प्रादेशिक बातम्या

November 15, 2024 6:41 PM

views 15

जातनिहाय जनगणनेबाबत भूमिका स्पष्ट करण्याचं काँग्रेसचं भाजपाला आव्हान

जातनिहाय जनगणनेबाबत भाजपा आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोंदी यांनी त्यांची भूमिका जाहीर करावी, असं आव्हान काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी दिलं आहे. ते मुंबईत वार्ताहर परिषदेत बाेलत होते. काँग्रेस अनुसूचित जाती- जमातींचं आरक्षण  संपवणार असल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप त्य...

November 15, 2024 6:41 PM

views 16

महायुतीला पुन्हा सत्तेत आणण्याचं गृहमंत्री अमित शाह यांचं आवाहन

राज्यातलं महायुतीचं सरकार गरजू जनतेला समर्पित आहे, ते पुन्हा सत्तेत आणा, असं आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. ते आज हिंगोली इथं आयोजित प्रचार सभेत बोलत होते. जनतेला घरं, स्वच्छतागृहं, पिण्याचं पाणी, धान्य, मोफत गॅस सिलेंडर, मोफत औषधोपचार अशा विविध व्यवस्था हे सरकार देत आहे, असं ते म...

November 15, 2024 3:24 PM

views 13

काँग्रेसनंच राज्यघटनेची मोडतोड केली – मंत्री नितीन गडकरी

भाजपाचे ज्येष्ठ नेते केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात आष्टी इथं प्रचारसभा घेतली. भाजपा राज्यघटना बदलणार असल्याचा खोटा प्रचार काँग्रेस करीत आहे, पण खरं तर काँग्रेसनंच अनेकदा घटनेची मोडतोड केली, असं ते यावेळी म्हणाले. लोकांना पटवून देता येत नाही म्हणून संभ्रमित करण्याचा प्रयत्न ...

November 15, 2024 4:45 PM

views 12

मतदानाच्या दिवशी मुंबईत विशेष लोकल सेवा

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेतर्फे मतदारांच्या सोयीसाठी विशेष उपनगरी गाड्या चालवल्या जाणार आहेत. या विशेष गाड्या १९ ते २१ या कालावधीसाठी मध्य रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण आणि हार्बर रेल्वे मार्गावरून सीएसएमटी ते पनवेल असा प्रवास करतील. मतदानाच्या दिवशी मु...

November 15, 2024 2:29 PM

views 18

महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन

विधानसभेची यंदाची राज्यावर प्रेम करणारे आणि राज्याची लूट करणारे यांच्यातली लढाई आहे. महाराष्ट्राची लूट होऊ न देता त्याच्या रक्षणासाठी लढणार असल्याचं प्रतिपादन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल छत्रपती संभाजीनगरमध्ये केलं.   औरंगाबादचं नामांतर केल्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा दावा च...

November 15, 2024 1:50 PM

views 13

७ हजार रुपये क्विंटल दराने सोयाबीन खरेदीची मल्लिकार्जून खर्गे यांची घोषणा

महाविकास आघाडी सरकार ७ हजार रुपये प्रति क्विंटल दराने सोयाबीन खरेदी करेल, असं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिलं आहे. पुण्यात काल वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. कांद्याच्या दरासंदर्भात एक समिती स्थापन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

November 15, 2024 6:59 PM

views 8

मनसे पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. जाहिरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या...

November 15, 2024 7:35 PM

views 16

महाविकास आघाडी सत्तेत आल्यावर आरक्षण हटवेल, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा आरोप

काँग्रेस आणि महाविकास आघाडी सत्तेत आली तर आरक्षण हटवेल, असा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल मुंबईत शिवाजी पार्कवर घेतलेल्या सभेत केला. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसी यांची एकजूट तोडण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. हे लोक आपापसात लढले तर काँग्रेस मजबूत होईल, असा दावा त्यांनी या सभेत केला. सर्व...

November 15, 2024 1:52 PM

views 16

सत्तेत आल्यावर शेतकरी आत्महत्या थांबवण्याचं शरद पवार यांचं आश्वासन

सत्ता आपल्याला मिळाली तर राज्यातल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू आणि त्यांच्या मालाला योग्य किंमत देऊ, असं आश्वासन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी काल पुणे इथल्या मविआ उमेदवारांसाठीच्या प्रचारसभेत दिलं. राज्यातल्या महिलांना सुरक्षितता मिळवून देणं, शेतकऱ्यांना आत्महत्यांपासून रोखणं, तरुणांना रोजगार मि...

November 15, 2024 10:53 AM

views 20

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियान

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात ठीकठिकाणी मतदान जनजागृती अभियानही राबवलं जात आहे. धाराशिव जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीनं काल ‘वॉक फॉर व्होट’ या प्रभात फेरीचं आयोजन केलं होतं. शहरातल्या सर्व शाळांमधल्या विद्यार्थ्यांनी यात मोठ्या संख्येनं सहभाग घेतला. तुळजापूर इथं विद्यार्थ्यांनी मानवी साखळ...