प्रादेशिक बातम्या

November 14, 2024 6:58 PM

views 22

प्रधानमंत्री मोदी आणि भाजपने महाराष्ट्राच्या जनतेला खोटी आश्वासनं दिली – मल्लिकार्जुन खर्गे

काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षावर महाराष्ट्राच्या लोकांना खोटी आश्वासनं दिल्याचा आरोप केला. इगतपुरी इथल्या प्रचारसभेत ते बोलत होते. नागरिकांच्या बँक खात्यांमध्ये १५ लाख रुपये जमा करणं, २ कोटी रोजगार निर्माण करणं इत्यादी आश्वासनं प्रधानमं...

November 14, 2024 7:36 PM

views 32

केंद्र सरकार आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवत असल्याचा राहुल गांधी यांचा आरोप

केंद्र सरकारच्या धोरणनिर्मितीत आदिवासी अधिकाऱ्यांना मर्यादित अधिकार असून आदिवासी समुदायाला संसाधनापासून दूर ठेवलं जातं, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी केला. ते आज नंदुरबार इथं प्रचारसभेत बोलत होते. देशात आदिवासींची लोकसंख्या ८ टक्के आहे, मात्र त्यांना सोयी सुविधा नाकारल्या जातात....

November 14, 2024 5:02 PM

views 11

राज्यात अनेक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती दिली जात आहे – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

महाराष्ट्राला विकसित भारताचं नेतृत्व करायचं असून त्यादृष्टीनं राज्यात अनेक अत्याधुनिक पायाभूत सुविधा प्रकल्पांना गती देण्यात येत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्रपती संभाजीनगर इथल्या प्रचारसभेत केलं. समृद्धी महामार्ग, रेल्वेचं आधुनिकीकरण, औद्योगिक पार्क, टेक्सटाइल पार्क इत्य...

November 14, 2024 4:00 PM

views 26

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्यास मुदतवाढ

म्हाडाच्या पुणे मंडळाच्या ६ हजार २९४ सदनिकांच्या विक्रीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करण्याची मुदत १० डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. ही संगणकीय सोडत असून यात पुणे, पिंपरी चिंचवड तसंच सोलापूर, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातल्या विविध गृहनिर्माण योजनांमधल्या सदनिकांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी ७ जानेवारी रो...

November 14, 2024 3:57 PM

views 69

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचं निधन

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार हरिश्चंद्र देवराम चव्हाण यांचं आज सकाळी नाशिक इथे त्यांच्या राहत्या घरी दीर्घ आजाराने निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. पेठ-सुरगाणा या मतदारसंघातून अपक्ष म्हणून उतरलेले चव्हाण आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर आधी काँग्रेसकडून निवडणूक लढवत ते खासदार झाले. भारतीय जन...

November 14, 2024 8:16 PM

views 21

यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा यशवंतराव चव्हाण राज्यस्तरीय पुरस्कार यंदा ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंग पवार यांना जाहीर झाला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटर इथे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे. दोन लाख रुपये रोख आणि मानपत्र ...

November 14, 2024 3:44 PM

views 132

आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमनुरी विधासभा मतदारसंघाचे आमदार संतोष बांगर यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंगाचा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. बांगर यांनी मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्याने केला आहे.  याच भागातल्या वाकोडी गावात काल मविआचे उमेदवाराच्या प्रचारासाठी ...

November 14, 2024 8:14 PM

views 23

राज्यात गृहमतदानाला चांगला प्रतिसाद

रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाच विधानसभा मतदारसंघांमधले ८५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेले ३ हजार ५८३ मतदार आणि ५९२ दिव्यांग मतदारांसाठी आजपासून गृहमतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात कुवारबाव इथे राहणाऱ्या ९२ वर्षं वयाच्या मतदार जयश्री नाईक यांनी गृहमतदानाच्या सुविधेचा लाभ घेऊन ...

November 14, 2024 6:59 PM

views 26

विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक – मंत्री नितीन गडकरी

ही विधानसभा निवडणूक जनतेच्या भवितव्याचा निर्णय करणारी निवडणूक आहे, असं प्रतिपादन भाजपा नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं. ते धाराशिव जिल्ह्यातल्या तुळजापूर मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते.    देशातली गरीबी, बेरोजगारी दूर व्हायला हवी, स्मार्ट शहरांप्रमाणेच स्मार्ट खेडी उभारली गेली...

November 14, 2024 3:04 PM

views 19

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाला दोन कांस्य पदकं

पंजाबमधल्या अमृतसर इथल्या गुरुनानक देव विद्यापीठात आयोजित अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तायक्वांदो स्पर्धेत मुंबई विद्यापीठाने दोन कांस्य पदकं पटकावली आहेत. ६८ किलो वजनी गटात सय्यद उमर आणि ८७ किलो वजनी गटात राज घुले या दोघांनी कांस्य पदकावर आपलं नाव कोरलं. विजयी खेळाडूंसह प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.