प्रादेशिक बातम्या

January 16, 2025 3:37 PM January 16, 2025 3:37 PM

views 5

गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा – राजेंद्र सिंह

जलप्रदूषण आणि काँक्रिटीकरणामुळे नाशिकमध्ये गोदावरी नदीचं आरोग्य बिघडलं असून, गोदावरी स्वच्छ राहण्यासाठी नागरिकांनी मोठा लढा उभारावा, असं आवाहन, जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांनी केलं आहे. नाशिक मध्ये २०२७ मध्ये होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित, गोदावरी आणि तिच्या उपनद्यांचे भवितव्य गोदा...

January 16, 2025 3:34 PM January 16, 2025 3:34 PM

views 15

चारचाकी गाडी विहिरीत पडून झालेल्या अपघातात चौघांचा मृत्यू

अहिल्यानगर जिल्ह्यात जामखेड नगरपरिषदेच्या जांबवाडी इथं चारचाकी गाडी विहिरीत पडून काल झालेल्या अपघातात चौघांचा जागीच मृत्यू झाला. हे चौघेजण मातकुळीहून जांबवाडीमार्गे जामखेडकडे येत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्यानं रस्त्यालगत असलेल्या विहिरीत पडली. ग्रामस्थांनी विहिरीत पडलेल्या तरुणांना बाहेर काढ...

January 16, 2025 3:32 PM January 16, 2025 3:32 PM

views 1

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची ओबीसी नेत्यांची मागणी

लातूर जिल्ह्यातील माऊली सोट मृत्यूप्रकरणी एसआयटी स्थापन करण्याची मागणी ओबीसी नेते वाघमारे आणि सोनकटे यांनी केली आहे. लातूर जिल्ह्यातल्या टाकळी इथल्या अठरा वर्षीय तरुण माऊली सोट या तरुणाला प्रेमप्रकरणातून जमावाकडून मारहाण झाली होती. घटनेच्या दोन महिन्यानंतर माऊली सोट या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्...

January 16, 2025 3:30 PM January 16, 2025 3:30 PM

views 2

मुंबई – अमरावती, पुणे – अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा निर्णय

मुंबई - अमरावती, पुणे - अमरावती वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे. आतापर्यंत राज्यात पुणे आणि मुंबई इथून वंदे भारत रेल्वे धावत होत्या. मुंबईहून धावणाऱ्या वंदे भारत गाड्या सोलापूर, शिर्डी, गोवा, कोल्हापूर शहरांमध्ये जातात.

January 16, 2025 3:28 PM January 16, 2025 3:28 PM

views 19

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून सुरू केला बेमुदत संप

धुळे जिल्ह्यातल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या हमाल मापाडी कामगारांनी आजपासून बेमुदत संप सुरू केला आहे. मजुरीत वाढ करावी अशी मागणी कामगारांनी केली आहे. जोपर्यंत मजुरी वाढ होत नाही तोपर्यंत संप मागे घेणार नाही असा इशारा कामगारांनी दिला आहे.  

January 16, 2025 9:50 AM January 16, 2025 9:50 AM

views 5

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कडक कारवाई होणार- नरहरी झिरवाळ

राज्यात काल अन्न आणि औषध प्रशासन विभागाने एकाच दिवशी दूध भेसळ तपासणी मोहीम राबवली. यावेळी विविध ठिकाणाहून दुधाचे १ हजार ६२ दुधाचे नमुने विश्लेषणासाठी ताब्यात घेण्यात आले. यामध्ये विविध ब्रान्डच्या दुधाचे ६८० पाउच तसंच पिशवी पॅकिंग आणि ३८२ सुट्या स्वरूपातील दुधाचा समावेश आहे. या तपासणी नमुन्यात दोषी ...

January 16, 2025 9:31 AM January 16, 2025 9:31 AM

views 10

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या ‘अटल’ या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

महाराष्ट्र राज्य सीईटी परीक्षेसाठीच्या 'अटल' या ऑनलाइन नोंदणी प्रणालीचं उद्घाटन उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते काल झालं. राज्य सामायिक प्रवेश कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या विविध व्यवसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी परीक्षांचा सराव करता यावा म्हणून हा उपक्रम सुरू करण्यात आल...

January 16, 2025 9:28 AM January 16, 2025 9:28 AM

views 17

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

तेविसाव्या छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचं उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते काल बारामती इथं करण्यात आलं. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावानं आयोजित होणाऱ्या कबड्डी, खोखो, कुस्ती आणि व्हॉलीबॉल या चार राज्यस्तरीय स्पर्धांसाठी दिले जाणारे 75 लाख रुपयांचं अनुदान वाढ...

January 16, 2025 9:27 AM January 16, 2025 9:27 AM

views 18

सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत रत्नागिरीत आढळले ३४ रुग्ण

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.  

January 16, 2025 9:40 AM January 16, 2025 9:40 AM

views 3

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवाने मराठवाड्यातल्या तरुणाईला सिनेसाक्षर केलं – सई परांजपे

अजिंठा - वेरुळ चित्रपट महोत्सवानं मराठवाड्यातल्या तरुणाईला सिने साक्षर केल्याचं ज्येष्ठ लेखिका, नाटककार, निर्मात्या सई परांजपे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं दहाव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं काल उद्घाटन झालं. एमजीएम विद्यापीठाच्या रुक्मिणी सभागृहात झालेल्या या सोहळ्यात ...

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.