प्रादेशिक बातम्या

January 22, 2026 3:53 PM

views 49

जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी अर्जांची छाननी सुरु

राज्यातल्या १२ जिल्हा परिषदांमधल्या मिळून १२५ पंचायत समित्यांच्या निवडणुकीसाठी आलेल्या उमेदवारी अर्जांची छाननी आज होतआहे. छाननी झाल्यावर वैध उमेदवारांची यादी जाहीर होईल. उद्या आणि परवा तसंच येत्या मंगळवारी म्हणजे २३, २४ आणि २७ तारखेला दुपारी ११ ते ३ या वेळात उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. उमेदवारांच...

January 22, 2026 3:20 PM

views 45

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना

बुलढाणा जिल्ह्यात पाच नवीन ग्रामपंचायतींची स्थापना करण्यात आली असून, आता जिल्ह्यातल्या ग्रामपंचायतींची संख्या ८७५ झाली आहे. शासन राजपत्रात यासंदर्भातली अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली. संत सेवालाल महाराज बंजारा/लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत चिखली तालुक्यातल्या ग्रामपंचायत अंचरवाडीचे विभाजन करून वसंत...

January 22, 2026 3:14 PM

views 15

मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांची दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई

भारतीय विद्यापीठ संघाच्या वतीने आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठीय संशोधन महोत्सवात मुंबई विद्यापीठाच्या संशोधक विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि दोन कांस्य पदकांची कमाई केली आहे. गुजरातमधल्या सरदार पटेल विद्यापीठात काल ही स्पर्धा झाली. यात मूलभूत शास्त्र आणि सामाजिक शास्त्र गटात दोन सुवर्ण...

January 22, 2026 3:11 PM

views 35

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात

बीड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२५-२६ मधील तूर उत्पादक शेतकऱ्यांसाठी शासकीय हमीभाव केंद्रावर नोंदणी प्रक्रियेला सुरूवात झाली आहे. २० फेब्रुवारी पर्यंत नोंदणी करता येणार आहे. केंद्र सरकारने यावर्षी तुरीसाठी ८हजार रुपये प्रति क्विंटल असा आधार भाव जाहीर केला आहे. खुल्या बाजारातील चढ-उतारांपासून संरक्षण मिळव...

January 22, 2026 3:40 PM

views 41

तिसरी मुंबई आणि रायगड जिल्हा परिसरातल्या विविध प्रकल्पांसाठी महाराष्ट्र सरकारचे सामंजस्य करार

महाराष्ट्र सरकारच्या वतीनं मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात विकास केंद्र उभारण्यासाठी काल दावोस इथं विविध जागतिक कंपन्यांसमवेत सामंजस्य करार केले. तिसरी मुंबई म्हणून संकल्पित असलेला हा प्रकल्प, तंत्रज्ञान, अर्थतंत्र आणि डेटा सेंटरसाठी अत्याधुनिक केंद्र म्हणून ...

January 22, 2026 2:45 PM

views 45

ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं मुंबईत निधन

जागतिक कीर्तीचे ख्यातनाम ढोलकीवादक राजाभाऊ जामसंडेकर यांचं आज पहाटे मुंबईत निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. उस्ताद झाकिर हुसेन, पंडित भवानी शंकर यांसारख्या कलाकारांसोबत जुगलबंदी वादन करणाऱ्या राजाभाऊंनी हिंदी-मराठी सिनेसृष्टीतल्या अनेक संगीतकारांसोबतही काम केलं. लोकशाहीर विठ्ठल उमप यांच्या लोकसंगीताच...

January 22, 2026 10:04 AM

views 62

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील-मुख्यमंत्र्यांची दावोस बैठकीत घोषणा

महाराष्ट्रातील सर्व मोठे सौर ऊर्जा प्रकल्प या वर्षाअखेरपर्यंत पूर्णत्वास जातील अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. शेतकऱ्यांना स्थिर सौर ऊर्जा पुरवठा करण्याच्या दृष्टीने या प्रकल्पांचे आरेखन करण्यात आल्याचे फडणवीस म्हणाले. दावोसमध्ये 19 ते 23 जानेवारी दरम्यान सुरू असल...

January 21, 2026 1:49 PM

views 75

मुंबईतलं पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दावोस दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी मुंबईतील पहिलं शहर म्हणून रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा केली. नवी मुंबई विमानतळापासून पंधरा ते वीस किलोमीटरवर हे ग्रोथ सेंटर निर्माण करण्यात येणार आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून यासाठीच्या परवानग्या मिळवण्याचा प्रयत्न केला जात होता. त...

January 21, 2026 1:49 PM

views 37

पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांचा घेराव

विविध मागण्यांसाठी निघालेल्या मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा लाँग मार्च काल महाराष्ट्रातल्या पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयाला आंदोलकांनी आज घेराव घातला असून ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे. मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिलं असून प्रशासन चर्चेसाठी तयार असल्याचं आमदार ...

January 20, 2026 8:07 PM

views 29

१९९३ मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेमला पॅरोल देण्याला विरोध

कुख्यात गुन्हेगार आणि १९९३च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातला दोषी अबू सलेम याला पॅरोल देण्याला सरकारपक्षानं विरोध केला आहे. गेल्या नोव्हेंबरमधे सलेमने आपल्या भावाच्या निधनानंतर पॅरोलची मागणी मुंबई उच्च न्यायालयाडे केली होती. मात्र पॅरोल मिळाल्यावर तो पुन्हा फरार होऊ शकतो, आणि पोर्तुगालमधून त्याचं हस्त...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.