प्रादेशिक बातम्या

November 18, 2024 10:02 AM

views 26

विधानसभा निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

महाराष्ट्रात २८८ विधानसभा मतदारसंघांमध्ये आणि नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी येत्या बुधवारी, २० नोव्हेंबर रोजी मतदान होत असून राज्यातील ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदारांसाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. सकाळी ७ ते संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. संवेदनशी...

November 17, 2024 7:11 PM

views 21

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा काँग्रेसचा आरोप

राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचा आरोप काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दिकी यांची हत्या, लॉरेन्स बिश्नोई टोळीनं बॉलिवुड अभिनेत्यांना दिलेल्या धमक्या इत्यादी प्रकरणांकडे त्यांनी लक्ष वेधलं आणि या ...

November 17, 2024 7:06 PM

views 29

मविआची सत्ता आल्यास वाढवण, मोरबे बंदर होऊ देणार नाही – उद्धव ठाकरे

महाविकास आघाडीची सत्ता आल्यावर वाढवण आणि मोरबे बंदर होऊ देणार नाही, असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बोईसर इथल्या प्रचारसभेत सांगितलं. आपण विकासाच्या नाही तर विनाशाच्या विरुद्ध असून पालघर जिल्ह्याचा विकास महाविकास आघाडी करेल, असं आश्वासन त्यांनी दिलं.  

November 17, 2024 7:44 PM

views 17

‘महायुती सत्तेत आल्यानंतरच राज्य प्रगतीपथावर पुढं गेलं, यानंतरही पुढंच नेऊ’

महायुतीचं सरकार आल्यानंतरच राज्य प्रगतीच्या मार्गावर पुढे गेलं असून, यापुढंही आपण ते पुढंच नेऊ, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धुळ्यात साक्री इथं झालेल्या प्रचारसभेत दिलं. सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हमीभाव मिळावा यासाठी आपण केंद्र सरकारची मदत घेतली. त्यानंतर सोयाबीनला प्रतिक्विंटल ४ हजार...

November 17, 2024 7:41 PM

views 23

१० लाख कोटी रुपयांची गुंतवणूक महाराष्ट्रबाहेर गेल्याची प्रियंका गांधींची टीका

महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.    केंद्र सरकार महत्त्वाची बंदरं...

November 17, 2024 6:26 PM

views 28

स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न – मायावती

बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष, मायावती यांनी आज, पुण्यात बसप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेतली. स्वबळावर सरकार आणण्याचा बसपचा प्रयत्न आहे, परंतु, ते मिळालं नाही तर बहुमत मिळवून सरकार बनवणाऱ्या पक्षाला आपला पाठिंबा राहील असं मायावती यांनी यावेळी जाहीर केलं.

November 17, 2024 3:47 PM

views 16

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली.

केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. राज्यातल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीचा महाविजय होईल, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराज सिंग चौहान यांनी यावेळी व्यक्त केला. केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली महायुती सरकारने राज्यात जी विकासकामं केली आहेत, त्यामुळे राज...

November 17, 2024 7:02 PM

views 23

भाजपनं देशात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची मल्लिकार्जुन खर्गे यांची टीका

पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या नेत्यांनी लोकशाहीच्या रक्षणासाठी आपलं आयुष्य वेचलं. पण, भारतीय जनता पार्टीने मात्र देशात फूट पाडण्याचं काम केलं अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी आज केली. नागपूरजवळ उमरेड इथे प्रचारसभेत ते बोलत होते. राज्यात आता मतदारा...

November 17, 2024 3:33 PM

views 7

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासात अग्रणी भूमिका निभावली असून मराठी माणसाला सक्षम बनवलं, असं प्रधानमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. ठाकरे यांची निडरता आणि अतूट समर्पण येणाऱ्या पि...

November 17, 2024 3:31 PM

views 38

मतदान जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली

विधानसभा निवडणुकीत मतदारांनी जास्तीत जास्त मतदान करावं याबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशानं परभणी शहरात आज सायकल रॅली काढण्यात आली. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून रवाना केलं. लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानपॆक्षा यावेळी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी अनेक सायकलप्रेमींनी य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.