी, मुंबई उच्च न्यालयाचे निर्देश

अवैध फेरीवाले उभे राहणाऱ्या मुंबईतल्या २० ठिकाणांवर मुंबई महानगरपालिका आणि पोलिसांनी कडक आणि कायमस्वरूपी निगराणी ठेवावी, असे निर्देश मुंबई उच्च न्यालयानं दिले आहेत. संपूर्ण मुंबईत २० संवेदनशील ठिकाणांवर फेरीवाल्यांनी अतिक्रमण केलं असून यामुळे याभागातल्या रस्त्यांवर नागरिकांना चालणं मुश्किल झाल्याचं ...

November 13, 2024 2:19 PM

views 175

दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेनं उपलब्ध करून दिल्या विशेष सुविधा

आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ८५ वर्षांवरच्या ज्येष्ठ नागरिक मतदारांना मतदानाचा हक्क बजावत यावा यासाठी मुंबई जिल्हा निवडणूक यंत्रणेनं विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये व्हीलचेअर, व्हॅन, ईको व्हॅन, दिव्यांग सुलभ बसेस, टॅक्सी, तसंच मतदान केंद्रांत जिन्यांवर चढण्यासाठी सरकत्या व्हीलचेअ...

November 13, 2024 12:51 PM

views 26

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत राबवण्यात आले विविध उपक्रम

विधानसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी प्रशासन स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवत आहे. याअंतर्गत काल सांगली शहरात आणि सातारा जिल्ह्यात महाबळेश्वर इथं सायकल आणि दुचाकी फेरी आयोजित करण्यात आली होती. यामध्ये शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांसह नागरिक सहभागी झाले होते.   धुळे जिल्ह्यात शिरपूर न...

November 13, 2024 10:47 AM

views 24

राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार

विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिला अधिकारी-कर्मचारी करणार आहेत. महिलांचा मतदानातला सहभाग वाढवण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक ४५ मतदान केंद्रांचं नियंत्रण महिलांकडे असेल, तर वाशिम, सिंधुदुर्ग, गडचिरोली, हिंगोली ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.