प्रादेशिक बातम्या

December 11, 2025 7:45 PM

views 36

पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्याची केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मागणी

राज्यातल्या अवकाळी पाऊस आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी केंद्राकडे २९ हजार कोटी रुपयांची मदत मागितली आहे. राज्य सरकारनं आतापर्यंत ४४ हजार कोटी रुपये दिले आहेत, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत दिली. केंद्राची मदत लवकरच मिळण्याची आशा असून दुसरं पाहणी पथक येत्या आठवड्यात येण्याची शक्य...

December 11, 2025 7:45 PM

views 32

पागडी इमारतींच्या पुनर्विकासासाठी स्वतंत्र नियमावली

मुंबई शहराला पागडीमुक्त करण्यासाठी तसंच पागडी इमारतींचा न्याय्य  पुनर्विकास करण्यासाठी शासन स्वतंत्र नियमावली करणार असल्याची घोषणाही त्यांनी आज केली. यामध्ये भाडेकरू आणि घरमालकांचा हक्क अबाधित ठेवला जाईल, असं ते यावेळी म्हणाले.    कापड गिरण्यांच्या जमिनींवरील जुन्या चाळींच्या पुनर्विकासाला प्रो...

December 11, 2025 7:05 PM

views 29

ओसी प्रलंबित असलेल्या मुंबईतल्या इमारतींसाठी राज्य सरकारकडून अभय योजना जाहीर

मुंबईतल्या सुमारे २० हजार इमारतींना नियमित करण्यासाठी 'सुधारीत भोगवटा अभय योजना' लागू करण्याची घोषणा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत केली. गेली अनेक वर्ष ओसी, म्हणजेच भोगवटापत्रापासून वंचित असलेल्या दहा लाखांपेक्षा जास्त मुंबईकरांना यामुळे दिलासा मिळणार आहे.   या योजनेमुळे या इमारत...

December 11, 2025 3:51 PM

views 14

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर विधानसभेत गदारोळ

शेतमाल आणि कापसाला वाजवी हमीभाव या मुद्द्यावर महाराष्ट्र विधानसभेत विरोधकांनी आज प्रचंड गदारोळ केला. पणनमंत्री जयकुमार रावल यांनी दिलेल्या उत्तराने समाधान न झाल्यामुळे, विरोधकांनी हौद्यात उतरून निषेधाच्या घोषणा दिल्या.   या मुद्द्यावर अध्यक्षांनी आपल्या दालनात दुपारी बैठक बोलावली, मात्र सरकारने...

December 11, 2025 3:43 PM

views 17

राज्यात एकही शेतकरी लाभार्थी योजनांच्या लाभापासून वंचित राहणार नाही – कृषीमंत्री

शेतकऱ्यांना शेततळी, अवजार खरेदी आणि इतर गरजांच्या मदतीसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही आणि एकही शेतकरी लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज विधानपरिषदेत दिली.   गेल्या ४ वर्षांपासून विविध प्रकारच्या मदतीसाठी शेतकऱ्यांनी केलेले सुमारे ४८ लाख अर्ज कारवाईविना ...

December 11, 2025 2:55 PM

views 10

ठाणे जिल्ह्यात दहशतवाद विरोधी पथकाची छापेमारी

दहशतवादी कारवायांना पैसा पुरवठा प्रकरणी ठाणे जिल्ह्यात पडघा इथं सक्तवसुली संचालनालय आणि दहशतवाद विरोधी पथकानं आज सकाळी छापेमारी केली.   यावेळी पडघा परिसरातल्या काही घरांमध्ये केलेल्या तपासात इलेक्ट्रॉनिक उपकरणं आणि बनावट कागदपत्र जप्त करण्यात आल्याचं संबंधित सूत्रांनी सांगितलं.

December 11, 2025 1:28 PM

views 8

राज्यसभेत आज वंदे मातरमच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्तच्या चर्चेचा समारोप

वंदे मातरम हा देशाचा आत्मा जागृत करण्याचा मंत्र आणि देशाच्या पुनर्निर्माणाचं आवाहन आहे, असं प्रतिपादन राज्यसभेचे सभागृह नेते जे. पी. नड्डा यांनी केलं. वंदे मातरम या गीताच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त चर्चेचा समारोप करताना ते बोलत आहेत. या चर्चेत ८० पेक्षा जास्त खासदारांनी भाग घेतला असून स...

December 10, 2025 8:14 PM

views 60

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना योग्य वेळी रुपये देण्याचं राज्य सरकारचं आश्वासन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना २१०० रुपयांचा हप्ता योग्य वेळी देण्यात येईल, अशी माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत एका लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात दिली. लाडकी बहीण योजनेसाठी  २ कोटी ४३ लाख ८२ हजार ९३६ अर्ज विभागाने पात्रतेनुसार ग्राह्य धरले आहेत, अशी माहिती महिला...

December 10, 2025 8:24 PM

views 27

जमीन घोटाळ्यात पार्थ पवार यांना वाचवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे का? – मुंबई उच्च न्यायालय

पुण्यातल्या जमीन गैरव्यवहार प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ यांचं नाव एफआयआरमधे न नोंदवता इतर व्यक्तींची चौकशी करत पोलीस पार्थ पवार यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने विचारला आहे. या प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानी यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जा...

December 10, 2025 7:09 PM

views 21

वाहनांच्या ई-चलानच्या यंत्रणेत बदल करणार, लोक अदालतीतून थकीत दंड वसुलीचाही प्रयत्न

वाढती वाहनसंख्या तसंच ई - चलानच्या यंत्रणेत बदल करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा अभ्यासगट स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी विधानपरिषदेत ही घोषणा केली. ई चलानची वसुली करण्यासाठी लोक अदालत सारखा उपक्रम राबवण्याचा मानसही त्यांनी व्यक्त केला.   राज्यात सर्व...