प्रादेशिक बातम्या

November 9, 2024 5:03 PM November 9, 2024 5:03 PM

views 12

एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोलीत सुरु

केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत एनसीसीएफच्या वतीने खरीप हंगाम २०२४-२५ साठी मूग, उडीद, सोयाबीन खरेदी केंद्र हिंगोलीत सुरु करण्यात आली आहे. या खरेदी केंद्रांवर मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी १ ऑक्टोबर पासून नोंदणी सुरु झाली आहे. या केंद्रावर ७ जानेवारी पर्यंत मूग आणि उडीद तर १२ जानेवारी...

November 9, 2024 5:04 PM November 9, 2024 5:04 PM

views 12

पालघर जिल्ह्यातल्या वाडा पोलिसांनी ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त

पालघर जिल्ह्यात वाडा पोलिसांनी आज एका बनावट एटीएम व्हॅन मधली ३ कोटी ७० लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली. नवी मुंबईतल्या ऐरोली इथून आणलेली ही रक्कम विक्रमगड बँकेत नेली जात असल्याचा बनाव करण्यात येत होता. मात्र त्याबाबत समाधानकारक उत्तरं तसंच पुरावे न मिळाल्यामुळं पोलिसांनी ही रक्कम जप्त केली....

November 9, 2024 4:49 PM November 9, 2024 4:49 PM

views 15

शरद पवार यांनी आज हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं

महाराष्ट्रात यावेळी निवडणूक लढवणाऱ्या पक्षांची आणि उमेदवारांची संख्या जास्त असून त्यामुळे उमेदवारांचा कस लागणार असल्याचं राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी म्हटलं आहे. आज एका वृत्तवाहिनीला ते मुलाखत देत होते. शरद पवार यांनी हिंगोली इथं प्रचारसभेला संबोधित केलं. तसंच ते आज बीडमध...

November 9, 2024 4:41 PM November 9, 2024 4:41 PM

views 17

सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

महायुती सरकारनं राज्यात अनेक समाजोपयोगी योजना आणल्या असं सांगत सरकार आल्यावर चंद्रपूर इथल्या दीक्षाभूमीसाठी शंभर कोटी रुपये देऊ, असं आश्वासन भाजपा नेते, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. चंद्रपूर इथं प्रचारसभेत ते बोलत होते. महिला आणि शेतकऱ्यांसाठीच्या योजनांचाही त्यांनी यावेळी पुनरुच्चार के...

November 9, 2024 4:35 PM November 9, 2024 4:35 PM

views 7

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघात प्रचारसभा

महाविकास आघाडीच्या सरकारच्या कालावधीत साडे सहा लाख कोटींचे सामंजस्य करार करून राज्यात उद्योग आणले, मात्र महायुती सरकारनं सर्व उद्योग गुजरातला नेले अशी टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली. ते आज नांदेड जिल्ह्यात लोहा-कंधार मतदारसंघातल्या प्रचारसभेत बोलत होते. महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर म...

November 9, 2024 4:30 PM November 9, 2024 4:30 PM

views 20

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आज परभणीत प्रचारसभा

महायुती सरकारच्या काळात सरकारच्या तिजोरीवर पहिला अधिकार हा शेतकरी, लाडक्या बहिणी आणि लाडक्या भावांचा होता, असं शिवसेनेचे मुख्य नेते, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. ते आज परभणीत प्रचारसभेत बोलत होते.   महायुती सरकारनं साडे सात अश्वशक्ती पम्पाचा वापर करणाऱ्या शेतकऱ्यांचं वीज बील माफ केलं...

November 9, 2024 4:25 PM November 9, 2024 4:25 PM

views 24

काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी दिली दीक्षाभूमीला भेट

महाराष्ट्र याआधी न्याय, कायदा आणि सुव्यवस्थेसाठी ओळखलं जात असे. मात्र महायुतीचं सरकार आल्यावर इतली प्रशासन व्यवस्था कोलमडली अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केली. ते आज नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. राज्यात बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न असून महाराष्ट्राला पुन्हा एक...

November 9, 2024 11:17 AM November 9, 2024 11:17 AM

views 10

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी झालं गृहमतदान

वाशिम जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठी काल गृहमतदान पार पडलं. निवडणूक अधिकाऱ्यांनी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन मतदानाची प्रक्रिया राबवली. धुळे शहरात 10 नोव्हेंबर रोजी गृह मतदान होणार असून, यासाठी चौदा पथकं नेमण्यात आली आहेत.

November 9, 2024 10:55 AM November 9, 2024 10:55 AM

views 3

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास प्रारंभ

करवीर निवासिनी श्री अंबाबाई महालक्ष्मीच्या दक्षिणायन किरणोत्सवास कालपासून प्रारंभ झाला. पहिल्या दिवशी मावळत्या सूर्याची किरणं देवीचे चरणस्पर्श करुन थोडी वर सरकत लुप्त झाली. हा अनोखा सोहळा सूर्यास्तापूर्वी काही क्षण अनुभवता येतो. सूर्याची सोनेरी किरणे पहिल्या दिवशी आईच्या चरणावर, दुसऱ्या दिवशी छातीवर...

November 9, 2024 10:43 AM November 9, 2024 10:43 AM

views 16

महायुती सरकार वंचितांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असल्याची प्रधानमंत्र्यांची धुळ्यातील सभेत ग्वाही

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांचा जोरदार प्रचार सुरू असून दिग्गज नेत्यांच्या जाहीर सभांमधून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत. देशात कॉँग्रेस जाती विभाजनाचा धोकादायक खेळ खेळत असल्याची घणाघाती टीका भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल धुळे इथल्या प्रचार सभ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.