प्रादेशिक बातम्या

December 18, 2024 5:37 PM December 18, 2024 5:37 PM

views 14

ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार

ज्येष्ठ साहित्यिक समीक्षक सुधीर रसाळ यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. ‘विंदांचे गद्य रूप’ या पुस्तकासाठी रसाळ यांना हा पुरस्कार मिळाला आहे. साहित्य अकादमी ने २१ भाषांमधल्या यंदाच्या पुरस्कार विजेत्यांची नावं आज जाहीर केली. त्यात ८ कवितासंग्रह, ३ कादंबऱ्या, २ लघुकथा, ३ ललितलेख, ३ साहित...

December 18, 2024 3:42 PM December 18, 2024 3:42 PM

views 6

विरोधकांचं शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन

विधीमंडळाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानभवन परिसरात आंदोलन केलं. वाईट परिस्थितीमुळं शेतकरी आत्महत्या करत आहेत. सोयाबीन, कापसाला योग्य भाव नाही, धानाला बोनस नाही. त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांवरचा अन्याय दूर करावा, अशी मागणी विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दा...

December 18, 2024 3:15 PM December 18, 2024 3:15 PM

views 13

हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेचं कामकाज सुरू झाल्यावर औचित्याचे मुद्दे चर्चेसाठी घेण्यात आले. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काल राज्यसभेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याचा मुद्दा आज विधानसभेत काँग्रेसचे नितिन राऊत यांनी उपस्थित केला....

December 18, 2024 7:24 PM December 18, 2024 7:24 PM

views 10

विधानपरिषदेच्या सभापतीपदी महायुतीचे उमेदवार राम शिंदे यांची निवड होण्याचा मार्ग मोकळा

राज्य विधान परिषदेच्या सभापती पदासाठी महायुतीच्या वतीनं राम शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंत अन्य उमेदवाराचा अर्ज दाखल झाला नसल्यानं शिंदे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.

December 18, 2024 8:43 AM December 18, 2024 8:43 AM

views 38

नागरिकांना शुद्ध पाणी मिळण्यासाठी ‘जलजीवन मिशन’ योजना योजना सुरू

ग्रामीण भागातील नागरिकांना दरडोई ५५ लिटर शुद्ध पिण्याचं पाणी मिळावं, या उद्देशानं राज्य शासनानं जलजीवन मिशन योजना सुरू केली आहे. या अंतर्गत सातारा जिल्ह्यात १ हजार १०० कामं मंजूर असून ही कामं पुढच्या वर्षाच्या मार्च महिन्यापर्यंत पूर्ण करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत.

December 18, 2024 8:35 AM December 18, 2024 8:35 AM

views 18

धाराशिवमध्ये ‘नई चेतना’ अभियानांतर्गत ‘लिंगभेद समानता’ विषयावर जनजागृती

धाराशिव जिल्ह्यात केंद्र सरकारच्या ‘नई चेतना’ या अभियानाअंतर्गत ‘लिंगभेद समानता’ या विषयावर जनजागृतीचे कार्यक्रम सुरू आहेत. यामध्ये मुलगा मुलगी एक समान, बालविवाह प्रतिबंध करणे, महिलाविषयक अन्याय अत्याचार हिंसाचार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि मार्गदर्शन, तसेच हुंडाबंदी, बालविवाह बंदी या सामाजिक व...

December 17, 2024 8:35 PM December 17, 2024 8:35 PM

views 86

मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद

विकसित भारतासमोरच्या आव्हानांची चर्चा करण्यासाठी मुंबईतल्या इंदिरा गांधी विकास संशोधन संस्थेत दोन दिवसीय परिषद पार पडली. यावेळी विकसित भारतासमोरची आव्हानं, त्यांना मिळणारं अर्थसहाय्य, या अर्थसहाय्याचं स्त्रोत याविषयी चर्चा झाल्याची माहिती नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी दिली. या चर्चांचा उपयो...

December 17, 2024 8:34 PM December 17, 2024 8:34 PM

views 7

विधान परिषदेत राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा

"मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने" योजनेंतर्गत महिलांना देण्यात आलेली रक्कम अत्यंत कमी असून त्यात किती रुपयांची वाढ केली जाणार,  आसा प्रश्न विधान परिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज केला. ते राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या चर्चेत बोलत होते.    राज्यात "जल जीवन मिशन योजना" राबवताना अने...

December 17, 2024 7:50 PM December 17, 2024 7:50 PM

views 53

MPSC 2025 मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचं वेळापत्रक जाहीर

एम.पी.एस.सी. अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत वर्ष  २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचं  अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलं आहे. उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आयोगाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी असं आवाहन महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं  प्रसिध...

December 17, 2024 7:41 PM December 17, 2024 7:41 PM

views 28

पुण्यात ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू

जगभरातील संगीत रसिकांसाठी पर्वणी असलेला पुण्यातील मानाचा ७० वा सवाई गंधर्व भीमसेन संगीत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. येत्या २२डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या संगीत सोहळ्यामध्ये शास्त्रीय संगीतातील अनेक दिग्गज कलाकारांसह १५ नवीन कलाकार प्रथमच या मंचावर आपली कला सादर करणार आहेत.