प्रादेशिक बातम्या

January 24, 2025 3:55 PM

views 3

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा अपघाती मृत्यू

ठाणे जिल्ह्यातल्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पुष्पा आगाशे यांचा काल अपघाती मृत्यू झाला. त्या ७३ वर्षाच्या होत्या. ग्राहक चळवळ, पर्यावरण संरक्षण, नेत्रदान अशा विविध क्षेत्रात त्यांनी कार्य केलं.त्यांच्या इच्छेनुसार अंतिम संस्कारापूर्वी त्यांचे नेत्रदान करण्यात आले. त्या पत्रकार आशिष आगाशे यांच्या ...

January 24, 2025 9:11 AM

views 22

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार

दावोसमध्ये महाराष्ट्रासाठी विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे करार. दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेत महाराष्ट्रानं जगभरातील विविध दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी 15 लाख 75 हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार केले आहेत; यातून राज्यात 15 लाख 98 हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्र...

January 23, 2025 8:10 PM

views 24

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं काम दर्जेदार करावं – मंत्री संजय शिरसाट

मुंबईत दादर इथल्या इंदू मिलमधे उभारल्या जात असलेल्या, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचं अनावरण एप्रिल 2026 पर्यंत करण्याचा मानस असून स्मारकाचं काम दर्जेदार करावं, अशा सूचना सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी दिल्या आहेत. त्यांनी आज या स्मारकाच्या कामाची पाहणी केली.   मुंबईत वरळी इथं स...

January 23, 2025 8:10 PM

views 27

राज्यातल्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्याचं निमंत्रण

अटल भूजल योजनेअंतर्गत भूजल व्यवस्थापनामध्ये राज्यात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या सहा ‘जल योद्ध्यांना’ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात विशेष अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे. भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सहसंचालक डॉ. प्रवीण कथने यांनी वृत्तसंस्थेला ही माहिती दिली. त्यात पुणे जिल्ह्यातल्या काऱ्हाटी ...

January 23, 2025 7:38 PM

views 51

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं निधन

ज्येष्ठ कवी, लेखक अनिल सोनार यांचं आज धुळे इथं निधन झालं. ते ७९ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर शहरातल्या स्मशानभूमित अंत्यसंस्कार करण्यात आले. सोनार यांची २१ नाटकं, तीन कादंबऱ्या, सहा काव्य संग्रह, ३८ एकांकिका, एक आस्वादक समीक्षापर लेख संग्रह, एक विनोदी लेख संग्रह, पाच बालकथा संग्रह, दोन एकांकि...

January 23, 2025 8:10 PM

views 37

एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न – मंत्री प्रताप सरनाईक

एसटी बसस्थानकांची स्वच्छता ही कर्मचारी आणि प्रवाशांची संयुक्त जबाबदारी असून, या अभियानाच्या माध्यमातून एसटीची सर्व बसस्थानकं सुंदर करण्याचा प्रयत्न करणार असल्याचं परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आज म्हणाले. मुंबईत कुर्ला नेहरूनगर बसस्थानकावर हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियाना...

January 23, 2025 8:10 PM

views 16

जनगणनेनंतर नवीन जिल्हे तयार करण्याचा निर्णय – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नवीन जिल्हे तयार करण्याचा कुठलाही प्रस्ताव राज्य सरकारकडे आलेला नाही. जनगणनेनंतर यासंदर्भातला निर्णय होऊ शकतो, असं स्पष्टीकरण महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज दिलं. ते नागपुरात वार्ताहरांशी बोलत होते. अनेक ठिकाणी नवीन अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय तयार केलं जाईल, असं ते म्हणाले.  प्रत्येक आदिव...

January 23, 2025 7:23 PM

views 21

गुईलेन बॅरे सिंड्रोम आजार संसर्गजन्य नसून नागरिकांनी घाबरू नये – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे शहरात सध्या गुईलेन-बॅरे सिंड्रोम या आजारानं डोकं वर काढलं आहे, मात्र हा संसर्गजन्य आजार नाही, त्यामुळं नागरिकांनी घाबरुन जाऊ नये, असं आवाहन उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार आज केलं. याबाबतच्या  आढावा बैठकीनंतर ते बोलत होते. गुईलेन-बॅरे सिंड्रोम आजाराची लागण झालेल्यांची संख्या आता...

January 23, 2025 8:10 PM

views 29

भारतीय कृषि व्यवस्था जागतिकीकरणाकडे जात असल्याचं राज्यपालांचं प्रतिपादन

भारतीय कृषि व्यवस्था हळूहळू उच्च दर्जाच्या कृषि उत्पादनातून जागतिकीकरणाकडे जात असल्याचं प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केलं आहे. ते आज परभणीत वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापिठाच्या २६ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते. स्वातंत्र्यानंतर अन्नधान्य आयात करणाऱ्या देशाची भूक भागवून सध्या द...

January 23, 2025 7:08 PM

views 36

मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर अंबादास दानवेंचा सवाल

दावोसमध्ये झालेल्या सामंजस्य करारातल्या २९ पैकी २८ कंपन्या भारतातल्या आहेत. २८ पैकी २० राज्यातल्या असताना दावोस दौरा कशासाठी असा सवाल विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे. २० पैकी १५ मुंबईतल्या, ४ पुण्यातल्या, एक ठाण्यातली आहे, असंही ते म्हणाले. त्याचवेळी गेल्यावर्षी झालेल्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.