प्रादेशिक बातम्या

January 28, 2025 3:36 PM

views 13

विद्यापीठांमध्ये कला, नाट्यशास्त्र विभागांना अतिरिक्त निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू – प्रा. राम शिंदे

अहिल्यानगर शहरात सांस्कृतिक संकुल उभे रहावं, यासाठी संबधित विभागाचे मंत्री, नाट्य परिषदेचे पदाधिकारी आणि संबधित अधिकाऱ्यांबरोबर  लवकरच बैठक घेण्यात येईल, तसंच राज्यातल्या विद्यापीठांमध्ये कला आणि नाट्यशास्त्र विभागांना अधिकचा निधी मिळावा यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा.राम ...

January 28, 2025 8:58 AM

views 15

येत्या ५ वर्षात २५ हजार नव्या बस घेण्यास अर्थमंत्र्यांची मान्यता

एसटी महामंडळाला येत्या ५ वर्षात स्वमालकीच्या २५ हजार नव्या बस घेण्याच्या प्रस्तावाला उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी तत्वतः मान्यता दिली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी काल मुंबईत दिली. दरम्यान, एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्...

January 27, 2025 8:20 PM

views 18

सोयाबीन खरेदीत महाराष्ट्रानं मिळवलं अव्वल स्थान

सोयाबीन खरेदी करणाऱ्या प्रमुख पाच राज्यांना मागं टाकत महाराष्ट्रानं अव्वल स्थान मिळवलं आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी आज मुंबईत बातमीदारांशी बोलताना ही माहिती दिली.   राज्यात नोंदणी झालेल्या सुमारे ७ लाख ६५ हजार शेतकऱ्यांपैकी ३ लाख ६९ हजार शेतकऱ्यांकडून ७ लाख ८१ हजार ४४७ मेट्रिक टन सोयाबीन ...

January 27, 2025 7:25 PM

views 20

फुले वाडा, सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी प्रशासकीय मान्यता

पुण्यातल्या महात्मा फुले वाडा आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले स्मारकाच्या विस्तारीकरणासाठी भूसंपादन तसेच रहिवाशांचं इतर ठिकाणी पुनर्वसन करायला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. या कामांसाठी २०० कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला असून प्रशासकीय मान्यता मिळाल्यानं आता स्मारक ...

January 27, 2025 7:15 PM

views 96

ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांना जनस्थान पुरस्कार जाहीर

कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे एक वर्षाआड दिला जाणारा, प्रतिष्ठेचा जनस्थान पुरस्कार, यावेळी ज्येष्ठ नाटककार सतीश वसंत आळेकर यांना जाहीर झाला आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. येत्या १० मार्चला नाशिकमध्ये गुरुदक्षिणा सभागृहात या पुरस्काराचं समारंभपूर्वक वितरण केलं ...

January 27, 2025 7:08 PM

views 20

गुलेन बॅरी सिंड्रोमच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल

गुलेन बॅरी सिंड्रोम या आजारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचं पथक पुण्यात दाखल झालं आहे. या ७ सदस्यीय पथकात राष्ट्रीय संसर्गजन्य आजार नियंत्रण संस्था, भारतीय वैद्यकीय संशोधन संस्था, तसंच राष्ट्रीय विषाणू संस्थेतल्या तज्ञांचा समावेश आहे.    या आजाराची...

January 27, 2025 6:58 PM

views 7

एस.टी भाडेवाढ रद्द करण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांचे आंदोलन

एस.टी.ची भाडेवाढ रद्द करण्याची मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात आज ठिकठिकाणी चक्काजाम आंदोलन केलं.  हिंगोली जिल्ह्यात हिंगोली शहर, कळमनुरी, औंढा नागनाथ इथं  झालेल्या आंदोलनामुळे दुपारी १२ वाजेपर्यंत जिल्ह्यातली वाहतूक ठप्प होती.  नांदेडमध...

January 27, 2025 6:50 PM

views 23

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २१ फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण

मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज २१ मोबाइल फॉरेन्सिक वाहनांंचं लोकार्पण केलं. या वाहनांमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शास्त्रीय पद्धतीनं पुरावे गोळा करण्याची आणि साठवण्याची व्यवस्था असल्याचं मुख्यमंत्र्यांनी लोकार्पण सोहळ्यानंतर बोलताना सांगितलं. सबळ पुरावे नसल्यानं किंवा पुराव्यांसोबत छेड...

January 27, 2025 3:59 PM

views 18

राज्यातल्या महाविद्यालयांमध्ये संविधान गौरव महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रमांचं आयोजन

भारतीय राज्यघटनेच्या ७५ व्या वर्षपूर्तीनिमित्त फेब्रुवारी महिन्यात राज्यातल्या ६ हजारांहून अधिक महाविद्यालयांत "संविधान गौरव महोत्सवा" अंतर्गत विविध उपक्रमाचं आयोजित केले जाणार आहेत. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही घोषणा केली.  या महोत्सवात तज्ञांची व्याख्यानं, निबंध, वक्तृत्व, ...

January 27, 2025 3:30 PM

views 36

धाराशिवमध्ये २ फेब्रुवारीपासून १०वं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन

धाराशिव तालुक्यातील पळसप इथं दहावं मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलन येत्या २ फेब्रुवारी रोजी होणार आहे. शिक्षण महर्षी वसंतराव काळे प्रतिष्ठान, किसान वाचनालय पळसप आणि महाराष्ट्र राज्य राष्ट्रवादी शिक्षक संघाच्या वतीने संमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे. संमलेनाचं उद्धाटन सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.