प्रादेशिक बातम्या

November 19, 2024 8:51 AM

views 56

मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

२० तारखेला होणाऱ्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली आहे. राज्यातील २८८ विधानसभा मतदार संघांसाठी तसंच नांदेड लोकसभा पोटनिवडणुकीसाठी उद्या मतदान होणार आहे. राज्यात ९ कोटी ७० लाख २५ हजार ११९ मतदार असून; त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रांवर मतदानाची व्यवस्था करण्यात आली आहे. राज्यातल्या २८८ जाग...

November 19, 2024 1:30 PM

views 24

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर दगडफेक, राजकीय वर्तुळात खळबळ

नागपुरात पारडशिंगा इथे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या गाडीवर काल रात्री दगडफेक झाली. या घटनेत देशमुख यांच्या डोक्याला मार लागला असून या प्रकरणाचा तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.   हिंगोली जिल्ह्यात कळमनुरी विधानसभा मतदारसंघातले वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार डॉ. दिलीप मस्के यांच्...

November 18, 2024 7:51 PM

views 36

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या

महाराष्ट्रात, विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक आणि नांदेड लोकसभा मतदारसंघातल्या पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी आज संध्याकाळी थांबली. राज्यात यंदा ९ कोटी ७० लाखांहून अधिक मतदार २८८ आमदारांना निवडून देणार आहे. त्यांच्यासाठी १ लाख ४२७ मतदान केंद्रं उभारली असून दुर्गम भाग वगळता इतर ठिकाणी सकाळी ७ ते सं...

November 18, 2024 8:07 PM

views 10

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर

मुंबई विद्यापीठाने घेतलेल्या फेरपरीक्षांचे निकाल जाहीर करण्यात आले आहेत. बीकॉमच्या सहाव्या सत्राच्या एटीकेटी परीक्षेसाठी १४ हजार १९१, बीएससी सहाव्या सत्रासाठी २ हजार ९२६ तर बीकॉम अकाउंट अँड फायनान्ससाठी १ हजार ३१ विद्यार्थी बसले होते. सर्व निकाल विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्याची माहित...

November 18, 2024 8:01 PM

views 44

मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात

विधानसभा निवडणुकीत मुंबईत १ लाखापेक्षा जास्त कर्मचारी निवडणुकीच्या कामावर तैनात आहेत. बंदोबस्तासाठी २५ हजारांहून अधिक पोलीस तैनात असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी भूषण गगराणी यांनी दिली. मुंबईत प्रमाण लक्षणीयरीत्या कमी असलेली एकंदर ७६ मतदान केंद्रं आहेत. मतदार जनजागृतीसाठी केलेल्या विविध उपाय ...

November 18, 2024 7:59 PM

views 35

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून राज्यात सुमारे ८० हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई झाली. ५६ हजारांहून अधिक शस्र जमा केली असून ६११ शस्र परवाने रद्द झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून ६६० कोटी रुपयांहून अधिक रकमेची मालमत्ता जप्त झाली आहे. त्यात १५३ कोटी ...

November 18, 2024 7:42 PM

views 53

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा रमेश चेन्नीथला यांचा आरोप

विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्ष सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा गैरवापर करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यात सर्वात जास्त पोलीस दलाचा वापर होत असून निवडणूक आयोगाने याची तात्काळ दखल घेऊन हस्तक्षेप करावा, अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी केली आहे. माजी पोलीस महासंचालक रश्...

November 18, 2024 7:39 PM

views 26

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल-विनोद तावडे

धारावीचा पुनर्विकास झाल्यानंतर तिथल्या सर्व रहिवाशांना धारावीतच घर देण्यात येईल, असं भाजपा नेते विनोद तावडे यांनी सांगितलं. धारावीतल्या लोकांना विस्थापित करण्यात येणार आहे, या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरोपांना उत्तर देताना ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. धारावीची जमीन अदानी समूहाला दिली जाणा...

November 18, 2024 7:38 PM

views 23

महायुती सरकार असंविधानिक, भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट-बाळासाहेब थोरात

राज्यातलं महायुती सरकार असंविधानिक आणि भ्रष्टाचारी असून महायुतीला सत्तेवरुन खाली खेचणं हे पहिलं उद्दिष्ट असल्याचं प्रतिपादन काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे. ते आज संगमनेर इथं वार्ताहर परिषदेत बोलत होते. राज्यात सर्वत्र महायुती सरकार बद्दल प्रचंड राग असून, या निवडणुकीत १८० जागा जिंकून ...

November 18, 2024 7:34 PM

views 24

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील-चंद्रशेखर बावनकुळे

महायुुतीला जनतेचा कौल असल्यानं युतीच्या १६५ पेक्षा जास्त जागा निवडून येतील आणि सरकार आपलंच येईल, असा विश्वास भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केला. नागपूरात ते वार्ताहरांशी बोलत होते. काँग्रेसने लोकसभेत खोटा प्रचार केला असून त्यावर जनतेचा विश्वास उरला नाही, त्यामुळे हरियाणात झालं ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.